Go to full page →

प्रकरण ३५ वें - गृहजीवनांतील नैतिक बळ CChMara 216

आमच्या कुटुंबामधून इश्वरी तारणाचा उपभोग आम्हांला घेता येईल. परंतु तत्संबधींचा आमचा विश्वास पाहिजे, तत्प्रीत्यर्थ आम्हीं जगले पाहिजे व देवावर आमचा निरंतरचा व चिरस्थायी विश्वास व श्रद्धा असली पाहिजे. देवाच्या शास्त्राने आम्हांस जो नियमितपणा घालून दिलेला आहे, तो आमच्या हितासाठींच आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबाचे व आमच्या शेजाच्यापाजार्‍यचे सौख्यसवर्धन होतें. त्या तारणप्राप्तीमुळे आमची आवड सुसंस्कृत होतें, आमची न्यायबुद्धि शुद्ध होतें, आम्हांला मानसिक शांति लाभते व अखेरीस सार्वकालिक जीवन प्राप्त होतें. सेवा करणारे देवदृत आमच्या वस्तीसभोंवार राहून आमच्या धार्मिक जीवनांत होत असलेल्या प्रगतीची आनंददायी बातमी स्वर्गाकडे पोचवतील आणि नोंद करणारे देवदूत आमची उत्साहदायी व सुखदायी नोंद करून ठेवितील. CChMara 216.1

आमच्या गृहजीवनांत ख्रिस्ताचे नैतिक सामर्थ्य चिरकाले वस्ती करून राहील. जर स्त्रीपुरुषांनी सत्याच्या व प्रेमाच्या स्वर्गीय सत्तेसाठ आपली अंत:करणे उघडी ठेविली तर निर्जल वनामध्ये जसा पुन:प्रवाह वाहू लागतो तशी हीं तत्त्वे त्यांच्या अंतर्यामात वाहू लागतील, आणि जेथे आतां रुक्षता व उणीवता दिसून येत आहे तेथें नवीनता आढळून येईल. CChMara 216.2

ज्या गृहात धार्मिकतेची बेपरवाई व आपल्या मुलांना शिक्षण देण्यांत निष्काळजी असतें तें गृहपरमेश्वराला अत्यंत नापसंत असतें. जर तुमचे एखादें मुल नदीच्या प्रवाहांत पडून तळाशीं झगडत असेल व बुडण्याच्या संकटात सापडले असेल तर केवढी मोठी खळबळ उडून जाईल! त्याचा प्राण वाचविण्यासाठी किती तरी धडपड करण्यांत येईल, प्रार्थना करण्यांत येतील व किती धांदल दाखविण्यांत येईल ! पण ही पाहा तुमची मुलें ख़िस्तवहित आहेत व त्यांच्या आत्म्यांचे तारण झालेले नाहीं. कदाचित् ती उलटव उर्मठ असतील तर अॅडव्हेंटिस्ट मंडळीच्या नांवाला ती किती लज्जास्पद गोष्ट आहे. आशाहीनतेमध्ये व देवहीनतेमध्ये त्याचा या जगीं नाश होत आहे व तुम्ही तर त्याविषयी निष्काळजी व बेपरवाई आहा. CChMara 216.3

लोकांना देवापासून परावृत्त करण्याचा सैतान हरएक प्रयत्न करीत असतो. धार्मिक जीवन जेव्हां व्यवहारिक कामधंद्यांच्या विवचनेत बुडून गेलेले असतें, तेव्हां शास्त्रवचन करायाला, एकांतांत प्रार्थना करायाला आणि सकाळ संध्याकाळीं उपकारस्तुतीचीं अर्पणे प्रभूच्या वेदीवर अर्पण करायाला त्यांना फुरसतच मिळु नये. एवढी त्यांची मने सैतान व्यवहारात गुंतवून टाकतो. कितीतरी थोडक्यांना ह्या बिलंदर फसव्याचे डाव ध्यानात येतात! त्याच्या करामतींविषयी किती तरी लोक अज्ञानाधकारांत असतात ! CChMara 216.4