Go to full page →

अध्याय २९—कुटुंब बनविणारे MHMar 280

“बुद्धीने घर बनते आणि समजूतदारपणाने स्थिर होते.’ MHMar 280

ज्याने आदमाला सहचारिणीरुपाने हवा दिली त्याने विवाहाच्या सुअवसर कार्याची आश्चर्यकारक निर्मिती केली. विवाहाच्या प्रसंगी जो निमंत्रित एकत्र जमले होते. त्या आनंदाच्या प्रसंगी ख्रिस्ताने आपल्या सार्वजनिक कार्याची सुरुवात केली. अशा प्रकारे त्याने विवाह विधीचा स्वीकार करुन दाखविले की त्यानेच एदेनामध्ये विवाहाची स्थापना करुन मान्यता दिली होती. त्याने ठरविले की पुरुष आणि स्त्री विवाहाच्या पवित्र बंधनामध्ये बांधले जावे. मुले जन्माला घालतील, समाजात त्यांना मानमरातब मिळेल आणि ही मुले स्वर्गीय कुटुंबातील मुले होतील. MHMar 280.1

ख्रिस्ताने विवाहसंस्था स्थापन करुन त्याचा आदर ही केला कारण ख्रिस्त आणि त्याच्या लोकांमधील हा संबंधाचे प्रतीक आहे. तो स्वत: वर आहे आणि मंडळी ही त्याची वधु आहे. ज्याविषयी तो आपल्या निवडलेल्या लोकांविषयी बोलतो “माझ्या प्रिये तू सर्वांग सुंदर आहेस तुझ्यात काही व्यंग नाही.” (गीतरत्न ४:७). ख्रिस्तानेही मंडळीवर प्रेम करुन स्वत:ला तिच्यासाठी दिले की त्याच्या वनाद्वारे आणि पाण्याद्वारे स्नान करुन (बाप्तिस्मा) शुद्ध करुन पवित्र बनविले. म्हणजे ती पवित्र व निर्दोष प्रीति करावी.” (इफिस ५:२५-२८). MHMar 280.2

पृथ्वीवरील सर्व बंधनामध्ये विवाहाचे बंधन सर्वात निकटचे संबंध आहेत. ते कोमल व पवित्र संबंध आहेत. मानव जातीच्या आशीर्वादासाठी हे संबंध बनविले आहेत. यावरील जबाबदारी आणि विचार करुन परमेश्वराच्या आशीर्वादाचा प्रभाव पूर्ण जगाला आनंदी करतो. मानवी बद्धी जे करु शकत नाही ते लोक परमेश्वराच्या अनुग्रहा करवी करु शकतात. ते आपल्या संपूर्ण प्रेमाकरवी परमेश्वराला समर्पित करतात. परमेश्वरसुद्धा त्या दोन हृदयांना एकत्र बांधू शकतो व ते स्वर्गाशी जोडले जातात. कोमलता, प्रेम व खुशीच्या शब्दांची देवाणघेवाण होते. स्वर्गाच्या बळकट धाग्यांनी हे सुंदर संबंध बांधले जातात. त्यापेक्षाही अधिक मजबूत पृथ्वीवरील कोणत्याही मजबूतीपेक्षा हे बंध मजबूत असतात. रेशमी धागे नाजूक जरी असले तरी ते बळकट असतात. या धाग्याचे वस्त्र कुटुंबातील गोष्टी त्यामध्ये लपल्या जातात आणि सोनेरी धाग्यांचे हे बंध अति टिकाऊ असते. MHMar 280.3

सोन्यापेक्षा उत्तम शांतीचे घर, जेथे असते सदा परोपकार, प्रेमाचे मंदिर स्वर्गाचे जीवन, पावित्र्याने पत्नी, आई आणि बहिण, घर कितीही साधे असो; खावयास भाकर असो की नसो, आशीर्वाद कधी विकला किंवा खरीदला जात नाही. सोन्याहूनही भारी शांति तेथे असते. MHMar 281.1

*****