मानवापुढें उभे राहाण्यास, मोहाला प्रतिकार करण्यास व मनुष्याला जी परीक्षा येणार व सोसावे लागणार तें सहन करण्यास येशूनें स्वत:ला नम्र केलें, पतित अशा शत्रूकडून येणार्य कोणत्या गोष्टीशी भावाने तोंड द्यावयाचे आहे अशासाठीं कीं ज्यांना सैतानाने मोह घातलेला CChMara 124.4
आहे त्यांना साहाय्य करता यावें. CChMara 124.5
ख्रिस्ताला आमचा न्यायाधीश केला आहे. पिता न्यायाधीश नाहीं देवदूत नाहींत. ज्याने मानव देह धारण केला व या जगांत पूर्ण जीवित जगाला तोच आमचा न्याय करणार आहे. तोच आमचा न्यायाधीश होऊ शकतो. भावांनो, हें लक्षात ठेवाल काय ? पाळकानों में लक्षात ठेवाल काय? आईबापांनो हें लक्षात ठेवाल काय? ख्रिस्तानें आमचा न्यायाधीश होण्यासाठीं मानव देह धारण केला. तुम्हांपैकी कोणालाही इतरांचा न्याय करावयास नैमिले नाहीं. तुम्ही फक्त स्वत:ला शिस्त लावू शकता. ख्रिस्तांच्या नांवाने मी तुम्हांला विनविते कीं, तुम्ही कोणाचा न्याय करूं नये म्हणून तुम्हांला जो सल्ला दिलेला आहे तो घ्या. रोज रोज माझ्या कानांत हा संदेश घुमतो कीं, तुम्ही न्यायासनावरून खालीं या, नम्रपणे खालीं या.’’ 109T 185, 186; CChMara 124.6
देव सर्व पापें सारखींच गणत नाहीं. दोषाचा व पापाचा कमी जास्त दर्जा देवाच्या दृष्टीने व यातनाच्या दृष्टीने ठरविलेला आहे. तरी पण त्यांच्या दृष्टीने हें पाप किंवा तें पाप कितीही क्षुल्लक असले तरी देवाच्या दृष्टीने तें क्षुल्लक नाहीं. मनुष्याच्या दृष्टीने लहान दिसणारी पापेंच देवाच्या दृष्टीने मोठे गुन्हे ठरतात. दारुड्याला सांगण्यांत येते कीं त्याच्या पापामुळे त्याला स्वर्गाला मुकावे लागेल. पण त्याचवेळी गर्व, स्वार्थीपणा व लोभ यांना धमकी दिली जात नाही. पण हीच पापें देवाचा अपमान घडवून आणणारी आहेत त्यानें गर्वीष्ठाचा विरोध केला. पौल म्हणतो कीं, लोभ हा मूर्तिपूजेसमान आहे. ज्यांना मूर्तिपूजेपासून अलिप्त राहाण्याची माहिती देवाच्या वचनापासून आहे, त्याना पाप हें किती अपमानकारक व भयंकर आहे हें एकदम दिसेल. 115T 337 CChMara 125.1
*****