आम्ही समाजांत, कुटुंबात किंवा जीवितांच्या कोणत्याही नाते संबंधात असलो मग त मर्यादित किंवा वाढलेला असो, अनेक मार्गांनी आम्ही प्रभूचा स्विकार करतो व अनेक मार्गांनी त्याचा नाकार करूं शकतो. आम्ही आमच्या शब्दाने त्याचा नाकार करूं शकतो. इतरांविषय वाईट बोलण्याकडून, मूर्खपणाच्या भाषणाद्वारे, गंमत करण्याद्वारे, निष्काळजीपणाने किंवा निर्दय शब्दांकडून, किंवा दुटप्पी भाषणाद्वारे किंवा असत्य भाषणाद्वारे आम्ही त्याचा नाकार करूं शकतो. आमच्या शब्दाने आम्ही अशी कबूली होऊ कीं ख्रिस्त आम्हामध्ये नाहीं. आमच्या शीलात आम्ही सुखाच्या गोष्टीवर आवड दाखवून त्याचा नाकार करूं शकतो. आपल्या जीवितांतील ओझे व कर्तव्य झुगारून देण्याकडून व पापीष्ट अशा गोष्टीवर प्रेम करण्याकडून त्याचा नाकार करूं शकतो. आम्ही कदाचित् आमच्या पोषाखाचा अभिमान बाळगून खिताचा नाकार करू शकतो व जगाशी समरुप होण्याकडूनही नाकार करूं शकतों किंवा असभ्य वागणुकीद्वारे नाकार होऊ शकेल. आम्ही आपल्याच मनावर प्रेम करण्याकडून व आपलेच मत खरे आहे हें दाखविण्याकडून नाकारू शकतो. आम्ही आपले मन भावनावश होऊ देऊन प्रेमाने गुरफटून देण्याकडून आणि आमच्या कल्पित अशा कठीण वाटा व छळ यावर धूमसत ठेवण्याकडून त्याचा नाकार करूं शकतो. CChMara 142.2
खर्या रीतीने कोणीही ख्रिस्ताला जगापुढे कबूल करणार नाही. फक्त ख्रिस्ताचे मन व आत्मा त्यांच्यामध्ये राहिल्यानेच त्याला कबूल करूं शकतील. जे आम्हाजवळ नाहीं त्याच्याशीं दळणवळण ठेवणे अशक्य आहे. आमच्या अंतरीं असलेले सत्य व सद्गुणांचे उघड दृष्य, आमचे भाषण व वर्तन याद्वारें प्रगट व्हावें. जर हृदय पवित्र केलेले आहे आणि नम्र व शरण आलेले आहे तर बाह्यात्कारी फळ दिसेल व परिणामकारकरित्या ख्रिस्ताचा अंगिकार केला जाईल. 103T 331; 332. CChMara 143.1
*****