Go to full page →

अध्याय २७—दारुचा व्यवसाय आणि मद्याचा निषेध MHMar 260

“आपल्या शेजाऱ्याला मदिरा पाजून
त्याला मद्यपी बनविणारा हाय हाय करील.” MHMar 260

“जो आपले घर अधर्माने बांधितो आपल्या माड्या अन्यायाने उभारितो, आपल्या शेजाऱ्याकडून फुकट सेवा करुन घेतो त्याला वेतन देत नाही तो हाय हाय करणार तो म्हणतो मी आपल्यासाठी विस्तीर्ण घर व लांब, रुंद माड्या बांधीन तो त्याला बहूत खिडक्या पाडितो, त्याने घरास गंध रसची तक्तपोशी केली आहे. हिंगुळाचा रंग दिला आहे तू गंध सरुची शेखी मिरवितोस म्हणून तू राजा ठरशील काय ? तुझा बाप खातपीत व धर्मन्याय करीत नसे काय ? तेव्हा त्याचे बरे चालले होते. परमेश्वर म्हणतो हेच मला जाणणे नव्हे काय ? तरीपण केवळ निर्दोषाचा रक्तपात, जुलूम जबरी व अन्याय धनप्राप्ति याकडे तुझे डोळे व मनही लागले आहेत.” (यिर्मया २२:१३-१७). MHMar 260.1