Go to full page →

मंडळींतील गरिबांविषयी आमचें कर्तव्य CChMara 127

आमच्या संबंधांत येणारे दोन प्रकारचे गरीब लोक असतात. कांहीं आपल्या स्वतंत्र आचरणाने व आज्ञाभगाने नाश करून घेणारे आणि दुसरे सत्यासाठी ज्याची स्थिति तंग झालेली आहे असें. आम्ही स्वत:प्रमाणें इतरांवर प्रेम करावे म्हणजे या दोन वर्गाकडे आपण लक्ष देऊन समंजसपणाचा सल्ला व मार्गदर्शन याद्वारें त्यांच्या बाबतींत योग्य गोष्ट करूं. CChMara 127.3

प्रभूच्या गरिबांविषयीं कांही प्रश्न नाहीं. त्यांना प्रत्येक बाबतींत त्यांचा फायदा होईल अशी मदत केली पाहिजं. CChMara 127.4

देवानें या पापिष्ट जगाला त्यांचा नाश होण्यासाठीं सोडिले नाहीं हें आपल्या लोकांनी दाखवावे अशी त्याची इच्छा आहे. जे कोणी सत्यासाठी छळ सोशीत आहेत व त्यांना घरांतून बाहेर घालवून दिले आहे त्यांच्याविषयी विशेष काळजी घेतली पाहिजे. अधिक प्रमाणात मोठ्या सरळ व दयाळू अंत:करणाची गरज असेल. जे स्वनाकार करून या बाबतींत ज्यांच्यावर प्रभु प्रीति करतो. अशाची काळजी घेणान्यांची मोठी गरज आहे. देवाच्या लोकांपैकी जे गरीब आहेत त्याच्या गरजा भागविण्याची तरतूद केली पाहिजे. कांहीना काम करण्यास शिकवण्याची गरज असतें व दुसरे जोरानें काम करून थकले आहेत व आपल्या कुटुंबाचे पोषण करण्यासाठी ज्यांनी पराकाष्ठा केलेली आहे त्यांना विशेष मदतीची गरज आहे. अशांना गोडी दाखवून कामधंदा शोधून देण्यास मदत करावी. जे देवाच्या आज्ञा पाळून त्याजवर प्रेम करतात अशा गरीब लायक कुटुंबाकरता मदत होण्यास एक फंड असावा. CChMara 127.5

देवावर प्रेम करणारे व त्याच्या आज्ञा पाळणारे काहींजन परिस्थितीमुळे गरीब बनतात. कांही निष्काळजी असतात. त्यांना कसे चालवावे हें समजत नाहीं, दुसरे काहीं आजारांमुळे व दुर्दैवी घटनेमुळे गरीब होतात. कोणतेंहि कारण असले तरी त्यांच्या गरजा भागविण्यासाठी मदत करणे हें महत्त्वाचे मिशनरी कार्य होय. CChMara 127.6

जेथें कोठें मंडळी स्थापन झाली आहे. तेथील सभासदांनी गरजू विश्वासणाच्यासाठी विश्वासाने कार्य करावे पण त्यांनी तेथेच थाबू नये. त्यांनी इतरांना मदत करावी मग तें कोणत्याही विश्वासाचे असोत. अशा कार्यामुळे काहीजण या काळासाठी हवे असलेल्या विशेष सत्याचा स्वीकार करतील. 7369- 271; CChMara 128.1