Go to full page →

कष्टांत असलेली प्रतिष्ठा CChMara 283

शारीरिक श्रम करण्यांत खरोखरीची थोरवी असतें, हें तरुणांना दाखवून देण्यांत यावे. प्रत्यक्ष देवच निरंतरच काम करती असतो हें त्यांना दाखवून द्या. सृष्टि-क्रमातील सर्व गोष्टींत त्यांना घालून दिलेली कामे करीत असतात. संबंध उत्पत्ति कार्य-व्याप्त आहे म्हणून आपल्या ध्येयाची परिपूर्ति करण्यासाठी आम्हांला कार्यशील असले पाहिजे. 34Ed. 214; CChMara 283.4

मानसिक खटपटीसह शारीरिक श्रम ही व्यवहारिक जिण्यांतील एक शिस्तच होय. देवाने मानवासाठी याजलेल्या कार्यातील विविध बाजूमध्ये त्यांच्या मनाची व शरीराची योग्यता अधिक वाढली जावी म्हणून ती शिस्त त्यांना अधिक लायकी व शिक्षण देत राहते, हा त्यातला त्यांत एक मोठा गोड विचार होय. 35FE 229; CChMara 283.5

कार्य कितीही अल्प अगर क्षुद्र असो तें करण्याची आम्हापैकी कोणालाच कांहीं लज्या वाटू नये. कष्टामध्ये एक प्रकारची उदारता असतें. जे बुद्धीनें अगर हस्ताने परिश्रम करितात, तें सर्व पुरुष व सर्व स्त्रिया कामगार असतात. एकाद्या सभागृहामध्ये जे कोणी कार्य करीत असतात, त्याचप्रमाणे भांडी कुंडी धुण्याचे कार्य करणारे सर्वजण आपले कर्तव्य करून आपल्या धर्माचा आदर राखितात. अत्यंत साधारण उद्योगामध्ये जरी शरीर गुंतलेले असले तरी शुद्ध व पवित्र विचारांनी मनाचा मोठेपणा व त्याची थोरवी दाखवू शकेल. 364T 590;. CChMara 283.6

शारीरिक कष्ट तुच्छ लेखण्याचे एक मोठे कारण असें असतें कीं तें वारंवार निष्काळजीने व मन न घालता करण्यांत येते. आवड आहे म्हणून नाही तर तें करावे लागते म्हणून केलें जाते. काम करणारा त्यांत मनच घालीत नाही व तें करण्यांत स्वाभिमानाचा अगर दुसर्‍यांना आदर दाखवावा अशा बुद्धीचा अभाव असतो. उद्योगधंद्याचे शिक्षण देताना ही चूक दुररुस्त करण्यांत यावी. करावयाचे तें नीटनेटकें व पुरेपूर करण्याची संवय लावून घ्यावी. विद्यार्थ्यांना धोरण व पद्धत शिकविण्यात यावी वेळेची काटकसर आणि हरएक हालचाल उपयुक्त करण्याचे ज्ञान देण्यांत यावे. उत्तमांत उत्तम कार्यपद्धतीवरच भागवू नये तर निरतर अधिकाधिक चांगले करण्याची हौस त्यांच्यात उत्तेजित करावी मानवी बुद्धीनें आणि चातुर्याने कार्य जितकें अचूक करता येईल तितकें करावे असें ध्येय त्यांच्यापुढे ठेवा. 37Ed. 222;. CChMara 283.7

आळशीपणांत मुलांना वाढू देणे हें पाप आहे. थकवा आला तरी बेहेत्तर पण त्यानीं आपल्या शरीरांनीं व स्नायूंनी मेहनत करीत राहावें. जर वाजवीपेक्षा अधिक श्रम केले नाहीत, तर थकव्याने तुमचे नुकसान होणार नाही तर त्यांचे कसे होईल? थकवा व क्षीणता ह्यांत अंतर आहे. मोठ्या माणसांना गरज असतें त्यापेक्षा मुलाना कामात फेरफार करण्याची आणि मध्यंतरीचा आराम घेण्याची अधिक गरज असतें. तथापि ती अगदी तरुण असतांनाच श्रम करण्याच्या शिक्षणाला त्यांनी सुरवात करावी. आपण उपयोर्गी पडत आहों, हा विचार त्यांच्या मनात आल्यावर त्यांना आनंदच वाटेल. आरोग्यकारक श्रमामुळे त्यांना अधिक गोड निद्रा लागेल व पुढच्या दिवसाच्या कार्यासाठी तीं अधिक तरतरीत होतील. 38AH 289; CChMara 284.1