माझ्या असें पाहण्यात आलें आहे कीं शपथ प्रकरणी देवाच्या लोकांनी चूक केलेली आहे. ह्या संधीचा फायदा घेऊन सैतान त्यावर जुलूम करीत आहे तो त्यांच्या प्रभुचा पैसा लुबाडून घेतो. “शपथ म्हणून वाहूच नका.” या आमच्या प्रभुच्या शब्दांत न्यायकारणाचा संबंध येत नाही. “तुमचे बोलणे होय तर किंवा नाही तर नाही, एवढेच असावे याहून जे अधिक तें वाईटापासून आहे.” मत्तय ५:३४, ३७ याचा संबंध व्यावहारिक बोलण्याभाषणाशी येतो. कित्येकजण आपली भाषा तिखट लावून वापरतात.कोणी आपल्या स्वत:च्या जिवाची शपथ घेतात, कोणी डोक्याची शपथ घेतात म्हणजे जसा मी जगतो आहे तसा किंवा जसे माझ्या डोक्याला अस्तित्व आहे तसे (तें खरे आहे.) कोणी तर आपली सत्यता सिद्ध करण्यासाठी स्वर्गाला व पृथ्वीला साक्ष म्हणून सादर करतात. जर आपले बोलणे खरे नसेल तर परमेश्वर आपल्याला मारून टाकील अशी ग्वाही देतात. असल्या प्रकारच्या शपथांविषयी येशू आपल्या शिष्याना सावधगिरीच्या सूचना देत आहे. CChMara 342.4
देशाच्या कानूकायद्याशी याचा सबध येतो असें अजून प्रभूला वाटत आहे. असें मला दिसून आलेले आहे. येशू पवित्रस्थानात असेपर्यंत राज्यकर्ते व लोक यांना सावरून धरणाच्या आत्म्याची जाणीव होईल परंतु जगांतील फार मोठ्या प्रमाणातील जनतेवर सैतानाचा ताबा असतो आणि जर देशांत कानूकायदे नसते तर फार दुःखसहनाचे अनुभव आम्हांला आलें असतें. मला असें दाखविण्यांत आलें आहे कीं जेव्हां खरोखरीच गरज आहे तेव्हां कायद्यानुसार शपथ घेण्यात ईश्वरी शास्त्राचे उल्लघन होत नाही. देवाचे लोक परमेश्वराला गांभीर्याने पुढे ठेवून म्हणतात आम्ही म्हणतो तें सत्य होय व सत्याविरहीत काहीच नाही. CChMara 342.5
जगात जर कोणी अगदी सुसंगतपणे शपथेवर साक्ष देत असेल तर तो एकटा ख्रिस्तीच होय असें माझ्या पाहण्यात आलें आहे. परमेश्वराच्या मुखप्रकाशात तो जगत असतो. तो आपले बळ सबळ करीत राहतो. कायद्यानुसार महत्वाच्या गाष्टींचा निर्णय घ्यावयास पाहिजे असतो तेव्हां ख्रिस्ती जसा देवाची करूणा भाकू शकतो तसा दुसरा कोणीही भाकू शकत नाही. देव स्वत:विषयीच शपथ घेतो हें ध्यानात आणावे अशी मला देवदूताकडून आज्ञा आली होती. CChMara 343.1