आमच्या गोंधळांनी आणि निराशांनी आमची मने कुरतडून आम्हांला चिडखोर व अधीर बनविता कामा नये. कसलीही कलहभावना नको, दुर्मति नको, अगर दुर्भाषण नको, नाही तर आम्ही देवाला दु:खवू. (आम्ही देवाला दु:खवू नये म्हणून कसलीही कलहंभावना कसलीही दुर्मति अगर कसलेंहि दुर्भाषण नको आहे) माझ्या बंधु, हेव्यासाठी व दुष्ट विचारासाठी अंत:करण खुले ठेविलें तर पवित्र आत्मा त्यात वस्ती करूं शकत नाहीं. ख्रिस्तामध्ये जी परिपूर्णता आहे तिच्या नादी लागा. त्याच्याच मार्गांनी परिश्रम करती राहा. प्रत्येक विचाराने, उच्चाराने आणि आचारानें त्याचें प्रगटीकरण होऊं द्या. प्रेषितीय काळामध्ये जसे तें सर्व एक जिवाचे होतें तसे होण्यासाठी तुम्हांला प्रीति-सामर्थ्याच्या दैनंदिन बाप्तिस्म्याची गरज आहे. ही प्रीति शरीराला, मनाला व आत्म्याला आरोग्यदान देईल, अंतर्यामाच्या सभोवार असें वातावरण ठेवा कीं, तुमचे आत्मिक जीवन सबळ होईल, विश्वास, आशा, धैर्य आणि प्रीति यांचे संगोपन करा. तुमच्या अंतर्यामावर देवाच्या शांतीला नियमन करूं द्या. 48 T 191; CChMara 243.3
मत्सरबुद्धि ही स्वभावांत कुटीलताच नव्हें तर गैरशिस्त निर्माण करते व याचा परिणाम सर्व कार्यशक्तीना ती अव्यवस्थित बनविते. तिने सैतानाबरोबर कार्यारंभ केला. स्वर्गामध्ये आद्यस्थान मिळविण्याची त्याची आकांक्षा होती, परंतु त्याला हवे होतें तें सर्व गौरव व सामर्थ्य न मिळाल्यामुळे त्यानें देवाच्या अविपत्याविरुद्ध बंडाळी केली. आमच्या मूळ मातापितरांचा तो मत्सर करूं लागला, त्यानें त्यांस पापमार्गात पाडिले व याप्रकारे त्यानें त्याचा व सर्व मानवजाती वा नाश केला. मत्सरी माणसाला इतरांचे सद्गुण व त्यांची थोर कृत्ये दिसत नाहींत. जे काहीं उत्कृष्ट आहे त्याच्याविषयीं तो नेहमीच तुच्छतापूर्वक बोलतो व त्याचा विपर्यास करितो. आपले अपराध कबूल करावेत व तें सोडूनहि द्यावेत असें मानवाना वाटते. परंतु मत्सरी माणसाकडून तशी कसलीच अपेक्षा करता येत नाहीं. एकाद्याचा मत्सर करावयाचा म्हणजे त्याचे श्रेष्ठत्व मान्य करावे लागते, परंतु अहंकार असा कसलाच अपवाद होऊ देत नाहीं. मत्सरी माणसाला त्याच्या पापाची जाणीव देण्याची जर कांहीं खटपट केली तर तो अधिकच कडूतर होतो व वारंवार दुर्धरहि होतो. CChMara 244.1
मत्सरी मनुष्य जेथे कोठे जाईल तेथें तो आपले विषारी पुत्कारे सोडीत राहातो, मित्र मित्रांना पारखे करितो, द्वेषाग्नि प्रज्वलित करितो आणि देवाच्या व मानवाच्या विरुद्ध बंडाळी माजवितो. उत्कृष्ट ध्येय संपादण्यासाठी लागणारे मर्दानी व स्वनाकाराचे प्रयत्न न करिता उलट दुसर्यांनी खटपट करून संपादिलेल्या सद्गुणाची नालस्ती करून आपण फार थोर व मोठे आहों असें भासविण्याचा तो प्रयत्न करीत असतो. CChMara 244.2
खोडसाळपणात रंगलेली, बडबडणारी जीभ म्हणते, बोल म्हणजे मी बोलेन. अशा जिव्हेविषयी प्रेषित याकोबाचे असें म्हणणे आहे कीं तिला नरकाशीनें भस्म करून टाका. जिकडे तिकडे ती आग लावीच असतें. निष्कलक लोकांची बेअब्रू होतें याचे गप्पीदासाला काय? जे आपल्या ओझ्याखाली कन्हत आहेत त्यांची आशा व त्यांचे धैर्य यांचा नाश झाला तरी तो आपलें दुष्कृत्य आवरणार नाही. आपल्या निंदास्प्रद प्रवृत्तींत रमत राहावे एवढेच मात्र त्याला सूचते. स्वत:ला ख्रिस्ती म्हणविणारे सुद्धा जे कांहीं शुद्ध, जे प्रामाणिक, जे उदार आणि जे प्रेमळ आहे त्या सर्वांकडे तें डोळेझाक करितात आणि जे काहीं आक्षेपकारक व नापसंत आहे तें मनीं बाळगून त्याचा जगभर प्रसार करितात. 55T 56, 57, CChMara 244.3