Go to full page →

सांगता न येणारा दृष्टांत CChMara 24

१८९० च्या नोव्हेंबर महिन्यांत न्यूयार्कमधील सालामंका येथे भरलेल्या सभेत मिसेस व्हाईट जमलेल्या मोठ्या जमावांत भाषण करीत होत्या. शहराला जातांना फार सर्दी झाली असल्यामुळे त्यांना अशक्तपणा वाटू लागला. सभेनंतर त्यांना बरे वाटेना म्हणून त्या निराश होवून आपल्या खोलीकडे गेल्या. त्या देवापुढे अंत:करण उघडून त्यांना देवापासून आरोग्य, शक्ति व दया प्राप्त व्हावी म्हणून प्रार्थना करण्याचा विचार करूं लागल्या. आपल्या खुर्चीवर टेकून, गुडघे टेकल्यावर स्वत:च्या शब्दांत त्यांनी घडलेल्या सर्व बाबीविषयी जे सांगितलें तें असें: CChMara 24.4

“मी बोलण्यास सुरुवात करण्याअगोदरच शांत अशा रुपेरी प्रकाशाने सर्व खोली भरून गेली व माझी निराशा झाली. मला समाधान वाटून आशा व ख्रिस्ताची शांति प्राप्त झाली. CChMara 24.5

मग त्यांना दृष्टांत झाला. दृष्टांतानंतर त्या झोपल्या नाहीत किंवा त्यांनी विसावा घेतला नाही. त्या बर्‍य झाल्या व त्यांना आराम वाटला. CChMara 24.6

सकाळीच निश्चय केला पाहिजे. आता त्यांनी बॅटलक्रिकला परत जावे किंवा सभा दुसर्‍य ठिकाणी भरते तेथें जावे? एल्डर ए.टी.रॉबीनसन, कार्य पुढारी व एल्डर व्हाईट, आणि मिसेस व्हाईट यांचा मुलगा हें दोघे मिसेस व्हाईट यांचे मत काय आहे हें विचारण्यासाठी त्यांच्या खोलीवर गेले. त्यांना त्या पोशाख केलेल्या बर्‍य अशा आढळल्या. त्या जाण्यास तयार होत्या. त्यांनी स्वत:स बरे कसे वाटू लागले तें सांगितलें. त्यांनी आपला दृष्टांत सांगितला. त्या म्हणाल्या “काल रात्री मला प्रकट करण्यांत आलें तें मी आपणाला सांगू इच्छिते. दृष्टांतांत मी बॅटलक्रिकमध्ये आहे असें मला वाटले. संदेश देणारा दूत म्हणाला, “माझ्यामागे ये” त्या माघार घेऊ लागल्या. त्यांना कांही त्याची आठवण होईना. दोनदा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना दाखविण्यांत आलें याची त्यांना आठवण होईना. मग कांही दिवसानी त्यांनी जे पाहिलें होतें तें लिहन काढिले तें धार्मिक स्वातंत्र्य या मासिकाच्या योजनेसंबंधाने होतें. ज्याचे त्यावेळचे नाव “अमेरिकन पहारेकरी” असें होतें. CChMara 24.7

“रात्रींच्या वेळी मी वेगवेगळ्या सभांना हजर होतें आणि त्यात कांही वजनदार माणसांनी पुढील उद्गार काढिले. मी ऐकिले कीं, जर अमेरिकन ‘पहारेकरीमधील’ सेवंथ डे अँडव्हेंटिस्ट हें शब्द गाळून टाकले व शब्बाथाचा त्यात कांही उल्लेख केला नाही तर जगांतील थोर पुरुष त्याला पाठिबा देतील व त्याचे ख्याति होईल आणि त्याकडून मोठे कार्य होईल हें फार चांगले आहे असें वाटले.” CChMara 25.1

“मी त्याचे चेहरे टवटवीत झालेले पाहिलें. हें मासिक जगप्रसिद्ध करण्याचा तें प्रयत्न करूं लागले. ज्यांच्या अंत:करणात व आत्म्यांत सत्याची गरज होती अशा मनुष्यांनी हें सर्व सुचविले. CChMara 25.2

हें खरे आहे कीं त्यांनी कांही माणसें या मासिकाच्या संपादकीय नियमाविषयी बोलताना पाहिलें. १८९१ च्या मार्च महिन्यांत जेव्हां जनरल कान्फरन्स सुरू झाली तेव्हां रोज सकाळी ५।। वाजता सर्व कामगरांशी बोलावे म्हणून मिसेस व्हाईट यांना सांगण्यांत आलें. एवढेच नव्हे पण शब्बाथ दिवशी दुपारी जमलेल्या ४००० लोकांना उपदेश करण्यासह विनंती करण्यांत आली. शब्बाथ दुपारी त्यांनी पुढील ओवी घेतली होती “तुमचा उजेड लोकांपुढे पडो यासाठी कीं, त्यांनी तुमची चांगली कामे पहावी आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे’ सर्व उपदेशाचा सार म्हणजे से.डे.अं. लोकांना त्यांच्या विश्वासाचा दर्जा स्पष्टरित्या पुढे धरण्यास केलेली विनति होती. उपदेशाच्या वेळी तीनदा सालामंका येथील दृष्टांत सागण्यास सुरुवात केली, पण प्रत्येक वेळी त्यांनी आवरून धरले. दृष्टांतातील गोष्टी विसरून जात. मग त्या म्हणाल्या, “याविषयी मी पुढे पुष्कळ सागेन.” त्यांनी सुमारे एक तासभर उपदेश केला. शेवट चांगला करून सभा संपली. सर्वांना कळून चुकले कीं त्यांना दृष्टांत आठवत नाही. CChMara 25.3

जनरल कॉन्फरन्सचे प्रेसिडेंट त्याच्याकडे आलें व उद्या सकाळची सभा घेता का म्हणून विचारू लागले. CChMara 25.4

त्या म्हणाल्या, “नाही, कारण मला थकवा आला आहे. मी माझी साक्ष दिली आहे. तुम्ही सकाळच्या सभेसाठी दुसर्‍य योजना करा” दुसर्‍य योजना करण्यांत आल्या. CChMara 25.5

मिसेस व्हाईट घरी येत असतां त्यांनी आपल्या कुटुंबातील सभासदाना सांगितलें कीं त्या उद्या सकाळच्या सभेला हजर राहणार नाहीत. त्यांना थकवा आला होता व त्या चांगला विसावा घेणार होत्या. रविवारी सकाळी त्या झोपणार होत्या व तशी योजना करण्यांत आली. CChMara 25.6

त्या रात्री कान्फरन्सची सभा संपल्यानंतर रिव्यू अँड हेराल्डच्या कचेरीत कांही माणसांचा जमाव जमला होता. त्या सभेत पब्लिशिंग हाऊसचे प्रतिनिधी होतें तें ‘अमेरिकन पहारेकरी पत्रकाचे चालक होतें. त्याशिवाय रिलिजिअस लिबर्टी असोसिशनचेहि प्रतिनिधी होतें. तें एकत्र जमून ‘अमेरिकन पहारेकरी’ या पत्रकाच्या संपादकीय नियमाच्या त्रासमूलक प्रश्नाविषयी चर्चा करीत होतें. दार बंद करण्यांत आलें. या प्रश्नाचा निकाल लागेपर्यंत दार उघडायचे नाही असें सर्वांनी कबूल केले. CChMara 26.1

रविवारी पहाटेस ३ वाजण्याअगोदर कामकाज न संपविता बैठक थांबली. रिलिजिस लिबर्टीच्या मनुष्यांनी असें विधान केले कीं, पॅसिफिक प्रेसने आमचे म्हणणे ऐकून ‘सेवंथ डे अॅडव्हेंटिस्ट’ आणि ‘शब्बाथ’ हें शब्द या पत्रकातून वगळण्याचे कबूल केल्याशिवाय हें पत्रक रिलीजिस लिबर्टी असोसिएशनचे पत्रक म्हणून त्याचा उपयोग करण्यांत येणार नाही. त्याचा अर्थ हें पत्रकच बंद पाडायचे. त्यांनी दार उघडले व माणसें आपापल्या खोलीकडे गेली व झोपली. CChMara 26.2

पण जो देव कधीं डुलकी नाही कीं ज्याला झोप येत नाही त्यानें आपला दृत पहाटेस तीन वाजता मिसेस व्हाईट यांच्या खोलीकडे पाठविला. त्या आपल्या झोपतून जाग्या झाल्या व त्यांना सांगण्यांत आलें कीं त्यानी ५।। वाजता कामगारांच्या सभेला जावे व सालामंका येथे त्यांना जे दाखविण्यांत आलें तें त्यांनी सागावे, त्यांनी पोशाख केला व कपाटाकडे गेल्या आणि सालामंका या ठिकाणी त्यांना जे दाखविण्यांत आलें होतें त्याची नोंद त्यांनी ज्या मासिकात केली होती तें त्यानी घेतले. त्यांना तो देखावा जसा जास्त स्पष्ट आठवू लागला तसा त्यांनी आणखी लिहून काढला. CChMara 26.3

पाळक लोक सभामंडपातील प्रार्थनेतून नुकतेच उठले असतां मिसेस व्हाईट आपल्या काखेत कागदाची गुंडाळी घेऊन येतांना दारांत दिसल्या. जनरल कान्फरन्सचे प्रेसिडेंट भाषणकार होतें तें म्हणाले - CChMara 26.4

“सिस्टर व्हाईट” तुम्हांला भेटण्यास आम्हांला आनंद होतो. आमच्या करिता आपल्याजवळ कांही संदेश आहे का? CChMara 26.5

“होय आहे” असें म्हणून त्या पुढे बोलू लागल्या व काल जेथे त्या थांबल्या होत्या तेथून त्यांनी सुरुवात केली, पहाटे ३ वाजता मला झोपेतून उठविण्यांत आलें व ५।। कामगाराच्या सभेस हजर राहून सलामका येथे जे दाखविण्यांत आलें तें सांगण्यास बजाविले. CChMara 26.6

त्या म्हणाल्या, “दृष्टांतात बॅटलक्रिक येथील रिव्ह्यू अँड हेराल्डच्या ऑफिसात मला नेण्यांत आलें व दृताने माझ्या मागे ये’ अशी मला आज्ञा केली. तेथें कांही माणसें मनापासून एका गोष्टीचा खल करीत होती. त्या खोलीत मला नेण्यांत आलें. तेथें आवेश आढळून आला पण माहितीप्रमाणे नव्हता” अमेरिकन पहारेकरीच्या संपादकीय नियमाविषयी कसे तें बोलत होतें तें त्यांनी सांगितलें आणि त्या म्हणाल्या, “एका मनुष्याने पहारेकरी पत्रकाची एक प्रत हातांत घेवून म्हटले कीं, शब्बाथ व द्वितीयागमन याविषयीवरील लेख या पत्रकातून काढून टाकल्याशिवाय हें पत्रक रिलीजिअस लिबर्टी असोसिशयनचा एक भाग या नात्याने याचा उपयोग केला जाणार नाही. महिन्यापूर्वी दृष्टांतांत दाखविलेल्या सभेविषयी एलन व्हाईट बोलू लागल्या व त्यानुसार सल्ला देऊ लागल्या, मग त्या खालीं बसल्या. कारण एक मनुष्य खोलीच्या मागील बाजूस उभा राहून बोलू लागला. “गेल्या रात्री मी त्या सभेत होतो.” CChMara 26.7

जनरल कॉन्फरन्सच्या अध्यक्षाला काय करावे हेच समजेना कारण अशा सभेविषयी त्यानी कधीं ऐकले नाही. परंतु त्याचे स्पष्टीकरण मिळण्यासाठी त्यांना फार वेळ थांबावे लागले. CChMara 27.1

गेल्या रात्री ? मला वाटले कीं ती सभा कांही महिन्यामागे भरविण्यात आली होती असें दृष्टांतांत मला दाखविण्यांत आलें.” असें मिसेस व्हाईट म्हणाल्या. CChMara 27.2

तो मनुष्य म्हणाला, “मी त्या सभेत गेल्या रात्री होतो व पत्रकांतील लेखाविषयी माझ्या डोक्यावर उंच पेपर धरून बोलणारा मीच मनुष्य आहे. मला सांगण्यास दु:ख वाटते कीं, मी चूक केली. पण ही चूक दुरुस्त करण्यासाठी ह्या संधीचा फायदा घेतो.” तो खालीं बसला. CChMara 27.3

दुसरा मनुष्य बोलण्यास उभा राहिला तो रिलिजिअस लिबर्टी असोसिएशनचा प्रेसिडेंट होता. त्याचे शब्द पहा “मी त्या सभेत होतो. कॉन्फरन्स गेल्या रात्री संपल्यावर आमच्यापैकी काहीजण रिव्ह्यू ऑफिसमधील माझ्या खोलीत गोळा झाले. दार लावून आज सकाळी त्या बाबीविषयी आम्ही एकले त्याविषयी बोलत बसलो. आम्ही त्या खोलीत पहाटे तीन वाजेपर्यंत होतो. जर मी तेथें काय घडले व त्या खोलीतील लोकांची वृत्ति याविषयी वर्णन करूं लागलो तर सिस्टर व्हाईट यांनी जितकी हुबेहूब व बरोबर माहिती दिली तितकी मला देता येणार नाही. आता मला समजते कीं मी चुक केली आहे व आज सकाळी मला जो प्रकाश देण्यांत आला तो मिळाल्यावर माझी चूक मला दिसून आली.” CChMara 27.4

त्या दिवशी दुसरेहि बोलले, त्या बैठकीत गेल्या रात्री जे होतें त्या प्रत्येकाने उभे राहून तशीच साक्ष दिली व म्हणाले कीं, मिसेस व्हाईट यांनी हबेहब सभेचे व खोलीत असणार्‍यांच्या वृत्तीचे वर्णन केले आहे. त्या रविवारी सभा सपण्याअगोदर रिलिजिअस लिबर्टीची माणसें एकत्र बोलावण्यांत आली व त्यांनी केवळ पाच तासापूर्वी केलेला ठराव रद्द करण्यांत आला. CChMara 27.5

जर मिसेस व्हाईट यांनी न थांबता तो दृष्टांत शब्बाथ दिवशी दुपारी सांगितला असतां तर त्यांच्या संदेशाचा हेतु देव योजनेप्रमाणे सिद्धीस गेला नसता. कारण ती बैठक त्यावेळी भरली नव्हती. CChMara 27.6

शब्बाथ दिवशी दुपारी देण्यांत आलेला सल्ला बर्‍यच माणसांना आवडला नाही. त्यांना वाटले कीं त्यांनाच चांगली माहिती आहे. कदाचित् आज जसे कांही जण म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी ठरविले असेल. तें असें, “कदाचित् सिस्टर व्हाईटना समजले नसेल किंवा आम्हीच वेगळ्या काळांत राहात आहोत किंवा तो सल्ला कांही वर्षांमागे लागू होता, आता लागू नाही.” ज्या विचारांनी सैतान या दिवसात फसवितो त्याच विचारांनी त्यानें १८९१ सालातील माणसांना मोहात पाडले. देवाने स्वत:च्या योजनेने व स्वत: ठरविलेल्या वेळी स्पष्ट केले कीं, हें त्याचे काम आहे; तो मार्गदर्शन करीत होता व संरक्षण देत होता. त्याचे हात चक्रावर होतें. एलन व्हाइट म्हणतात, “देव नेहमी कांही बाबी आणीबाणीच्या थराला जाऊ देतो अशासाठी कीं त्याची अडवणूक लक्षात यावी. इस्रायलांत देव आहे हें त्यानें प्रगट केले आहे.” CChMara 27.7