Go to full page →

धर्मवेड आणि थंड कर्मठपणा ChSMar 59

आता सैतान आपल्या फसण्या सामर्थ्याने लोकांच्या पोटात शिरत आहे. तिसऱ्या देवदूताच्या संदेशापासून लोकांना तो दूर करीत आहे. देवाच्या कार्यापासून त्यांना दूर करीत आहे. हा संदेश मोठ्या सामर्थ्यानीशी गाजवायचा होता. जेव्हा शत्रु पाहतो की देव त्याच्या लोकांना आशीर्वाद देतो आणि निर्णय घेण्यासाठी त्यांची तयारी करतो त्यांच्या मधील गैरसमज दूर करण्यास सहाय्य करतो. तो आपल्या कौशल्य युक्त सामर्थ्याने एका हाती आणि दुसऱ्या हातात कर्मठपणा घेऊन कापणीसाठी आत्मे गोळा करायचे. आताच वेळ आहे की सतत नजर ठेवावी. लक्ष ठेवा की आपल्यामध्ये सैतान आपले वर्चस्व स्थापन करील. - रीव्हिव्ह अॅण्ड हेराल्ड २४ जानेवारी १८९३. ChSMar 59.1

आपल्या मंडळीमध्ये सैतानाने नीतिमत्त्वाचा डोंगर रचला आहे. रुबाबदार प्रदर्शन करण्याचे अनेक मार्ग आहेत, परंतु त्यामुळे जगामध्ये आपला प्रकाश पडू शकत नाही. द रिव्हिव्ह अॅण्ड हेराल्ड २४ मार्च १८९१. ChSMar 59.2