पुष्कळांना वाटतें कीं, तें एकटे आपला प्रकाश व अनुभव या बाबतीत ख्रिस्ताला जबाबदार आहेत व जगांतील माहीत असलेल्या अनुयायात स्वतंत्र आहेत. पण ख्रिस्ताने आपल्या उदाहरणाने व शिकवणूकानें हें रद्द केले आहे. कारण त्याची शिकवण आमच्या बोधासाठी दिली आहे. येथे पौल, ज्याच्यावर ख्रिस्ताने आपल्या महत्त्वाच्या कार्यासाठी ज्याची लायकी पटविली व र्जा त्याच्याकरिता निवडलेले पात्र होणार होता त्या पौलाला ख्रिस्ताच्या समक्षतेत आणले. तरी त्यानें त्याला सत्याचे धडे शिकविले नाहींत. त्यानें विचारलें कीं “मीं काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे?” तेव्हां प्रभूने त्याला प्रत्यक्ष सांगितलें नाही, पण त्याला मंडळीच्या संबंधात ठेविलें. तें तुला काय करावे तें सांगतील. येशू हा पाप्याचा मित्र आहे. त्याचे अंत:करण नेहमी खुलें आहे. मानवाचे दु:ख त्याला झाले आहे ! तो सर्वशक्तिमान आहे. पृथ्वीवर व स्वर्गात त्याला अधिकार आहे. पण तो मानवाच्या तारणासाठी व उत्तेजनासाठी जे साधून देवाने नेमिलें आहे त्याला मान देतो तो मंडळीकडे बोट करून शौलाला दाखवितो. त्यानें जगाला आपले सामर्थ्य प्रकाशाचा मार्ग या नात्याने दिले आहे असें गृहित धरून मंडळीकडे बोट दाखविले आहे. पृथ्वीवरील स्थापन केलेली ख्रिस्ताची ती संस्था आहे. त्याच्या स्थापन केलेल्या गोष्टीला मान दिला पाहिजे. शौलाच्या बाबतींत, हनन्या ख्रिस्ताचा प्रतिनिधि आहे. तोहि या पृथ्वीवरील ख्रिस्ताच्या ठिकाणी कार्य करायला निवडलेला त्याचा सेवक आहे. CChMara 106.3
पौलाचा पालट झाला त्यांत आम्हांला दिलेली फार महत्त्वाची तत्त्वे आम्ही सतत लक्षात ठेवण्यासाठी आहेत. जगाचा तारणारा स्वत: स्थापन केलेल्या मंडळींच्या धार्मिक बाबींतील अनुभव व कार्य यांना स्वतंत्ररित्या अधिकार देत नाहीं; कारण त्याची मंडळी आहे. CChMara 107.1
देवाचा पुत्र मंडळीच्या अधिकाराशी असलेला संबंध दर्शवितों. त्यानें अभिषिक्त केलेल्या हस्तकांद्वारे त्याचा आशीर्वाद मिळाला पाहिजे. याप्रकारे ज्याच्याद्वारे आशीर्वाद मिळतों त्यांशी मनुष्याचा संबंध जोडला जातो. जेव्हां देवाच्या आत्म्याने त्याच्या क्रूरपणाचे कार्य दाखवून दिले तेव्हां आपण धार्मिकांचा छळ करण्याच्या कार्यात कडकरीत्या भाग घेण्याकडून निर्दोषी आहे असें त्याला वाटले नाहीं तो शिष्याचा एक विद्यार्थी बनणार होता. 83t 432, 433; CChMara 107.2
जर मंडळीचे सर्व सभासद देवाचे पुत्र व कन्या असतील तर त्यांना जगांत प्रकाश बनण्यापूर्वी कडक शिस्तींतून जावे लागेल. जेव्हां पुरुष व स्त्रिया अंधारातच राहातात व असतात तेव्हां देव त्याना प्रकाशाचे साधन बनवीत नाही. कारण तें प्रकाशाच्या उगमाशीं स्वत:ला जोडण्यास कांही विशेष खटपट करीत नाहींत. ज्यांना गरज भासते व खोल विचार, अति कळकळीची अखंड प्रार्थना व कार्य करण्यासाठी जे जागृत होतात त्यांना स्वर्गीय मदत प्राप्त होईल. प्रत्येकाला स्वत:विषयी शिकण्यासारखे व न शिकण्यासारखे आहे. जुन्या संवया व रीति काढून टाकल्या पाहिजेत. मोठ्या खटपटीने या चुका दुरुस्त करुन घेतल्या पाहिजेत व सत्याच तत्त्वे चालविण्यास सत्याची पूर्ण प्राप्ति देवाच्या कृपेने झाली पाहिजे मग विजय ठेवलेला असणार. 947 485, 486; CChMara 107.3