Go to full page →

स्वत: चेंच मत श्रेष्ठ मानण्याचा धोका CChMara 110

जे आपलें स्वत:चे मत श्रेष्ठ मानतात तें मोठ्या धोक्यात आहेत. अशांना प्रकाशाचे साधन असणार्‍यपासून वेगळे करण्याची सैतानाची खटपट असतें ज्यांना प्रकाशाचे साधन केले आहे. त्याद्वारे या पृथ्वीवर आपलें कार्य स्थापन करून तें वाढविण्याचे प्रयत्न देवाने केले. देवाने ज्याना सत्याच्या वाढीसाठी पुढारीपणाची जबाबदारी दिली आहे त्याचा नाकार करणे म्हणजे त्याच्या लोकांच्या शक्तीसाठी व मदतीसाठी देवाने नेमलेल्या साधनाचा नकार करणें होय. देवाच्या कार्यांतील कोणत्याही कामदाराने या गोष्टीकडे कानाडोळा करणे आणि प्रकाश देवापासून आला पाहिजे असें म्हणणे म्हणजे स्वत:ला अशा परिस्थितींत आणणे कीं, त्यांत तें शत्रूकडून फसविले जातील व त्याचा पाडाव होईल. देवाने आपल्या शहाणपणाने अशी योजना केली कीं, सर्व विश्वासणार्‍यांनी आपल्या निकट सहवासाद्वारे ख्रिस्ती मनुष्य ख्रिस्ती मनुष्याशी येऊन मिळेल. या प्रकारे मानवी साधन दैवीसाधनाशी सहकार्य करण्यास समर्थ होईल. प्रत्येक साधन पवित्र आत्म्याच्या अधीन राहील आणि सर्व विश्वासणारे संघटित होऊन व योग्य मार्गदर्शन देणार्‍य देवाच्या कृपेची सुवार्ता जगाला देण्याच्या कार्यात गुंततील.८ मानवी शरीर बनण्यासाठी मनुष्याच्या शरीराचे वेगवेगळे भाग एकत्र जोडले जातात आणि प्रत्येक अवयव शरीरावर ताबा ठेवणाच्याच्या आज्ञेत राहून आपापले काम करतो. त्याच प्रकारे ख्रिस्ताच्या मंडळीचे सभासद एकाच शरीराला जोडले जावेत व सर्वांवर ताबा ठेवणाच्या पवित्र व्यक्तीच्या ताब्यांत राहावेत. 8AA 164 CChMara 110.5