Go to full page →

मुलांच्या आजारपणातील देखरेख MHMar 297

अनेक बाबतीमध्ये मुलांच्या आजारपणात त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यांच्या भोजनामध्ये अनियमिपणा, थंडीच्या दिवसांमध्ये अपुरे कपडे, रक्ताभिसरणासाठी शरीराची हालचाल न करणे, व्यायाम न करणे किंवा रक्त शुद्धिसाठी मोकळ्या हवेत न फिरणे. ताजी हवा न घेणे म्हणून माता-पित्यांनी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी शिक्षण घेणे आवश्यक आहे आणि होता होईल तितक्या लवकर उपचार करुन सुधारणा करावी. MHMar 297.3

सर्व आई-वडिलांचे हेच कर्तव्य आहे की आपल्या मुलांच्या आजारपणामध्ये त्यांची देखरेख करणे, उपचार करणे आणि आरोग्यास हानीकारक असणारे पदार्थ वर्ण्य करणे. विशेष करुन मातांना याचे ज्ञान असणे अति आवश्यक आहे. कारण बहुतेक वेळ आईच मुलांची काळजी घेते. आपल्या आजारी मुलाची काळजी कशी घ्यावी, त्याच्यावर काय उपचार करावेत हे आईला समजणे अति आवश्यक आहे. कारण तिने केलेल्या उपचारामध्ये व देखरेखीमध्ये तिचे प्रेम ओतप्रोत भरलेले असते. म्हणून आईचे बाळ कोणा अनोळखीच्या हाती सोपवू नये कारण बाळाचा विश्वास त्याच्या आईवरच पूर्णपणे असतो. MHMar 298.1