Go to full page →

प्रकरण ५६ वें - आमच्या धर्मसंप्रदायास अमान्य अशांशी संबंध CChMara 339

आम्ही जगाशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवू नये कीं काय ? असा प्रश्न विचारण्यात येईल. प्रभुच्या वचनात आम्हांला मार्गदर्शन आढळते धर्महीन व विश्वासहीन अशांनी त्यांच्याप्रमाणे बनविणारा असा कोणत्याही प्रकारचा संबंध शास्त्राने नाकारलेला आहे. अशातून बाहेर पडून अलिप्त रहावे कामकाजाच्या योजनेत आम्ही त्यांच्याशी कोणत्याही त-हेने सामील होऊ नये. पण एकलकोंडे असें आम्हांला जगावयाचे नाही. शक्य तर जगिकांचे सर्व प्रकारचे हित आम्हांला करावयाचे आहे. या संबंधी ख्रिस्ताने आम्हांस उदाहरण घालून दिलेले आहे. जकातदार व पापी यांनी जेवावयास बोलाविले. त्यांना त्यानें धिक्कार केला नाही, कारण त्यांच्याशी मिळून मिसळून राहिल्याशिवाय त्याची या वर्गाशी भेट झाली नसती. परंतु प्रत्येक प्रसंगी त्यानें त्यांच्याशी अशी संभाषणे केली कीं त्यानें त्यांच्या मनावर सार्वकालिक हिताच्या गोष्टी घातल्या, तो आम्हांला अशी आज्ञा देत आहे कीं, “तुमचा उजेड लोकांपुढे पडो, यासाठी कीं त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी, आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे.” ५:१६. CChMara 339.1

अविश्वासणार्‍यांचा संबंध देवाशी आणण्याच्या उद्देशाने आम्ही त्याच्यात मिसळले व आत्मिकतेने जर आम्ही भरभक्कम असलो तर त्यांच्याशी संबंध केल्याने आम्हांला कसलाही धोका होणार नाही. CChMara 339.2

जगाचा उद्धार करण्यासाठी आणि पतित मानवाचा अनंत ईश्वराशी सर्योग करण्यासाठी ख्रिस्त जगांत आला. ख्रिस्ताचे अनुयायी हें प्रकाशाची साधने होत. देवाशी संबंध राखून स्वत: उपभोगत असलेले देवाचे निवडक अतुल्य आशीर्वाद जे अंधकारात व चुकीचे पडलेले आहेत अशांना मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहीजे. हनोखाच्या काळी जे अन्याय चाललेले होतें. त्यांनी तो भ्रष्ट झाला नाही तर आम्ही आमच्या दिवसात तसे का व्हावे? आम्हांला तर आमच्या गुरूप्रमाणेच दु:खीत मानवतेचा कळवळा यावा, दुदैवी जनतेची कीव यावी आणि गरजवंत, त्रस्त, व खिन्न अशांच्या भावनांचा व गरजांचा आम्ही उदार बुद्धिने विचार करावा. CChMara 339.3

मी माझ्या बांधवांना विनंतीपूर्वक सांगते कीं तिसर्‍य दृताचा संदेश आणांसाठी किती महत्वाचा आहे, हें त्यांनी ओळखून घ्यावे आणि देवाची सेवा करणारे व देवाची सेवा न करणारे यांमधील फरक जाणण्यास शब्बाथ हीच एक खूण आहे हें जाणून घ्यावे. जे निद्रिस्त व बेपरवाई झालेले आहेत, त्यांनी जागृत व्हावे. CChMara 339.4

पवित्र होण्यासाठी आम्हांला पाचारण झालेले आहे आणि आमच्या विश्वासांतील जी वैशिष्ठ्ये आहेत ती मान्य केली अगर न केली तरी त्यांची आम्हांला कांही पर्वा नाही. असला समज आम्ही काळजीपूर्वक टाळावा. जे सत्य व न्याय्य आहे तें स्थिर राखण्याचे गंभीर कर्तव्य पूर्वीपेक्षा आज आम्हांवर अधिक सोपवलेले आहे. जे देवाच्या आज्ञा पाळतात तें, जे त्या पाळीत नाहीत आशाहन कसे भिन्न आहेत हें बिनचूक स्पष्ट करून दाखवायचे आहे. आम्हांला बुद्धिपूर्वक देवाला मान द्यावयाचा आहे व त्याच्याशी जो करार आहे तो हरप्रकारे काळजीपूर्वक पाळावयाचा आहे अशासाठी कीं आम्हांला त्याचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत. ज्यांची कसून परीक्षा व्हावयाची आहे त्याना हें आशीर्वाद किती तरी आवश्यक असें आहेत. CChMara 339.5

आमचा विश्वास व आमचा धर्म हें आमच्या जीवनचरित्रांत प्रभावी सामर्थ्य नाहीत असा समज होऊ देणे हा देवाचा मोठा अपमान होय. अशा प्रकारे ज्या त्याच्या आज्ञा आमच्या जीवनकला आहेत त्यापासून आम्ही परावृत्त होतो व देव आमचा व आम्ही त्याचे याचा आम्ही धिक्कार करितो. CChMara 340.1