Go to full page →

देवाच्या उद्देशाला आद्यस्थान CChMara 223

देवानें आम्हांला कसकसे वागवून घेतले आहे याचे मनांत पुन: स्मरण करून देवाप्रीत्यर्थ सणावारांचा उपयोग करणे किती चांगले होईल? त्याच्या गत आशीर्वादांचा विचार करावा आणि आम्हांला त्याचे विस्मरण पडू नये म्हणून त्यानें दिलेल्या परिणामकारक इषाच्याचे स्मरण करावे हें किती चांगलें होईल? CChMara 223.5

जगांत पुष्कळ सणवार आहेत. तेव्हां क्रिडांगणांतील मौजेत, शर्यतीत, जुगारींत, धुम्रपानांत व मद्यपानात मानवजात गुग होऊन जाते. CChMara 224.1

देवाच्या मौल्यवान आशीर्वादाबद्दल त्याची उपकारस्तुति करण्यासाठी त्याच्या लोकांनी वारंवार एकत्रित होऊ नये काय? CChMara 224.2

तरुण स्त्री-पुरुषांच्या हस्ते व्यवहारिक सेवा करणार्‍यांचा संघ निर्माण करता येईल अशा लायक मंडळीच्या सभासदांची आम्हांला गरज आहे. मानवतेच्या गरजा भागवून स्त्री-पुरुषांच्य व तरुण व मुलें यांच्या आत्म्याच्या तारणासाठी त्यांना परिश्रम करण्यासाठी त्या संधीची सिद्धता करण्यांत यावी. त्यांना आपली रोजची मोलमजूरी करणे असल्यामुळे त्या सेवेसाठी त्यांना आपला सर्व वेळ देता येणार नाही. तरी त्यांना सुट्या असतात व प्रसंगही मिळतात तेव्हां जरी त्यांना फारसे आर्थिक साह्य देतां आलें नाहीं, तरी या प्रकारे ख्रिस्ती सेवेसाठी काहींतरी करता येण्यासारखे आहे. CChMara 224.3

जेव्हां तुम्हांला सुटी असतें तेव्हां तो दिवस आपल्या मुलाबाळांसाठी आनंदाचा व सौख्याचा करा. त्याचप्रमाणे गरिबींत व अडचणींतल्या लोकांसही तो दिवस सुखदायी असा करा. उपकारस्तुती व आभारदर्शकदाने येशूला सादर केल्याशिवाय तो दिवस जाऊ देऊ नका. CChMara 224.4