नामधारी शब्बाथ पालन करणार्य लोकांनी शब्बाथाला जो पवित्रपणा दिलेला आहे त्यापेक्षां शब्बाथाचा अधिक पवित्रपणा आहे. देवाच्या आज्ञेप्रमाणे जे त्याचा शब्बाथ पवित्रपणे पाळीत नाहींत तें मोठ्या प्रमाणांत देवाचा अपमान करतात. देव शब्बाथ पालनाच्या बाबतींत सुधारणा करण्यास आव्हान देतो. CChMara 47.1
सूर्यास्तापूर्वी कुटुंबांतील सर्वांनी देवाचे वचन वाचण्यास, गाणे म्हणण्यास व प्रार्थना करण्यास एकत्र व्हावे. येथे सुधारणा होण्याची गरज आहे. कारण पुष्कळजण येथे चुकतात. आम्ही एकमेकांची व देवाची क्षमा मागण्याची गरज आहे. देवाने पवित्र केलेला व आशीर्वादित केलेल्या दिवसाचा मान करण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सभासदाने तयार राहाण्यासाठी आम्ही नवीन योजना केली पाहिजे. CChMara 47.2
कौटुंबिक भक्तीमध्ये लेकरांना भाग घेऊ द्या. प्रत्येकाने आपापले पवित्रशास्त्र घेऊन एक दोन ओव्या वाचाव्या. नंतर सर्वांना येईल असें गायन म्हणावे. नंतर प्रार्थना करावी. याकरिता खिस्ताने कित्ता घालून दिला आहे. प्रभूची प्रार्थना वरवर बोलून दाखवावी अशी प्रभूची इच्छा नव्हती; पण आमच्या प्रार्थना अशा असाव्या म्हणून दिलेला नमूना आहे. आपली प्रार्थना साधी, मनापासून व सर्वांना समजेल अशी असावी. अगदी साध्या विनंतीनें प्रभूला तुमच्या गरजा कळवा व त्याच्या कृपेबद्दल कृतज्ञता दाखवा. याप्रमाणे तुम्ही येशूला तुमचा आवडता पाहुणा म्हणून तुमच्या घरांत व अंत:करणांत आमंत्रण द्या. कौटुंबिक भक्त करतांना सार्वजनिक गोष्टींविषयी लांबलचक प्रार्थना करणे योग्य नाहीं, त्यांकडून प्रार्थनेची वेळ कंटाळवाणा भासते, त्याऐवजी ती उत्तम संध व आशीर्वाद आहे अशी वाटली पाहिजे. प्रार्थना हर्षयुक्त व आवडीची असली पाहिजे. CChMara 47.3
शब्बाथाच्या शेवटीं सूर्यास्त होत असतां प्रार्थनेची वाणी व स्तुतीचे गाणे याद्वारें या पवित्र वेळेचा समारोप होऊ द्या, आणि येणार्य सप्ताहात आपल्या कामात देवाची समक्षता असावी अशी दक्षता घ्या. सार्वकालिक जीवन प्राप्त झालेले आहे म्हणून प्रभूचा शब्बाथ दिन पवित्रपणे पाळणे आपले कर्तव्य ठरते. देव म्हणतो, “जे माझा सन्मान करतात त्याचा मी सन्मान करीन.” १ शमुदेल २:३०. 4353-359; CChMara 47.4