Go to full page →

विवाह हा साधा व आनंदमय असावा CChMara 188

ख्रिस्तापासून निर्माण होणारी प्रीति मानवी प्रीतीचा कधीच नाश करीत नाहीं, परंतु मानवी प्रीति त्याच्या प्रीतीमध्ये अंतर्भूत होतें, तिच्यामुळे मानवी प्रीति सरळ, शुद्ध, वरच्या दर्जाची व थोर अशी बनून जाते. मानवी प्रीतीची दैवी शीलाशीं सगम झाल्याशिवाय व स्वर्गीय गोष्टीकडे मन लावण्याची तिला तालीम दिल्याशिवाय तिला उत्कृष्ट फळ देणारी कदापि होता येणार नाहीं. सुखी विवाहसंबंध आणि गृहकारभार येशूला पाहावयास पाहिजे. CChMara 188.4

येशूला व त्याच्या शिष्यांना लग्नासाठी (काना येथे) बोलावण्यांत आलें होतें, असें शास्त्रात सांगितलें आहे. लग्नाचे आमंत्रण दिले असतां त्या उत्साहाच्या प्रसंगाला हजर राहूं नये असें ख्रिस्ताने ख्रिस्ती लोकांस मना केलेले नाही. ईश्वरी आज्ञेचे पालन करण्यांत जे आनंद करितात त्यांच्यासह आम्हीही आनंदी व्हावे हें ख्रिस्ताने या लग्न भोजनास हजर राहून आम्हांला शिकविले आहे. स्वर्गीय कायद्यानुसार मानवांच्या निरापराधी उत्सव-प्रसंगावर येशूनें कधींच पाणी टाकिलें नाही. स्वत: हजर राहून ख्रिस्ताने संमेलनाचा आदर केला. त्याच्या अनुयायांनी तसेच करावें हें यथायोग्य आहे. ह्या मेजवानीला हजर राहिल्यानंतर तो अनेक मेजवान्यांस हजर होता. असें करून त्यानें आपल्या हजरीने व शिक्षणाने त्यांस सुचिर्भूत केलें. CChMara 188.5

जेव्हां उभय पक्ष परस्परांसाठी संपूर्णत: लायक असतात, तेव्हां फार मोठासा भपका किंवा प्रदर्शन करण्याचे कांही कारण नसतें. CChMara 189.1

विवाहसंस्कारामध्ये भपकेबाजपणा, गाणींबजावणी आणि कसली तरी ढोंगे करितात हें मला नेहमीच अप्रस्तुत वाटले आहे. देवाने प्रस्थापित केलेला हा संस्कार आहे व त्याकडे आपण मोठ्या गांभिर्याने पाहावे. इहलोकी जे काटुंबिक संबंध जुळत असतात तें स्वर्गलोकी कसकसे होतील त्यांचे हें दर्शक होत. देवाच्या गौरवाला नेहमीच प्रथमस्थान दिले पाहिजे. CChMara 189.2