अनेकजन या चळवळीमध्ये गुंतलेले असतील जी रविवार पालनाची सक्ति करण्यात येईल याला ते मान्यता देतील. त्यांच्या अंधपणामुळे या कृत्याचा परिणाम त्यांना दिसून येणार नाही. हा हल्ला त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर आहे हे ते पाहू शकणार नाहीत. यामधील अनेक जणांना बायबल मधील शब्बाथ समजून येणार नाही. खोट्या शब्बाथाचा पाया जो पोप सत्तेचा रविवार पालनाची जबरदस्ती होईल हे त्यांना कळणार नाही. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ५:७११. ChSMar 198.1
गत शतकामध्ये प्रेषितीय मंडळीच्या संस्थापकांनी आणि देवाच्या संदेशवाहकांनी सत्य व धार्मिक स्वातंत्र्याची पताका वर उंचावर फडकविली होती आणि ह्या अखेरच्या संघर्षात ती आपल्या हवाली केली गेली आहे. देवाने त्याच्या वचनाचे ज्ञान ज्यांना दिले आहे त्यांच्यावर या दानाची जबाबदारी टाकली आहे त्या वचनाचा अधिकार सर्वश्रेष्ठ आहे असे जाणून आपण त्याचा स्विकार केला पाहिजे. मानवी शासन संस्था देवानेच नेमली आहे. असे आपण मान्य केले पाहिजे आणि प्रामाणिक कक्षेत त्या शासनाचे आज्ञापालन पवित्र कर्तव्य आहे अशी शिकवण दिली पाहिजे. परंतु जेव्हा शासकीय हक्क, अधिकार यांचा विरोध देवाचा हक्क, अधिकार यांच्याशी होतो तेव्हा आपण मानवा ऐवजी देवाचे आज्ञापालन केले पाहिजे. सर्व मानवी कायद्याशिवाय देवाचे नियम अधिक उच्च स्तराचे आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे. देव असे म्हणतो की हे विधान बाजूला सारुन मंडळी असे म्हणते किंवा सरकार असे म्हणते याचा आपण पुरस्कार करु नये. जगिक राजाच्या मुकुटापेक्षा ख्रिस्ताचा मुकूट उंचावला पाहिजे. - द अॅक्टस् ऑफ अपोस्टल, ६८, ६९. ChSMar 198.2
आम्ही लोक या नात्याने आपण आपले कार्य पूर्ण केले नाही जे देवानं आम्हांला सोपविले आहे. आम्ही त्यासाठी अजून तयार नाही की ज्यामुळे आपणावर राष्ट्रीय रविवार कायद्याची जबरदस्ती होणार आहे. हे आपले कर्तव्य आहे की येणाऱ्या धोक्याची चिन्ह आपण ओळखावी. या धोक्याची सुरुवात कोठून व्हावी व केव्हा व्हावी याची जाणीव असणे आवश्यक आहे. आपण या भ्रमात शांत बसू नये की या घटना देव आणील. आपण त्याच्या संरक्षणाखाली सुरक्षित राहू कारण जे भविष्य आहे त्याप्रमाणे घडणार असा आपला विश्वास आहे. आपण जर काही न करता शांत बसून राहिलो तर देवाच्या इच्छेप्रमाणे करीत नाही यामुळे आपल्याला काहीच लाभ होणार नाही. आपली उत्साही व कळकळीची प्रार्थना स्वर्गाला जाते यामुळे आपले कार्य पूर्ण होईपर्यंत येणारी संकटे थोपविली जातील. या आपल्या कार्याकडे आपण दुर्लक्ष केले होते. म्हणून आपण अधिक कळकळीने प्रार्थना करावी आणि मग सर्वांनी एकत्रितपणे कार्य सुरु करावे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ५:७१३, ७१४. ChSMar 198.3
हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे की आपल्या सर्व सामर्थ्याने भीतिचा धोका टाळायचा आहे. आपण होईल तितके प्रयत्न करुन योग्य प्रकाश लोकांपर्यंत पोहोचवावा. त्याच्यासमोर आपण त्या विषयाचा खरा प्रश्न निर्माण करावा की त्यांनी परिणामकारक प्रश्न विचारावेत आणि खात्री करुन घ्यावी व समाधानकारण उत्तरे मिळवावीत म्हणजे त्यांच्यातील अडथळे निघून जावेत व त्यांचे धर्म स्वातंत्र्य शाबूत राहील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ५:४५२. ChSMar 199.1
जेव्हा देवाने आम्हाला प्रकाश दिला आहे तो आम्हाला धोके दिसावेत म्हणून आम्ही त्याच्यासमोर त्याच्या नजरेमध्ये स्वच्छ कसे राहू ? आपण जर आपण आपले सामर्थ्य वापरुन लोकांपुढे सत्य आणण्यासाठी दुर्लक्ष केले तर त्यांना पुढील इशारा कसा देऊ शकू ? - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ५:७१२. ChSMar 199.2
जेव्हा राष्ट्रीय धर्म सुधारक धर्म स्वातंत्र्य सुरक्षित राखण्यासाठी उत्साहाने आपले कार्य करीत असताना आपले मार्गदर्शक अधिकारी जागे होणे आवश्यक आहे व त्यांना धर्म सुधारकांना प्रतिवाद करावा. देवाने जो प्रकाश दिला आहे तो आपण स्वत: जवळ ठेवण्यासाठी नाही. सध्याचे सत्य जे आहे ते सर्वांसाठी अति गरजेचे आहे. आपले सर्वच अधिकारी तिसऱ्या देवदूताचा संदेश देत नाहीत. तो संदेश काय आहे ते त्यांना ठाऊक आहे. राष्ट्रीय सुधारक मंडळाला हे समजले नाही की हा संदेश सर्व राष्ट्रांना द्यावा काहींना याचे महत्त्व समजले नाही त्यांनी तसा विचार केला नाही. या मुद्दाला त्यांनी अधिक लक्ष द्यायला हवे. तिसऱ्या देवदूताचा संदेश दिल्यानंतर लोकांनी त्याविषयी प्रश्न विचारायला वेळ द्यायला हवा. अनेकांनी या संदेशावर वेगळे अर्थ लावले आहेत. यासाठी देव त्यांची क्षमा करो. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ५:७१५. ChSMar 199.3
आपल्या भूमिवर राष्ट्रीय रविवार कायदा येण्यासाठी आपण अनेक वर्षांपासून वाट पाहात आहोत आणि आता ही चळवळ दूर नाही. आपण या बाबतीत आपल्या लोकांना त्यांचे कर्तव्य करण्यासाठी सांगतो का ? ज्यांना त्यांच्या धर्माच्या स्वातंत्र्याचा उपभोग आहे त्यांना आपण सहाय्य करु शकतो काय ? वेळ भरभर निघून जात आहे आणि लोकांनी ठरवायचे आहे की आपण देवाचे नियम पाळायचे की मनुष्याचे जीवन आता जुलमी हाताखाली जाण्याची वेळ आली आहे. देवाचा अवमान करुन त्याचे नियम मनुष्य पायदळी तुडवित असल्याचे पाहून आपण शांत राहायचे का ? याचवेळी प्रोटेस्टंट मंडळ्या रोम कॅथलिक मंडळीशी हातमिळवणी करीत आहेत. तेव्हा आपण ही परस्थिती समजून घेऊ या. ही एक स्पर्धा आहे. याचे चित्र आपणास दिसत आहे. हे सत्य आहे. आता वेळ आहे की आपल्या पहारेकऱ्यांनी आता उठून आता सध्याचे सत्य जगाला लोकांना दाखवून देऊ या की या भविष्य इतिहासामध्ये आपण कोठे आहोत आणि सत्यामध्ये आत्मा जागृत करुन असल्या विरुद्ध आवाज उठवावा. यामुळे जगाला जागे करावे व धर्म स्वातंत्र्याची जाणीव जगाला करुन द्यावी व धर्म स्वातंत्र्याचा आनंद उपभोगावा. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ५:७१६. ChSMar 200.1
आपल्या भूमीतील लोकांना जागृत व्हावे आणि आपल्या शहरात हा धर्म शत्रु कोण आहे भविष्यामध्ये त्याचा भयंकर धोका आहे. आपल्या धर्म स्वातंत्र्यावर धोका आहे. - स्पिरीट ऑफ प्रॉफेसी ४:३८२. ChSMar 200.2
आपण हात जोडून बसावे काय ? आणि या प्रकाराविषयी काहीच करु नये ? हे देवा आम्ही आमच्या मूर्खपणामधून जागे व्हावे आणि अनेक वर्षांपासून आमच्या डोक्यावर धोका टांगला आहे त्यापासून आमचे रक्षण कर. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड १८ डिसेंबर १८८८. ChSMar 200.3