मुलें हीं आईबापाच्या हवाली केलेली मौल्यवान ठेव आहे व कधीं तरी देव ती त्याच्यापासून मागणार आहे. त्यांच्या शिक्षणाप्रित्यर्थ आम्हीं अधिक वेळ देऊन अधिक काळजी व प्रार्थना करावयाला पाहिजे, योग्य प्रकारच्या अधिक शिक्षणाची त्यांना आवश्यकता आहे. CChMara 204.4
गृहकारभारातील चुकांमुळे पुष्कळदा मुलें आजारी पडतात असें आढळून आलेले आहे. खाण्यापिण्यांत अनियमितपणा, सायकाळच्या थंड हवेसाठी अपुरा कपडालत्ता, योग्य प्रकारच्या रुधिराभिसरणासाठी जोमदार व्यायामाची उणीव, शुद्धतेसाठी भरपूर हवेचा अभाव, हीच व्याधींची कारणें असू शकतील. आजाराच्या कारणाची आईबापांनी चौकशी करून शक्य तितकी लवकर उपाय योजना करावी. CChMara 204.5
साधारणत: मुलें बाळपणापासून खादाड बनतात व खाण्यासाठी जगण्यास त्यांना शिकविण्यात येते. आपल्या मुलांचे शील बनविण्याच्या कामीं आई पुष्कळ खटपट करीत असतें. भूक ताब्यात धरण्याचे आई शिक्षण देऊ शकते अगर इतके खाण्यास देऊन त्यांना खादाड बनवू शकते, वारंवार आई दिवसभरासाठी कांही तरतूद करून ठेविते, परंतु मुलें जेव्हां त्रास देतात तेव्हां त्यांची समजूत घालण्याऐवजी किंवा त्यांचे दुसरीकडे लक्ष वेधण्याऐवजी त्यांना शांत करण्यासाठी काहींतरी खावयास देंतें ; यामुळे थोडा वेळ कार्य साधले जाते पण परिणामी स्थिति अधिक वाईट मात्र होतें. अन्नाची काहीं एक गरज नसता त्यांची पोटें फुगलेली असतात. आईनें थोडासा वेळ व थोडसे लक्ष द्यावयाची जर कोठे गरज असेल तर ती येथेच होय. परंतु मुलांच्या नादांत तिला आपला मौल्यवान् वेळ द्यावयास नको असतो. आपण आपल्या घराची टापटीप कशी थाटाने ठेवितो, हें पाहुण्यांनी पाहून तिची स्तुति करावी व स्वयपाकपाणी करण्याची आपली शैली कशी शिष्टमान्य आहे याचे प्रदर्शन करण्यांत यावे म्हणून कीं काय तिला आपल्या मुलाबाळांच्या सौख्यापेक्षा व आरोग्यापेक्षा तें अधिक विचारणीय असेच कदाचित् वाटत असेल. CChMara 204.6
लहान बाळाच्या कपड्यालत्याच्या, सुखसोईच्या व आरोग्याच्या तरतुदीची व्यवस्था लावणे हें कार्य नुसत्याच पोकळ ऐटीपुढे अगर जनतेच्या कौतुकी दृष्टीपुढे केव्हाह प्रथम दर्जाचे मानिले पाहिजे. छोटे छोटे कपडे चांगले दिसतात म्हणून मातेने त्यावर वेलबुट्टीचे व नकशीचे काम करूं नये. तें परिश्रम अनावश्यक असून तिच्या व मुलांच्या आरोग्याला धोक्याचे ठरेल. ज्यावेळी तिला भरपूर विसाव्याची व साध्यासोप्या व्यायामाची गरज आहे तेव्हां तिने मानपाठ एक करून शिवीत बसू नये. तें तिच्या डोळ्यासाठी व मज्जातंतूसाठी फार अपायकारक होईल तिला जो भार वाहावयाचा आहे तो वाहाता यावा म्हणून तिने आरोग्य राखण्याचे आपले कर्तव्य ओळखून घ्यावें. 2AH 255-267; CChMara 205.1