Go to full page →

शब्बाथ हा वादग्रस्त मुद्दा CChMara 363

शब्बाथ हा अखेरचा मोठा वादग्रस्त प्रश्न असून त्यात सर्व जग भाग घेणार आहे. स्वर्गात जी तत्त्वे कारभार करतात त्यापेक्षा संतानी तत्त्वांना मानवांनी अधिक मान दिलेला आहे. त्यानी नकली शब्बाथाचा स्वीकार केलेला असून सैतानाने त्यावर आपल्या सत्तेची खूण केली व त्याला मोठे स्थान दिले आहे, परंतु परमेश्वराने आपल्या राजकीय हक्काचा शिक्का त्यावर मारिलेला आहे. प्रत्येक शब्बाथ संस्थेवर तिच्या उत्पादकाचे नाव आहे, तें चिन्ह कायमचे असल्यामुळे त्याची सत्ता प्रगट करते, हें लोकांना समजून दाखविण्याचे काम आमचे आहे त्यांच्यावर देवाच्या राज्याची निशाणी आहे किंवा बंडखोरी राज्याची निशाणी आहे व परिणामी हें फार महत्वाचे आहे, हें आम्ही त्यास दाखवायचे आहे. कारण त्यांच्यावर ज्याची निशाणी आहे त्याच राज्याची तें प्रजा असतात. त्याच्या शब्बाथाची जी पायमल्ली होत आहे ती काढून त्याचे महत्व उचावण्यासाठीच देवाने आम्हांस पाचारण केलेले आहे. CChMara 363.1

जे विचित्र मानसिक सामर्थ्य गत काळी विश्वासूजनांविरूद्ध कारस्थान करीत असें, तेच सामर्थ्य देवाला भिणारे आणि त्याच्या आज्ञा मानणारे जे आहेत त्यांना पृथ्वीतून नाहीसे करण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकप्रिय चालिरीती व पिढीजात चालत आलेल्या दंतकथा जे बुद्धिपुर:सर धिक्कारतात अशा नम्र अल्पसंख्यांकाविरूद्ध सैतान तिरस्कारपूर्वक भडका करील. चागल्या चांगल्या हुद्याची व कीर्तिवन माणसें बेकायदेशीर व अभियानी लोकांशी मिळून देवाच्या लोकाविरूद्ध मसलती करतील. धनसंपत्ति, बुद्धिमत्ता शिक्षण व ज्ञान यांच्या जोरावर त्यांची मने मत्सरी बनतील. छळ करणारे अधिकारी, दीक्षित सेवक आणि ख्रिस्ती मंडळीतील सभासदही त्याच्याविरूद्ध कट करितील. आपल्या भाषणाने व लिखाणाने, आपल्या गर्विष्ठ वृत्तीने धमक्यांना व टिगलबाजीने त्याच्या विश्वासावर तें आघात करितील. खोट्या बतावणी व रागीट चिथावणी यांनी तें लोकांची मने चिथावतील. पवित्र शास्त्राच्या अनुरोधाने शब्बाथ पाळण्यात यावा असें म्हणणार्‍यांविरूद्ध असें शास्त्र सागते’ याचे भानच त्यांना नसल्यामुळे जुलमी कायद्याकडे त्याचे मन वळते. लोकप्रियता व आश्रय मिळविण्याच्या हेतुने कायदेपडित रविवार विषयक कायद्याला मान्यता देतील. दहा आज्ञांविरूद्ध एकीचे उल्लंघन करण्याची कोणतीही संस्था असो तिला देवाचे भय धरणारी मंडळी मान्यता देणार नाही. ह्याच युद्धक्षेत्रावर सत्य व असत्य यांच्या वितंडवादावर अखेरचा महान् हल्ला होणार आहे आणि या प्रश्नाचा अखेरचा निर्णय काय होणार याविषयी आम्हांला किंचितही शंका नाही. मर्दखयाच्या दिवसांत झाले तसेच आजही प्रभ सत्याचा व आपल्या लोकांचा कैवार घेणार आहे. CChMara 363.2