Go to full page →

आपले मन दुसर्‍याच्या अंकित ठेवणे CChMara 358

आपले मोठे हित होणार आहे अशा समजुतीने कोणाही व्यक्तिने आपले मन दुसर्‍याच्या हवाली करूं नये. तुमची मानसिक अवस्था मला नीटनेटकी करिता येईल असा धंदा करणारे लोक अत्यंत घातकी असतात. तात्पुरता आराम वाटल्याचा भास मात्र होतो व अशा रीतीने अकीत झालेले मन कदापि पुन: सरळ आणि विश्वसनीय होत नाही. ख्रिस्ताच्या वस्त्राच्या कांठाला ज्या स्त्रीने स्पर्श केला तिच्या मनासारखेच आमचेही मन दुर्बल असू शकेल. परंतु दिलेल्या संधीचा फायदा घेऊन जर आम्ही तिचा निष्ठापूर्वक विश्वासाने उपयोग केला तर तो श्रद्धायुक्त स्पर्श तितक्याच जलदीने सफल होऊन जाईल. CChMara 358.2

एखाद्या व्यक्तिने आपले मन दुसर्‍य ताब्यात द्यावे ही कांही ईश्वरी योजना नाही. पित्याच्या उजवीकडे सिंहासनारूढ असलेला पुनरूस्थित ख्रिस्त हाच काय तो समर्थ असा रोगनिवारक आहे बरे होण्याचे बळ पाहिजे असेल तर त्याचकडेच पाहा. त्याच्याचद्वारे आहेत त्या स्थितीत पाप्यास देवाकडे जाता येते. एखाद्या मानवाच्या मनसामथ्र्याने तें कदापि देवाकडे जाऊ शकणार नाहीत. स्वर्गीय साधन साहित्ये संकटग्रस्त यांच्यामध्ये मानवी हस्तकाने कधीच लुडबुड करिता कामा नये. CChMara 358.3

जर दुसर्‍य कोणाची मने देवाकडे घेऊन जावयाचे असेल तर प्रत्येकाने देवाशीच सहकार्य करावे. जगाला कधीही लाभली नव्हती अशा त्या अत्यंत थोर वैद्याच्या कृपेविषयी व सामथ्र्याविषयी त्यांना सांगा. CChMara 358.4

दुसर्‍यांच्या अकीत राहा, असें आम्ही सांगत नाही. मनाला आरोग्यदान देण्याच्या विद्येविषयी जे सांगण्यांत येते ती एक भयंकर कला आहे. प्रत्येक दुरात्मा आपले दुष्ट हेतु साधण्यासाठी तिचा उपयोग करितो. असल्या विद्येशी आम्हांला कांही एक कर्तव्य नाही. तिचे आम्हांला भय वाटावे तिच्या मूलतत्वालासुद्धा कोणत्याही संस्थेत थारा देऊ नये. CChMara 358.5

प्रार्थनेची हेळसांड केल्याने मानव आपल्याच हिमतीवर विसंबून राहातात व त्यामुळे तें मोहाच्या दाराशी जातात. शास्त्रीय संशोधनाने पुष्कळदा कल्पनाशक्ति वश करून घेतली जाते व मानव आपल्याच सामर्थ्याच्या जाणिवेमुळे फाजील आत्मस्तुति करतात. मानवी मनाविषयी वाटाघाट करण्याच्या शास्त्रीय विद्यांना भलतेच महत्व देण्यांत येते. त्यांना त्यांचे महत्व असतें. परंतु सैतान त्यांना हाती धरून आत्म्यांना फसविन्यसाठी व त्यांचा नाश करण्यासाठी त्या विद्या त्यांची जोरदार हस्तके होतात. त्याच्या कला जणू काय स्वर्गातून उतरल्या आहेत म्हणून पत्करण्यात येतात व त्यामुळे त्याला मान्य असलेली स्तुति त्याच्या पदरात पडते. मस्तकसामुद्रिक विद्येने आणि मोहनी विद्येने जगाचे पुष्कळच कल्याण व्हावयास पाहिजे होतें. परंतु आज जेवढी भ्रष्टता भरलेली आहे तशी पूर्वी कधीच नव्हती. या शास्त्रानी सद्गुणाचा नाश केला व संचारवादाचा पाया घातला. CChMara 358.6