Go to full page →

देवाच्या नजरेखालील शिक्षक CChMara 278

प्रभु आपलें कार्य प्रत्येक समर्पित शिक्षकासह करीत असतो, प्रत्यक्ष शिक्षकांच्या हितासाठीच त्यानें हें समजून घ्यावे. ईश्वराच्या शिस्तीखालील शिक्षकवर्गाला मुलांशी संबंध ठेवण्यासाठी पवित्र आत्म्याच्याद्वारे त्याची कृपा, त्याचे सत्य व त्याचा प्रकाश लाभतो. जगाला कदापि माहीत नव्हता अशा अत्यंत थोर गुरुच्या नजरेखालीं तें असतात. तेव्हां अशांनी निर्दय, रागीट व चिडखोर असणें हें किती तरी गैरशिस्त होय ! अशा रितीने तें आपल्या अंगचे दुर्गुण मुलांना देत राहतात. देव आपल्या स्वत:च्या आत्म्याने याचा खुलाचा करील. अभ्यास करतांना प्रार्थना करा कीं, “तू माझे नेत्र उघड म्हणजे तुझ्या शास्त्रांतील अद्भूत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.” प्रार्थनेच्या द्वारे शिक्षक देवावर टेकून राहील तेव्हां ख्रिस्ताचा आत्मा त्याजवर येईल आणि विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम घडावा म्हणून देव पवित्र आत्म्याकडून शिक्षकांच्या हस्ते कार्य करील. आशा, धैर्य व पवित्रशास्त्रांतील कल्पना-सामर्थ्य हीं पवित्र आत्मा शिक्षकाच्या मनात व अंत:करणांत भरून टाकितो व तींच विद्यार्थ्याला देण्यांत येतात. सत्यतेच्या वचनांचे महत्त्व वाढत राहील आणि शिक्षकाच्या कदापि स्वप्नींसुद्धा आलेली नसेल असल्या अर्थबोधाची रुंदी व पूर्णता त्यास प्राप्त होऊन जाईल. मनाचे व शीलाचे रूपांतर करण्याचे सामर्थ्य देवाच्या सुंदर व सद्गुणदायी वजनांत असतें. स्वर्गीय प्रीतीची किरणें स्फूर्ति म्हणून मुलांच्या अंत:करणावर चमकूं लागतील. जर आम्हीं परिश्रम केले तर शेकडो व हजारों मुलांना आम्हांला ख़िस्ताकडे आणिता येतील. 15CT 171, 172; CChMara 278.4

वास्तविक मानवांनी ज्ञानी होण्यापूर्वी आपलें देवावरचे अवलंबून ओळखून घ्यावे व त्याच्या सुज्ञतेने संपन्न व्हावे. बौद्धिक त्याचप्रमाणे आत्मिक सामथ्र्याचे देव उगमस्थान आहे. या जगांतील विज्ञान शास्त्रातील अद्भुत शिखर ज्या ज्या अति थोर लोकानी गाठलेली आहेत त्या कोणालाही प्रियकर योहानाची अगर प्रेषित पौलाची बरोबरी करितां यावयाची नाहीं. मानवतेचा अति श्रेष्ठ दर्जा जर गाठावयाचा असेल तर बौद्धीक व आत्मिक सामथ्र्यांचा संगम झाला पाहिजे. ज्या कोणाला हें करितां येईल अशांनाच मानसिक प्रगतीच्या कार्यासाठी देव आपले सहकामकरी म्हणून पत्करून घेईल. 16CT 66; CChMara 279.1

आमच्या शिक्षणसंस्थापुढे आज जे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे तें हेंच कीं देवाचा आदर ठेवण्यात येईल असा जगापुढे एक नमुना प्रस्थापित करावयाचा आहे. मानवी संस्थांच्या कार्यावर पवित्र दूताची देखरेख राहील आणि कार्याच्या प्रत्येक शाखेवर त्याच्या दैवी अधिकाराची निशाणी दिसेल. 17CT 57; CChMara 279.2