आरोग्यदायी पुस्तके व मासिके विक्रेते साहित्य घेऊन जा त्या विषयीची सर्व माहिती त्यांना असणे गरजेचे आहे. आरोग्या विषयीची मोल्यवान माहिती लोकांना सांगून पुस्तके व मासिकांची विक्री करावी. आजाऱ्यांची शुश्रुषा, त्यांच्यावरील उपचारा विषयी सांगावे. अशाप्रकारे पुस्तके व मासिकांची ओळख करुन द्यावा. आरोग्यदायी जीवनाचा सराव करुन आरोग्यदायी कुटुंब सुखी कसे राहिल याची माहिती सांगून पुस्तके विकावी. प्रत्येक कुटुंबासाठी पस्तके व मासिके कशी उपयोगी आहेत याविषयी सांगावे. आपल्या निर्माकर्त्याने आपली शरीर यंत्रणाची रचना किती सोपी केली आहे व त्याची निगा कशी करावी याविषयी सांगितले आहे. लोकांना आपण सांगावे की देवाने दिलेल्या या आपल्या शरीराची योग्य काळजी घेऊन देवाला सहकार्य करावे. आपल्या शरीर रचनेची आपण योग्य काळजी घ्यावी. ChSMar 187.3
शरीराची योग्य काळजी घेणे ही आपली मोठी जबाबदारी आहे आणि वेगवेगळ्या अवयवांची काळजी घेण्यासाठी ज्ञानाची गरज असेण जे या पुस्तके व मासिकांमध्ये असतात. त्यांना सांगा की तुम्ही जर तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करुन शरीरास अपायकारक पदार्थांचा वापर करु लागला तर तो देवाचा अपमान होतो. मानवाने जर आपल्या शरीराचा गैरवापर केला तर शरीर दुर्बल होतेच परंतु देवालासुद्धा ते आवडणार नाही. म्हणून त्यांना शरीर रोग्याचे योग्य धडे देणे हे तुमचे मुख्य कर्तव्य आहे. तेव्हा पुस्तक विक्रेत्याने या गोष्टी लक्षात येऊन त्या विषयी लोकांना सांगणे हे अति महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे जी पुस्तके आहेत ती लोकांच्या आरोग्यासाठी अती आवश्यक आहेत. रुग्णालयामध्ये जाऊन डॉक्टरांसाठी भरमसाठ पैसे भरण्याऐवजी अल्प किमतीतील ही पुस्तके तुमचा खर्च वाचवू शकतात. - सदर्न वॉचमन २० नोव्हेंबर १९०२. ChSMar 188.1
तरुणांनी हे कार्य हाती घेतल्यास अनेकांना आरोग्यदायी संदेश मिळून त्यांची आरोग्यसंपदा सुरक्षित राहील व अनेकांचे जीवन ते वाचूवू शकतील. आत्म्यांचे परिवर्तन झाल्याचे ते पाहतील. त्यांच्या कार्यामुळे कापणी करण्यासाठी देवाचे पीक ......... झाले असेल आणि देव कापणीसाठी आकाशातून खाली उतरेल. तेव्हा सर्व कामगारांनी आपले साहित्य घेऊन बाहेर पडावे, सध्याचे सत्य त्यांच्या कानावर घालावे. त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. कदाचित काही जणांना सुवार्ता कशी राखावी तेच संगावे. देवासाठी कापणीची तयारी करावी. वर्तमानासाठी असणारा सत्य प्रकाश इतरांना देण्याची जबाबदारी तरुणांनी स्वीकारावी. त्यांनी निरंतर प्रार्थना करावी आणि अधिक प्रकाश आणि ज्ञानासाठी देवाकडे मागणी करावी. जे थकलेले किंवा निराश आहेत त्यांनी प्रार्थनापुर्वक, नम्रतेने देवाचा निरोप लोकांना द्यावा. त्यांचे कार्य असे आहे की त्यांनी नेहमी आपल्याबरोबर नेहमी काही आरोग्यदायी पुस्तके व मासिके घ्यावीत. आरोग्य सुधारणेचा संदेश आपल्या हाती आहे तो इतरांना देणे ही आपली जबाबदारी आहे. आरोग्य सुधारण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. - द सदर्न वॉचमन १५ जानेवारी १९०३. ChSMar 188.2