Go to full page →

मुलांची बाप्तिस्म्यासाठी तयारी CChMara 167

ज्यांच्या मुलांना बाप्तिस्मा घेण्याची इच्छा आहे अशा आईबापापुढे एक महत्त्वाचे काम असतें तें म्हणजे त्यांनी आत्मनिरीक्षण करून आपल्या मुलांना निष्ठापूर्वक शिक्षण द्यावे. बप्तिस्मा हा एक अति पवित्र व महत्त्वाचा संस्कार असून त्याचा अर्थबोध पूर्णपणे होणे आवश्यक असतें. पापाबद्दल पश्चाताप्रवृत्ती व ख्रिस्त येशूमध्ये नवीन जीवनांत प्रवेश, हा त्याचा अर्थ आहे. हा संस्कार घेण्याची घाई करता कामा नये. यासंबधीं ज्या अटी पाळावयाच्या असतात त्या आईबापांनीं व मुलानीं समजून घेतल्या पाहिजेत. आपल्या मुलाच्या बाप्तिस्म्याला जे आईबाप मान्यता देतात तें आपल्या मुलांसंबंधाने विश्वासू कारभारी बनतात व त्याचे शीलसंवर्धन करण्याची गंभीर प्रतिज्ञा करतात. कळपातील या ककरांचे विशेष दक्षतेने संगोपन करूं असें कीं त्यांनी जो विश्वासांगीकार केलेला आहे त्याला ही मुलें दृषण लावणारी नाहीत अशासाठीच आईबाप बांधलेले असतात. CChMara 167.3

अगदी लहानपासूनच मुलांना धार्मिक शिक्षण देण्यांत यावे. त्यांत दोष दाखविण्याची वृत्त नसून उत्तेजनवृत्ति व आनंदी भावना असाव्यात. न कळत स्वरूपात मोहानी मुलांवर झडप घालू नये म्हणून मातांनी त्यांच्यावर कटाक्षेने सतत नजर ठेवण्याची आवश्यकता आहे. शहापणाने व प्रेमळ शिक्षणाने सतत नजर ठेवण्याची आवश्यकता आहे. शहाणपणाने व प्रेमळ शिक्षणाने आईबापांनी मुलावर नजर ठेवावी. अनुभव नसलेल्या या मुलांचे उत्तमोत्तम मित्र म्हणून नजर ठेवावी. अनुभव नसलेल्या या मुलांचे उत्तमोत्तम मित्र म्हणून हरएक गोष्टींत विजयी होण्याचे प्रोत्साहन त्यांना देत राहावे. कारण विजय हा त्यांचा सर्व ठेवा असतो. त्यांनी असा विचार करावा कीं आपली स्वत:ची आवडत मुलें योग्य तें करण्याचा प्रयत्न करीत असतां ती प्रभूच्या कुटुंबातील तरुण सभासद हावीत. स्वर्गीय राजाच्या आज्ञांकितपणाच्या धोपट मार्गाने जाण्यासाठी त्यांना विशेष आवश्यक मदत आईबापांनी द्यावयास पाहिजे. देवाची मुलें होणे म्हणजे काय व त्याच्या आज्ञांकितपणाला वश होणे याविषयींचे त्यांना चित्ताकर्षक रितीने रोज रोज शिक्षण द्यावे देवाशीं आज्ञाकितपणे वागणे म्हणजे आईबापांच्या आज्ञेत राहाणे होय असें त्यास शिकवावे. हें कार्य रोज रोज व घडोघडी करावयास पाहिजे. आईबापान, सावध राहा, सावध राहन प्रार्थना करा व आपल्या मुलाशी मैत्री जोडा. CChMara 168.1

त्यांच्या चरित्रांतील अति सुखाचा काळ येऊन ठेपल्यावर आणि जेव्हां तें आपल्या अंतर्यामांत येशूवर प्रीति करून बाप्तिस्मा घेऊ इच्छितात तेव्हां त्यांच्याशी विश्वासूपणे वागा. बाप्तिस्म्याचा विधि होण्यापूर्वी देवाची सेवा करणे हा त्यांच्या चरित्रातील आद्य उद्देश आहे कीं नाहीं हें विचारून घ्या. या प्रकरणी आरंभ कसा करावयाचा हें सागा. शिक्षणातील प्रारंभी दिलेले धडे फार अर्थभरित असतात. देवाच्या सेवेतील प्रथम गोष्ट कशी करावयाची हें सोप्या भाषेतून शिकवा. जितक्या सोप्या रितीने तें समजून सांगता येईल तितकें तें करा. स्वत:ला प्रभूसाठी देणे व ख्रिस्ती आईबापांच्या सल्लामसलतीने म्हणजे काय हें त्यास स्पष्ट करून सांगा. CChMara 168.2

निष्ठापूर्वक श्रम केल्यानंतर अंतर्यामाचा पालट आणि बाप्तिस्मा याचा अर्थ तुमच्या मुलांना उमगला आहे व त्यांचा खरोखरी पालट झाला आहे असें तुम्हांला समाधानकारक वाटले तर त्यांना बाप्तिस्मा घेऊ द्या. पण मला पुन: एकदा सागू द्या कीं, आज्ञापालनाच्या अरुंद मार्गावरून ती अनानुभविक कॉकरे जात असतां त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी तुम्हीं विश्वासू मेंढपाळ व्हावे म्हणून प्रथमत: स्वत:ची सिद्धता करीत राहा. प्रीति, विनयशीलता, ख्रिस्ती नम्रता व ख्रिस्ताला सर्वस्वी वाहून देणे या बाबतींत आईबापांनी मुलांना आदर्श नमुना व्हावे म्हणून परमेश्वरी कार्य त्यांच्याठायीं चालले पाहिजे. मुलांच्या बाप्तिस्म्याला मान्यता द्यावी व नंतर त्यांना वाटेल तसे वागू द्यावे व सन्मार्गात त्यांना स्थीर करण्याच्या कर्तव्याकडे कानाडोळा करावा व परिणामी मुलांनीं विश्वासांत व धैर्यात कमजोर व्हावें व सत्य गोष्टींत त्याची मने न रमावी असें झाले तर तुम्ही आईबाप स्वत: त्याबद्दल जबाबदार आहां. CChMara 168.3

तरुणापेक्षां वयाने प्रौढ अशा स्त्री-पुरुषांना आपल्या कर्तव्याची अधिक चांगली जाणीव असली पाहिजे पण तरुणांना साहाय्य करणे हें मंडळीच्या पालकांचे काम असतें. वाईट सवया किंवा नाद आहेत काय? या बाबीत त्यांच्या विशेष भेटीगाठी घेणें हें पालकाचें कर्तव्य आहे. त्यांच्यासह शास्त्रवाचन करावे, त्यांच्याशी बोलणे चालणे करावे व त्यांच्यासाठी प्रार्थना कराव्या. प्रभु त्यांच्याकडून कोणकोणत्या गोष्टीची अपेक्षा करीत आहे हें त्यांना स्पष्टपणे दाखवून द्यावे. अंत:करणाच्या पालटाविषय पवित्रशास्त्र काय शिकवते हें त्यांना वाचून दाखवा. पालट झाल्याची फळें काय असतात व त्यांची देवावर प्रीति आहे यांचा पुरावा कशात आढळून येतो हें त्यांना दाखवून द्या. अंत:करण, विचार-आचार व हेतु यांच्यात बदल होणे यालाच खराखुरा पालट म्हणतात हें त्यास दाखवा. वाईट संवया सोडून द्यावयाच्या; अभद्र भाषा, मत्सर, आज्ञाउल्लंघन हीं पापे टाकुन दिली पाहिजेत. शिलांतील प्रत्येक दुष्ट खोडीवर हल्ला केला पाहिजे तेव्हाच कोठे विश्वासणार्‍यांना “मागा म्हणजे मिळेल’ (मत्तय ७:७) हें अभिवचन प्राप्त होईल. 16T 91-99. CChMara 168.4

****