Go to full page →

आरोग्य-सुधारणेवर अतिरेकांचा घातक परिणाम CChMara 312

आमच्या लोकांपैकी कित्येकजण मोठ्या चौकस बुद्धीनें अयोग्य अन्न टाळीत असत प्रकृति रक्षणासाठी ज्या अवश्य पुरवठ्याची गरज असतें त्याकडे दुर्लक्ष करतात. आरोग्याकडे खचोटीने पाहत असतांना तें इतके नीरस अन्न घेतात कीं तें अगदीं असमाधानकारक असतें. अन्न असें तयार करण्यांत यावें कीं तें खाल्ल्याने भुकेची तशीच शक्तीची वाढ होईल. प्रकृतीला ज्याची गरज आहे तें हिरावण्यात येऊ नये, मी मीठाचा वापर करीत असतें कारण मीठ अपायकारक नसून उलट रक्त शुद्धीला आवश्यक असतें. भाजीपाल्यांत थोडेसे दूध अगर मलई असेंच काहींतरीं मिश्रण केल्यानें तें अन्न अधिक चवदार होतें. CChMara 312.5

लोण्याकडून आजार होतो व वाटेल तितकीं अंडीं मुलांना देणे अनिष्ट, अशा जरी इशाच्यात्मक सूचना दिलेल्या असल्या तरी चांगल्या व ज्यांना चांगले खाद्य पुरविण्यात येते अशा कोंबड्याची अंडी खाणे यांत तत्त्व-उल्लघन होतें असें मानण्यात येऊ नये, अड्यामध्ये अशी काहीं द्रव्ये आहेत कीं काहीं आजारांची पिच्छेहाट करण्याची शक्ति त्यांत आहे. CChMara 313.1

दूध, अंडी व लोणी वर्क्स करून प्रकृतीला योग्य असें पौष्टिक अन्न न दिल्याची चूक करून कित्येकजण अशक्त होऊन जातात व त्यांच्याने काम करवत नाहीं. अशा रितीने आरोग्य-सुधारणेची नाचक्की होतें. देवाच्याही मनात नाहीं अशा विलक्षण गोष्टी करून आम्हीं उभारलेल्या भक्कम कामांत गोंधळ करण्यांत येतो व मंडळाचे कार्य सामर्थ्य दुर्बल होतें. परंतु अशा अति चिकाटीच्या भानगडीच्या वाईट परिणाम देव घडू देणार नाहीं. पापी लोकांशी मिळते घ्यावे यासाठी व शुभवर्तमान आहे. येशूच्या चरणांपाशीं श्रीमताना व गरिबांना एकत्रित करण्याचा त्याचा उद्देश आहे. CChMara 313.2

दुध, मलई आणि अंडी यासारखे जे पदार्थ आमच्या खाद्यात आज आहेत, तें वर्ल्स करण्याची वेळ येणार आहे. परंतु वेळ येण्यापूर्वीच अतिरेकांची बंधने पत्करून गोंधळ करण्याची गरज नाहीं. तशी परिस्थिति येईपर्यंत दम धरून राहावे व त्यासाठी प्रभूच आपला मार्ग सिद्ध करील आरोग्यसुधारणेची तत्त्वे घोषीत करण्यांत यश यावे अशी ज्यांची इच्छा आहे त्यानीं प्रभूच्या शास्त्राला आपला मार्गदर्शक आणि सल्लामसलतगार केले पाहिजे. असें केले तरच आरोग्य-सुधारणेच्या तत्त्वाचे शिक्षक यशयाच्या मार्गावर स्थिर होऊ शकतील. आम्हीं सोडून दिलेल्या अपायकारक अन्नाच्या ठिकाणी पथ्यकर व चवदार अन्नाचा आधार आम्हीं घेतला नाहीं तर आरोग्यसुधारणेची घोषणा आम्हीं कदापि करूं नये. उत्तेजक अन्नपदार्थासाठी कोणत्याही प्रकारे प्रोत्साहन देऊ नका. साधेसुधे व आरोग्यकारक अन्न खात जा व आरोग्य सुधारणेच्या तत्त्वाबद्दल परमेश्वराची निरंतर स्तुति करीत राहा. सर्व गोष्टींमध्ये स्वच्छ व यथायोग्य राह म्हणजे तुमच्या पदरात अमोल्य यश पडेल. CChMara 313.3