देवानें प्रस्थापित केलेला विवाहसंबंध हा एक पवित्र संस्कार आहे. तो स्वार्थाने कधीच करण्यांत येऊ नये. जे कोणी या प्रकरणीं विचार करतात त्यांनी तो गाभिर्यपूर्वक व प्रार्थनापूर्वक करावा व त्याचे महत्त्व ओळखून घ्यावे. ज्या बाबींचा आपण विचार करीत आहों ती देवाच्या इच्छेनुरूप आहे कीं नाही याचा त्यांनी दैवी मसलतीने शोध केला पाहिजे. देवाच्या वचनात यासंबधींचे दिलेले शिक्षण काळजीपूर्वक विचारात घ्यावे. शास्त्रामध्ये दिलेल्या दिशेच्या अनुरोधाने आस्थापूर्वक जो विवाहसंबंध जुळविण्यांत येतो त्याकडे स्वर्गीय दृष्टि प्रसन्नतेची असते. CChMara 179.7
शांत वृत्तीने आणि निर्विकार न्याय दृष्टीनें जर एकाद्या विषयाचा विचार करावयाचा असेल तर तो विवाहाविषयींचाच विचार होय. सल्लागार म्हणून जर कधीं पवित्रशास्त्राची गरज असेल तर ती जीवनांत दोन व्यक्ति विवाहाने एकत्र येण्यापूर्वी. परंतु सर्वसाधारण परिस्थिति अशी आढळून येते कीं या प्रकरणीं भावनाप्रधान विकाराचेच मार्गदर्शन घेण्यात येते व लहरी प्रीतीने जर्जर झालेली पुष्कळशीं मनें आपल्याच धोरणाला चिकटून राहून कांहींशा नाशाला बळी पडतात. अवांतर विषयांपेक्षा याच विषयांत तरुणांची बुद्धि कमजोर अशी आढळून येते. लग्नाचा प्रश्न त्यावर भुरळच घालीत आहे असें दिसते. तें स्वत:ला देवाच्या हवाली करीत नाहींत. त्यांची ज्ञानेद्रियें गुलामगिरीत सापडलेली असतात आणि आपल्या भागनडींत दुसर्य कोणी ढवळाढवळ करूं नये म्हणून त्यांच्या हालचाली गुप्त ठेवण्यात येतात. CChMara 179.8
पुष्कळजण धोक्याच्या बंदरांतून प्रवासनौकैतून जात आहेत त्यांना वाटाड्याची गरज असतें; परंतु अत्यंत आवश्यक अशी मदत घेण्याचा तें तिरस्कार करतात. आपली नौका आपणच पैलतिरों नेऊ असें त्यांना वाटते. परंतु अज्ञात खडकावर त्यांची विश्वासरूप व सुखाची नौका आदळून छिन्न-विछिन्न होण्यासारखी आहे, हें त्यांच्या लक्षात येत नाहीं...... जर त्या वचनाचा (पवित्रशास्त्राचा) दक्षतेने अभ्यास करणार नाहींत तर तें आपल्या व इतरांच्या सुखप्राप्तींत गंभीर चुका करतील व त्याचा परिणाम त्याच्या साप्रत व भावी जिण्यावर होईल. CChMara 180.1
लग्नाचा विचार करण्यापूर्वी पुरुष व स्त्रिया यांना दिवसांतून दोनदा प्रार्थना करण्याची सवय असेल तर ह्या विचार योजनेसाठी त्यांनी दिवसांतून चारदां प्रार्थना करावी. विवाह ही बाब तुमच्या या जगांतील व येणार्य जगांतील जीवनावर परिणाम करणारी आहे. CChMara 180.2
आमच्या काळचे पुष्कळसे विवाहसंबंध व तें उरकून घेण्याचे मार्ग असें आहेत कीं ती शेवटच्या काळची चिन्हें वाटतात. पुरुष व स्त्रिया इतक्या हेकेखोर व हेकट दिसतात कीं देवाविषयींचा प्रश्न तें झुगारून देतात. जणू काय ह्या महत्त्वाच्या बाबींत धर्माचें कांहीं एक कर्तव्य नाहीं असें समजून तो बाजूला ठेवण्यात येतो. CChMara 180.3