Go to full page →

आर्थिक बाबींत पति-पत्नीस मसलती CChMara 222

हिशेब कसा ठेवावा हें सर्वांनी शिकून घेतले पाहिजे. याची काहीं आवश्यकता नाहीं असें समजून त्याच्याकडे काहीजण काना डोळा करतात. पण हें अगदी चुकीचे आहे. खर्चाच्या सर्व बाबी बिनचूक निवेदन कराव्यात. 14 AH 374;. CChMara 222.2

करावयास पाहिजे तशी तुम्हीं काटकसर केली असेल तर आज एकाद्या निकडीच्या कामासाठी आणि देव कार्यास हातभार लावण्यासाठी तुम्हांजवळ निश्चित साहित्यसाधन संग्रहीं असले पाहिजे. आठवड्याच्या आठवडी आपल्या मिळवतींतून कांही भाग बाजूला ठेविता येईल. अत्यंत निकडीची गरज असल्याशिवाय किंवा दान देणार्‍यला परत अर्पण म्हणून द्यावयाचे असल्याशिवाय त्याला स्पर्शच करण्यांत येऊं नयें. CChMara 222.3

तुम्हीं आपल्या मिळकतीचा चतुराईने व काटकसरीने खर्च करून प्रसंगविशेषासाठीं कांही शिल्लक ठेविली नसेल तर कुटुंबातील आजारासाठी आणि घरखर्चात कमी पडले तर काय ? अडचणींत सापडल्यावर कुटुंबाच्या आधारासाठी कांही तरी शिल्लक असणे इष्ट असतें. 15 AH 395, 396; CChMara 222.4

तुम्हीं परस्परास साह्य केले पाहिजे. आपल्या पैशांची पिशवी न उघडतां पत्नीला पैसे देण्याचे नाकारणे हा काहीं नवर्‍यचा प्रताप आहे असा समज करून घेऊ नका. CChMara 222.5

पत्नीला आवडेल त्याप्रमाणे खर्च करण्यासाठी तुम्ही आठवड्याच्या आठवड्याला काहीं रक्कम तिला देत जावी. पत्नीचे स्थान काय आहे हें तुम्हांला योग्य प्रकारे आकालन करिता आलें नाही म्हणून तिच्या चतुराईचा कौशल्याचा उपयोग करण्याची तिला संधिच दिली नाहीं. तुमच्या पत्नीलाही उत्कृष्ट व समतोलमन असतें. CChMara 222.6

तुमच्या उत्पन्नाचा कांही भाग बायकोला देऊन टाकीत जा. तो तिचाच असून तिच्या इच्छनुसार तिला त्याचा विनियोग करूं द्या. तिच्या मिळकतीची रक्कम तिला योग्य दिसेल त्याप्रमाणे तिला खर्च द्यावी, आपल्या स्वत:साठींच तिला एखादी रक्कम देण्यांत आली असती व तत्सबर्थी काहीं टीका वगैरे केली नाहीं तर तिच्या मनावरचे मोठे ओझे कमी झाले असतें. 16AH 378. CChMara 222.7

*****