नास्तिकवादी लोक देवाच्या आज्ञांची थट्टा, कुचेष्टा, उपहास व निंदा करतील. ऐहिक मनोभावनेने अनेकजण दूषित होतील, थोडे सत्तेखाली येतील, केवल परकाष्टाच्या प्रयत्नाने आणि सातत्याच्या आत्मत्यागाने देवाचे कार्य टिकून राहिल. तथापि अखेर सत्याचा विजय गौरवाने होईल. - प्रोफेट्स अॅण्ड किंग्ज १८६. ChSMar 201.4
पृथ्वीवरील देवाच्या कार्याच्या शेवटी त्याच्या नियमाचे प्रमाण पुन्हा उंचावण्यात येईल. कदाचित खोट्या धर्माचे वर्चस्व राहील. दुष्टाईचा धुमाकूळ माजेल. अनेकांचे प्रेम थंडावेल, कॅव्हरीवरी वधस्तंभाचे विस्मरण होईल आणि जगावर प्रेतावर घालण्याचे कफनाप्रमाणे अंधार पसरेल. लोकमान्य मनोवृत्तीचा ओघ सत्या विरुद्ध असेल. देवाच्या लोकांना जमीनदोस्त करण्याची विविध कारस्थाने करण्यात येतील, परंतु अति कठिण प्रसंगी एलीयाचा देव समर्पक संदेश देण्यासाठी मानवी साधनांची उभारणी करण्यात येईल आणि तो संदेश कोणी पाडू शकणार नाही. देशातील भर वस्तीच्या शहरात आणि परात्परा विरुद्ध उद्गार काढण्याची मर्यादा न राहिलेल्या स्थळी कडक धमकीची वाणी ऐकविली जाईल. देवाने निवडलेले लोक, जग व मंडळी यांच्या एकीकरणावर धैर्याने दोषारोप करतील. मनुष्याने स्थापन केलेल्या नियमांपासून मागे वळून खऱ्या शब्बाथाचे पालन करण्यास ते आग्रहाने स्त्री-पुरुषांना पाचारण करतील. ते प्रत्येक राष्ट्राला जाहीर करतील. - प्रोफेटस् अॅण्ड किंग्ज १८६,१८७. ChSMar 202.1