Go to full page →

मानसिक गरजांची निष्काळजी करूं नका. CChMara 268

मला असें दर्शविण्यात आलें आहे कीं देवाचे भय बाळगणारे आईबाप आपल्या मुलांना ताब्यात ठेवतात. त्यांनी त्यांचा स्वभावधर्म व गुणलक्षणे ओळखून त्याच्या गरजा भागविण्याचा प्रयत्न करावा. आपल्या मुलांच्या ऐहिक गरजा भागविण्याचे काहीं आईबाप फार काळजीपूर्वक करितात, आजारांत मोठ्या मायाळूपणे व निष्ठेनें शुश्रुषा करितात व एवढ्यात आपण कृतार्थ झालों असें समजतात. येथे त्यांची चूक आहे. खरे पाहिल्यास आता त्यांनी कार्यारंभच केलेला असतो. मानसिक गरजांची तरतूद करावयास पाहिजे. अस्वस्थ झालेल्या मनाची दुरुस्ती करण्यास मोठे कौशल्य लागतें. CChMara 268.2

कसोटीचा धसका वयस्कर मंडळीला जसा जड व त्रासदायक असतो, तसाच तो मुलांनाही असतो. हें आईबापांच्या नेहमीच ध्यानात उतरत नाही. त्यांची मने वारंवार गोंधळलेली असतात. चुकीच्या दृष्टींत व भावनांत ती धडपडत असतात. सैतान त्यांची दिशाभूल करून ती त्याच्या मोहपाशात लटकली जातात. त्यांची भाषा चिडखोर असतें व आपल्या वर्तणुकीने ती मुलांना खिजवितात, कधीं कधीं जुलमी व त्रासदायक होतात. तोच आत्मा बिचार्‍य मुलांतहि उतरतो व या प्रकरणी आईबाप त्यांना कांही खास करुं शकत नाहींत. कारण त्या त्रासाचे मूळकारण आईबापातच असतें कधीं कधीं सारेंच चुकले आहे असें दिसते. चोहोकडे खिजवाखिजवी असतें. सर्वांसाठी प्रसंग मोठा तिरस्कारणीय व दु:खाचा होऊन जातो. आईबापांन सर्व दोष आपल्या गरीब मुलांवर लादून म्हणावें तुम्ही फार उद्धट व उर्मट आहा, साच्या जगांत तुम्हांसार वाईट मुलें मिळणार नाहींत. परंतु ह्या सर्व त्रासांना तें आईबापच कारणीभूत असतात. CChMara 268.3

आत्मसंयमन नसल्यामुळे कांहीं आईबाप तर पुष्कळच गोंधळ करीत राहतात. अमुक एक गोष्ट अशी करावी किंवा तशी करावी हें प्रेमाने न सांगतां रागाच्या सुरांत हुकूम सोडितात व मुलाकडे कांहीं दोष नसतां टोमणे देऊन त्यांस दोषी ठरवितात. आईबापानों, तुमच्या असल्या वागणुकीने तुम्ही आपल्या मुलांच्या आनंद धृत्तींत व महात्वाकांक्षेत विघ्नच निर्माण करीत आहां तुम्हांवर त्यांचे प्रेम आहे म्हणून नव्हें तर दुसरा कांहीं मार्गच नव्हें म्हणून तुमच्या आज्ञा त्यांना मान्य कराव्या लागतात त्या प्रकरणांत त्यांचे मन मुळीचं नसते. त्यांत आनंद तर कांहीं नसतोच पण कष्ट व कंटाळा असतो. यामुळे तुमच्या सूचनांकडे ती मुलें दुर्लक्ष करतात व त्यावरून तुम्ही अधिक चिडतां व तें मुलांसाठी अधिक वाईट होऊन जाते. चुका दाखविणे तर चालूच राहते व मुलांच्या गैरवर्तनाचा थाट अधिक वाढतां दिसतों. CChMara 269.1

कपाळावर आठ्या असलेली चर्या तुमच्या मुलांना दिसूं देऊ नका. जर ती मोहात पडली व नंतर आपली चूक पाहून पश्चात्तापी झाली तर ज्याप्रमाणे आपल्या स्वर्गीय पित्यापासून मुक्तपणे क्षमा होण्याची तुम्ही अपेक्षा करतां, त्याच मनाने तुम्ही त्यांची क्षमा करा. मायाळूपणाने त्यांस बोध करा व तुमच्या अंत:करणांशी त्यांस बद्ध करून टाका. मुलांसाठी हा आणीबाणीचा वेळ असतो. तुम्हांपासून दुरावण्याचे वातावरण त्यांच्यासभोंवार असेल तर त्याचा तुम्ही प्रतिकार केला पाहिजे. तुम्हांलाच त्यांनी आपल्या विश्वासाचे केंद्र करावे असें त्यांस शिक्षण द्या. आपल्यावर येणारे आणीबाणीचे प्रसंग व प्राप्त होणारे आनंदाचे अनुभव याविषयी त्यांनी तुमच्याशी कानगोष्टी कराव्यात. यांत जर तुम्ही त्यांना उत्तेजित ठेविलें तर त्यांच्या अनानुभविक पावलांसाठीं सैतानाने जे अनेक पाश तयार करून ठेविलेले आहेत त्यांजपासून त्यांची सुटका करितां येईल. (तें त्यांना टाळितां येतील.) आपणहि एकदां बालावस्थेत होतों व ती अद्याप मुलेंच आहेत हें विसरून त्यांच्याशी कडक रीतीने वागू नका. ती अगदी अचूक आहेत व एकदमच त्यांना पोक्त स्त्री-पुरुष बनवावे अशी तुम्हीं अपेक्षा करूं नये. असें जर तुम्हीं केंलं तर तुम्ही त्यांच्या निकट समागमाला अंतराल व त्यांना विघातक वर्तनाकडे ढकलून दिल्यासारखे होईल व त्यांचा धोका तुम्हांला समजून येण्यापूर्वीच ती तरुण अंत:करणे दूषित होऊन जातील. 23IT 384-387; CChMara 269.2