Go to full page →

प्रकरण १९ वें - देवाचे प्रतिनिधि असलेले ख्रिस्ती CChMara 139

आपल्या राज्याचीं तत्त्वें आपल्या लोकांद्वारें प्रगट करण्याचा देवाचा हेतु आहे. अशासाठी कीं, जीवित व शील यांद्वारे ही तत्त्वें प्रगट करतील, जगाच्या रूढी, सवयी व चालीरिती यापासून त्यांना वेगळे करण्याची त्याची इच्छा आहे तो त्यांना आपल्या सानिध्यांत आणण्याचा प्रयत्न करीत आहे अशासाठीं कीं त्याची इच्छा त्यांना कळून यावी. CChMara 139.1

इस्राएल लोकांना मिसरांतून बाहेर आणिलें. तेंव्हा त्यांच्याद्वारे जी गोष्ट सिद्धीस नेण्यास देवाने इच्छीने तीच गोष्ट आपल्या लोकांद्वारे सिद्धीस नेण्याचा देवाचा हेतु आहे. CChMara 139.2

मंडळींत प्रगट झालेली देवाची प्रीति, न्याय, दया चांगुलपणा पाहाण्याकडून जगाला त्याच्या शीलाचे प्रतिनिधित्व दिसेल, आणि जेव्हां देवाचे नियमशास्त्र जीवितांत दिसून येईल, तेव्हां जे देवाची सेवा करतात व त्याची भीति बाळगून त्याजवर प्रीति करतात त्यांचे पृथ्वीवरील सर्व लोकापेक्षा असलेले श्रेष्ठत्व जगाला कळून येईल. CChMara 139.3

आपल्या प्रत्येक मुलावर प्रभूची दृष्टी आहे. प्रत्येकाविषयीं त्याची योजना आहे. जे त्याचे पवित्र नियम पाळतात त्यांनी वेगळे लोक असावे असा त्याचा हेतु आहे प्राचीन इस्राएल व हल्लीचें देवाचे लोक यांना मोशाने आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेले शब्द लागू आहेत” तुम्ही तुमचा देव प्रभु याचे पवित्र लोक आहांत. आपले स्वत:चे लोक होण्यासाठी तुमच्या देवाने तुम्हांला निवडिलें आहे. पृथ्वींतील सर्व लोकांपेक्षा श्रेष्ठ असें निवडिलें आहे.” अनुवाद ७:६. CChMara 139.4