आपलें अंत:करण देवाला सादर करण्याचे जर चुकलें तर नवराबायकोने आपापल्या निरनिराळ्या कर्तव्यात रास्त व योग्य जुळवाजुळव करण्याची शिकस्त केली तरी पण कौटुंबिक अडचणींची तडजोड करणे कठीण पडते. आपल्या गृहजीवनांतील बाबी वाटून घेऊन नवराबायकोला आपली प्रीति आणि परस्परांचा परस्परांवरील ताबा सबळ असा कसा ठेविता येईल? गृह बनविण्याच्या कामीं लागणाच्या गोष्टींत त्याची मने एक असावयास पाहिजेत, बायको ख्रिस्ती असली तर तो आपला सोबत म्हणून ती नवर्यांशी सहमताने वागेल. कारण नवरा हा गृहाचा मस्तक असतो. CChMara 194.1
एखाद्या गोष्टीची योग्य अशी तुलना न करिता, आपलीच मते ओढून धरून त्याचा काय परिणाम होतो हें न पाहाता व जेव्हां आपल्या मताप्रमाणे आपल्या बायकोची मते नाहीत, हें तुम्हांला कळत असतां प्रार्थनातून व बोलण्यातून ती व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य मला आहे, अशी ही तुमची मनाची दृष्टि चुकीची असतें. आपल्या पत्नीच्या भावनांचा आदर न राखिता सभ्य गृहस्थाप्रमाणे मतभेदाच्या बाबी दिलदारपणे बाजूला न सारिता आणि आसपासच्या मंडळीपुढे तुम्ही आपलेच हेकडपणाचे घोडे ढकलीत राहातो. तुम्हांला वाटते त्याहून वेगळे वाटण्याचा इतरांना हक्क नाही, अशीच तुमची मनोभावना झालेली असतें. ख्रिस्ती वृक्षावर असली फळें येत नसतात. CChMara 194.2
माझ्या बंधुभगिनींनो, येशूचा स्वीकार करण्यासाठीं अंत:करणाचे द्वार खुले करा. आत्मिक मदिरात उपस्थित होण्याचे त्याला आमंत्रण द्या. सर्वांच्या वैवाहिक जीवनांत घुसणारी. विघ्ने पायाखाली तुडविण्यास प्रत्येकाला हातभार लावा. तुमचा शत्रू सैतान यांशी झुंजावयाची धडपड भयंकर खरी, तरी जर या लढ्यात तुम्हांला देवाचे साह्य पाहिजे असेल, तर तो जिंकण्यासाठी तुम्ही उभयता ऐक्याने कंबर कसली पाहिजे, अनीतिचे कसलेहि शब्द तोंडात येऊ नयेत. जर गुढ्यावर टेकून बोलावयाचे तर मोठ्यानें बोला कीं, “माझ्या आत्म्याच्या शत्रूला धिक्कारून लाव.” CChMara 194.3
जर देवाची इच्छा परिपूर्ण केली तर नवरा व बायको परस्परांना आदर देऊन प्रीतीचे वे निष्ठेचे संवर्धन करितील. कौटुंबिक शांतींत आणि ऐक्यांत येणारे प्रत्येक अडखळण जोराने झुगारले पाहिजे. मायाळूपणा व प्रेमळता यांना चिकटून राहिले पाहिजे. कळवळा, श्रमाशीलता व प्रेम ज्याच्याद्वारे व्यक्त होतात. त्यांचेच प्रतिबिंब त्याजवर पडल्याचे आढळून येईल. जेथे देवाच्या आत्म्याचा अधिकार चालतो तेथें विवाह सबधाच्या लायकी नालायकीचा शब्दच निघणार नाही. ऐश्वर्याची आशा जो ख्रिस्त त्यांचा अंतर्यामीं राहणारा ख्रिस्त हा नवर्यांच्या अंतर्यामी वसत असलेल्या ख्रिस्ताशीं सलोख्यानेच राहील. ख्रिस्तावर प्रीति करणाच्यासाठी तो जागा तयार करावयास गेलेला आहे. त्या जागेसाठी हीं उभयता एक चिताने प्रयत्न करतील CChMara 194.4
विवाहसंबंध हा देवाने घालून दिलेला पवित्र संस्कार म्हणून जे लेखितात व त्याच्या पवित्र नियमाने ज्याचे संगोपन होत आहे असें जे मानितात त्यावर बुद्धीसामर्थ्याचा पगडा असतो. CChMara 195.1
विवाह जीवनांत कधीं कधीं पुरुष व स्त्रिया हुकट मुलाप्रमाणे गैरशिस्तपणे वागतात. नवर्यचा एक मार्ग व बायकोचा दुसरा व दोहोंपैकी एकहि नमते घ्यावयास तयार नसतो. असल्या परिस्थितींत अत्यंत मोठे दु:ख मात्र पदरी पडते. उभय नवराबायकोने आपापला मार्ग अगर हेका सोडून देण्यास तयार व्हावे. आपल्याच लहरीप्रमाणे करण्याचा जर तें दोघेहि हेका धरतील तर त्यांना सुखप्राप्ति लाभणे ही एक अशक्य कोटींतील गोष्ट होय. 2 AH 118-121; CChMara 195.2
परस्परांमधील सहनशीलता व प्रेम या व्यतिरिक्त जगांतले कोणतेहि सामर्थ्य तुम्हां नवराबायकोला ख्रिस्ती ऐक्याच्या बंधनांत ठेवू शकत नाहीं. विवाहदत्त सोबत नाजूक, पवित्र आणि एवढी भारदस्तीची असावी कीं, तिने तुमच्या जीवनकलेंत आत्मिक शक्ति निर्माण करावी व शास्त्रांत निवेदन केल्याप्रमाणे तुम्हांला एकमेकांसाठी प्रत्येक गोष्ट करता येईल. प्रभूच्या इच्छेनुरुप तुम्ही असावे त्या स्थितींत आला कीं तुमच्या आसपास स्वर्गीय वातावरण आणि तुमच्या जिण्यांत देवच आढळून येईल. CChMara 195.3
माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, देव प्रेमस्वरूप आहे आणि त्याच्या कृपेने तुम्हीं विवाहप्रसंगी वचन दिल्याप्रमाणे परस्परांना सुखी करण्यांत यशस्वी होऊ शकाल. 3 AH 112;. CChMara 195.4
स्व:वरच व स्वार्थावर खिस्ताच्या दयने तुम्हांला विजय मिळविता येईल त्याच्या जिण्याप्रमाणे तुम्ही स्वत: जगू लागला व पदोपदी रचनाकार बुद्धि दाखविली व ज्यांना ज्यांना तुमच्या साह्याची गरज आहे त्यांना नेहमीच अधिकाधिक सहानुभूति दाखविली तर तुम्हांला विजयावर विजय संपादन करता येईल. “स्व. ला कसें जिंकावयाचे आणि शीलांतील उणेण कसे भरून काढावयाचे हें तुम्हांला दैनदिन चागले हस्तगत करिता येईल. प्रभू येशु हा तुमचा प्रकाश, तुमचे बळ आणि तुमच्या आनंदाचा मुकूदमणि असा होईल, कारण तुम्ही आपली इच्छा त्याच्या इच्छेसाठी देऊन टाकली आहे. 47T 49. CChMara 195.5
****