Go to full page →

संशय निर्माण करणें हें सैतानाचें कार्य CChMara 147

पुष्कळ बाबतींत हें संदेश स्वीकारण्यांत येऊन पाप व त्याची आवड घालवून दिली आहेत व देवाने दिलेल्या प्रकाशाप्रमाणे एकदम धर्मसुधारणा सुरू होतें. दुसर्‍य कांही बाबतींत पापिष्ट गोष्टींची आवड घालवून दिली आहे व देवाने दिलेल्या प्रकाशाप्रमाणे एकदम धर्मसुधारणा होतें. दुसर्‍य काहीं बाबतींत पापिष्ट गोष्टींची आवड बाळगली आहे व संदेशाचा धिक्कार करण्यांत आला आहे. हें संदेश नाकारण्याच्या बाबतींत इतरांना खोटीं निमित्ते सांगण्यांत आली आहेत. खरे कारण देण्यांत आलें नाही. त्याचे कारण नैतिक धैर्य व इच्छा यांची त्यांच्यात उणीव आहे. देवाने बळकट केलेली व ताब्यात ठेविलेली इच्छा घातक संवयांना घालवून देते. CChMara 147.1

देव जे संदेश पाठवितो त्यांना अडथळे व संशय सुचविण्याचे सामर्थ्य सैतानाला आहे. पुष्कळांना वाटते कीं, हा सद्गुण आहे व विश्वास न धरता सवय बाळगून शंका काढणे यांत चातुर्य आहे असें त्यांना वाटते. ज्यांना शंका घ्यावयाची आहे त्यांना पुष्कळ जागा आहे. देव अविश्वासाचे सर्व प्रसंग घालवून देत नाहीं. तो पुरावा देतो. जो काळजीपूर्वक व नम्र आणि शिकण्यास लायक अशा वृत्तीने शोध करितो त्यावरून सर्व ठरविलें जाते. देव सरळ मनाला विश्वास धरण्यास भरपूर पुरावे देतो. पण जो कोणी या पुराव्यापासून परत फिरतो कारण काहीं थोड्या गोष्टी त्याला स्पष्ट कळत नाहींत तो आत्मिकरित्या थंड होईल व संशय आणि अविश्वासाचे वातावरण थंड करून विश्वासरुपीं तारू फुटू देईल. CChMara 147.2

संदेशावरील देवाच्या लोकांचा विश्वास दुबळा करण्याची सैतानाची योजना आहे. हल्ला कसा करावा हें सैतानाला माहीत आहे. तो हवा निर्माण करण्यास व कार्याच्या पुढार्‍यांत असतोष निर्माण करण्यांत कार्य करतो. देणग्याविषयीं नंतर शंका येते, मग त्याचा थोडासाच प्रभाव दिसून येतो व दृष्टांताद्वारे दिलेले शिक्षण अवमानले जाते. आपल्या विश्वासाच्या बाबतीत अविश्वास निर्माण होतो व पवित्र शास्त्राविरुद्ध शंका निर्माण होतें व नाशाकडे प्रवृत्ति होतें. एकदा विश्वास ठेविलेल्या संदेशाविषयी संशय धरून तें नाकारले जातात तेव्हां सैतानाला माहीत आहे कीं, जे फसले आहेत तें येथेच थांबणार नाहींत व तें उघड बंड करीपर्यंत तो आपली खटपट करूं शकतो व शेवटीं कांही उपाय न उरून त्यांचा नाश होतो. देवाच्या कार्याच्या बाबतींत संवय धरणे व अविश्वास बाळगल्याकडून व अविश्वासाच्या भावना बाळगून व वाईट हेवा धरून तें पुर्ण अशा फसवणूकीसाठी स्वत:ची तयारी करतात. जे आपले दोष व आपलीं पायें घालवून देण्याच्या बाबतींत धैर्याने बोलतात त्यांच्याविरुद्ध तें कडू भावनेने उठतात. CChMara 147.3

जे सदेशाचा उघडपणे धिक्कार करतात व संशय बाळगतात तें केवळ धोक्यात असतात असें नाहीं. प्रकाशाचा अवमान करणे म्हणजे त्याचा धिक्कार करणें होय. 56711 CChMara 147.4

तुम्ही जर संदेशावरील विश्वास गमावून बसाल तर तुम्ही पवित्र शास्त्राच्या सत्यापासून दूर जाल. मला भीति वाटते कीं, तुम्हांतील कांही जण शंकाखोर व संशयी वृत्तीचे बनतील. त्यांना मी दु:खाने इशारा देतें. किती जण हा इशारा मानतील ! 657 672-680; CChMara 147.5