जे धर्मसेवक (पाळक लोक) भुकेच्या लहरींत रमून जाण्यास स्वतंत्र आहेत, तें आपल्या ध्येयांत उणे पडलेले असतात. त्यांनी आरोग्यसुधारक व्हावे अशी देवाची इच्छा आहे. याविषयी त्यांना मिळालेल्या ज्ञानाप्रमाणे जगावे अशी देवाची इच्छा आहे ज्यांनी आरोग्याच्या तत्त्वांविषयीं आवेशयुक्त असावे. त्याचेच योग्य प्रकारच्या जीवन-चरित्रासाठी रूपांतर झालेले नाही तर मला त्याच्याविषयी खेद वाटतो तें मोठ्या नुकसानीच्या मार्गात आहेत असें देवाने त्यास दाखवावें अशी माझी त्याजजवळ प्रार्थना आहे. मंडळया बनविणार्या आमच्या कुटुंबांत त्या गोष्टी असत्या तर प्रभूचें कार्य दुपटीने वाढले असतें. CChMara 314.1
परिशुद्ध व्हावयाचें व राहावयाचे असेल तर सेव्हंथ-डे अॅडव्हेटिस्ट मडळीच्या अंतर्यामांत व गृहांत पवित्र आत्मा असला पाहिजे. प्रभूने मला असा प्रकाश दिलेला आहे कीं, जेव्हां आजचे इस्राएल स्वत:ला त्याजसमोर विनम्र करितील आणि जेव्हां तें आपले आत्मिक मंदिर सर्व प्रकारच्या भ्रष्टतेपासून शुद्ध करितील. तेव्हांच मात्र आजाच्यासाठी त्यांच्या प्रार्थना ऐकण्यांत येतील आणि आजारावरील त्याचे उपचार आशीर्वादित होतील. आजार निवारणार्थ देवाचा हस्तक जेव्हां विश्वास धरून सर्व काहीं करितो व देवाने पुरविलेले साधे उपचार अमलांत आणितो तेव्हां त्यांच्या प्रयत्नांना देव आशीर्वाद देईल. CChMara 314.2
एवढा मोठा ज्ञान-प्रकाश मिळालेला असूनहि जर देवाचे लोक अयोग्य संवयांत व स्वार्थांत सुधारणेचा अव्हेर करितील तर या अपराधाचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. आपली दूषित भूक तृप्त करण्याचा जर त्यांचा निर्धारच असेल तर त्याच्या परिणामापासून सुटका करण्यासाठी देव कांहीं अदभुत शक्ति खर्च करणार नाहीं. तें आपल्या क्लेशात पडून राहतील.” यशाया ५०:११. CChMara 314.3
अहाहा, आरोग्यांत आणि आत्मिक दानांत ईश्वराकडून मिळणाच्या कितीतरी अत्यंत अमोल्य आशीर्वादांना पुष्कळजण मुकतात ! विशेष विजय व विशेष आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी किती तरी धार्मिक लोक धडपड करीत राहतात, अशासाठी कीं त्यांच्या हातून कांहीं तरी मोठे कार्य घडून यावे. हा हेतु साध्य करण्यासाठी त्यांना नेहमीच वाटते कीं आम्हीं प्रार्थनेने व रडून निकरावें परिश्रम केले पाहिजेत. देवाची नक्कीच इच्छा काय हें प्रार्थनापूर्वक जेव्हां तें शास्त्रामध्ये शोधून पाहातील व ती कळल्यावर कोणत्याही प्रकारचा स्वार्थ किंवा शर्त मनांत न ठेवितां त्या इच्छेप्रमाणे अंत:करणपूर्वक वागतील तेव्हाच मात्र त्यांना स्वास्थ्य मिळेल. सर्व निकराचे प्रयत्न, सर्व अश्रू व धडपड यावरूनच त्यांना अपेक्षित आशीर्वाद मिळणार नाहीत, त्यांनी आपले स्वत्व संपूर्णत: समर्पित केले पाहिजे जे विश्वासाने मागणी करितात अशा सर्वांसाठी देवाने कबूल केलेल्या आपल्या अगाध कृपेचा आधार घेऊन जे काहीं हातीं पडेल तें काम त्यांनी केले पाहिजे. CChMara 314.4
येशूनें म्हटले : “जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्यानें आत्मनिग्रह करावा, व प्रतिदिवशी आपला वधस्तभ उचलून घेऊन मला अनुसरावें.” लूक ९:२३. तारणाच्याच्या साधेपणात व रचनाकारात आपण त्याचे अनुकरण करुं या. आमच्या भाषणानें व पवित्र आचारणानें त्या कॅलव्हरीच्या मनुष्याला आपण आद्य प्रतिष्ठान देऊ या. जे देवाला आत्मसमर्पण करितात अशांच्या फार समीप तारक येऊन ठेपतो. आमच्या अंत:करणांवर व जीवितांवर परमेश्वराच्या आत्म्याने कार्य करण्याची जर कधीं गरज असेल तर ती आताच होय. पवित्रतेचे व आत्मसमर्पणाचे जीवन जगण्यासाठी शक्ति मिळावी म्हणून त्या दैवी सामर्थ्याचा आधार घेऊं या. 19T 153-166. CChMara 314.5
*****