Go to full page →

भोजन करण्याची चुकीची सवय MHMar 236

आपण करीत असलेले भोजन हे अतिगरम किंवा अति थंड नसावे. जर जेवण थंड असेल तर पचनाअगोदर पोटामध्ये त्याला उष्णता पोटातील उष्मांकाने मिळवावी लागते मगच पचनास सुरुवात होते. थंड पेये व थंडपदार्थ सुद्धा यामुळेच शरीरास घातक असतात. त्याचबरोबर अति गरम पदार्थाने सुद्धा शरीराची शक्ति कमी होते. तसेच भोजनाच्यावेळी द्रवपदार्थ जास्त घेतल्यास पचनामध्ये अडचणी येतात. कारण द्रव पदार्थ खाण्यात आलेल्या पदार्थामध्ये पूर्णपणे समरुप व्हायला हवेत. भोजनात मीठाचा अतिवापर टाळावा. लोणची आणि अति मसालेदार पदार्थ भोजनातून काढून टाका. फळांचा वापर भरपूर करा. जेवताना जे लोक पेयाचा वापर करणारांना अपचनाच्या तक्रारी असतात तेव्हा ते टाळावे. MHMar 236.2

*****