Go to full page →

अयोग्य वर्तन CChMara 183

अंत:करणांचा खेळ करणें हा पवित्र देवाच्या दृष्टीने भयंकर मोठा गुन्हा आहे असें असूनहि कित्येकजण तरुण स्त्रियांना आपली पसती दाखवितील, त्याची माया हस्तगत करतील, नंतर तें आपल्याच मार्गांनी जाऊन आपण दिलेली वचने व त्यावरून घडलेले परिणाम विसरून जातील. दुसरीचा चेहरा त्यांना आकर्षक वाटतो, त्याच वचनांची पुनरावृत्ति करितील व दुसरीलाही तशीच वागणूक देतील. CChMara 183.1

विवाह होऊन गेल्यावर हाच स्वभाव दिसून येईल. लग्न केल्याने चंचल मन नेहमीच बळकट होऊ शकत नाहीं. धरसोड करणारे मन स्थिर होऊन तत्त्वाशी निष्ठ होऊ शकत नाहीं. स्थैर्याचा त्यांना कंटाळा येतो. अशुद्ध विचार व अशुद्ध आचार उघडकीय येऊ लागतात. एवढ्यासाठीच तरुणांनी आपली मानसिक कंबर बाधून आपणास सैतानाने सत्यापासून फसवून नेऊ नये म्हणून आपल्या शिलाचे संरक्षण करणे किती आवश्यक आहे. CChMara 183.2

एकादा तरुण कोणातरी तरुणी मैत्री करून तिच्या समागमात वावरतो. तिच्या आईबापाशीं त्याची ओळख नसते. असला तरुण तिच्याशी किंवा तिच्या आईबापांशी ख्रिस्ती वागणुकीने वागत नाहीं. गुप्तपणे भेटीगाठी घेऊन त्यानें तिचे मन जिंकले असेल. परंतु असल्या वागणुकीने देवाच्या प्रत्येक मुलाच्या अंगीं जी थोरवी व खरेपणा असतो तो त्याला व्यक्त करून दाखविता येत नाही. आपल्या मनांतले हेतु साध्य करण्यासाठी त्याची ती वागणूक घडते. परंतु ती पवित्रशास्त्राच्या शिकवणीप्रमाणे मोकळ्या मनाची व उघडी नसते. म्हणून त्यांच्यावर जे प्रीति करितात आणि जे त्यांचे विश्वसनीय मार्गदर्शक असतात त्याच्याशी त्यांना खरेपणाने वागतां येत नाहीं. असल्या परिस्थिर्तीत झालेलीं लग्ने त देवाच्या शास्त्राधाराचीं नसतात. जो कोणी एखाद्या कन्येला आपल्या कर्तव्यापासून दुरावतो आणि जो कोणी आपल्या आईबापाची आज्ञा पाळ व त्यांचा सन्मान राख ह्या देवाच्या स्पष्ट व निश्चित आज्ञेविषयी भ्रामक कल्पनेने तिच्या मनांत गोंधळ उत्पन्न करितो तों विवाहाचीं बधने खरेपणाने पाळ शकणार नाहीं. CChMara 183.3

“तू चोरी करूं नको” हें देवाने स्वहस्ताने दगडी पाट्यावर लिहन दिले, तरी किती कपटबुद्धीने प्रेमाची चोरी केली जाते व ती क्षम्यहि मानली जाते. अनुभव नसलेल्या तरुणीने आपल्या आईबापांवर असलेले प्रेम कांही प्रमाणात काढून तें एखाद्या तरुणाला देऊन टाकावे व त्यांचे फसवेगिरीचें प्रेमसंबंध व गुप्त व्यवहार चालूच ठेवावेत याचा परिणाम कोणत्या थराला जाऊन पोचेल ह्याची तिला कल्पनाच नसते. हा तरुण आपल्या प्रत्यक्ष कृतीने असें दाखवून देतो कीं तो त्या प्रेमाला अपात्र आहे तोपर्यंत हें असेच चालणार. असल्या प्रकारच्या प्रत्येक अप्रामाणिक व्यवहाराचा पवित्रशास्त्र निषेध करितें. CChMara 183.4

सचोटीनें जीवन जगणारे, स्वत:ला ख्रिस्ती म्हणविणारे लोक अवांतर प्रत्येक बाबींत मोठे चौकस दिसतात, पण तेसुद्धा या प्रकरणी घोडचुका करितात. आपल्या ठराविक व निश्चित समजुतीने तें असें दाखवितात कीं बुद्धिवाद बदलू शकत नाहीं. मानवी भावना व मनोविकार यांत तें इतके गढून गेलेले असतात कीं पवित्रशास्त्राचे संशोधन करून देवाच्या निकट संबधांत यांवें अशी त्यांना इच्छाच होत नाहीं. CChMara 183.5

दहा आज्ञापैकीं एखाद्या आज्ञेच्या उल्लेबनाने पतनावस्था बहुतेक निश्चित असतें. स्त्रीविषयक विनयशीलतेची सरहद्द ओलांडिली कीं अति नीचांतील नीच लंपटपणा निर्माण होतो. हें एक भयंकर पाप आहे असें भासत नाहीं अरेरे, स्त्रियांच्या अनैतिक बळाने आज जगांत कितीतरी भयंकर परिणाम घडत असलेले दिसून येतात ! “पर स्त्रियांच्या” मोहकतेनें हजारों पुरुष तुरुंगवासात डांबून पडलेले आहेत, पुष्कळजण आत्महत्या करितात, पुष्कळ दुसर्‍यांचे खून करितात. “तिचे पाय मृत्युकडे खालीं जातात; तिची पावलें नरकास लागतात,’ हें ईश्वरप्रणित ग्रंथातील शब्द किती सत्य आहेत. CChMara 184.1

घातकी व मना केलेल्या क्षेत्रांत पुरुषांनीं पाऊल घालू नये म्हणून त्यांच्या जीवन चरित्रांत हरएक बाजूने धोक्याचे इषारे देणेत येतात, तरी पण आपल्या बुद्धिविरुद्ध, देवाज्ञेविरुद्ध आणि देवाच्या प्रतिकाराला धाब्यावर बसवून शेकडों लोक त्याच घातकी मार्गाने जाण्याचे पसंत करितात. CChMara 184.2

आपली शारीरिक प्रकृति, आपली कुशाग्र बुद्धिमता व आपले नैतिक जीवन भक्कम राखावयाचे असेल त्यांनी “तरुणपणाच्या वासनापासून दूर पळावे” आम्हात असलेल्या धाडसी लोकांनी वरचढ करणाच्या दृष्टाईला भरभक्कम पायबंद घालण्याचे आस्थापूर्वक व निश्चित असें प्रयत्न केले तर अन्यायी लोकांकडून त्यांचा द्वेष व त्यांची सन्मान नालस्ती केली जाईल, तथापि देवाकडून त्यांचा सन्मान होईल व त्यांना यथायोग्य प्रतिफळ मिळेल. 1 AH 43-57, 70-75 CChMara 184.3

****