Go to full page →

मानवाची सृष्टी MHMar 321

मानवाच्या निर्मितीसाठी परमेश्वराच्या हातांचा वापर झाला आहे. जेव्हा परमेश्वराने मनुष्य घडविला स्वतःच्या हातांनी आपल्या प्रतिरुपाचा मातीतून त्याला घडविला तेव्हा तो संपूर्ण व्यक्ति होता परंतु त्यामध्ये जीवन नव्हते तेव्हा स्वतः परमेश्वराने त्याच्यामध्ये आपला जीवनी श्वास फंकला आणि मनुष्य जीवधारी प्राणी बनला. तो चेतनामय झाला. मनुष्याच्या शरीरातील सर्व अवयव इंद्रिय कार्य करू लागली. त्याचे हृदय, रक्तवाहिन्या, मेंदू, अवयव, जीभ, हातपाय व ज्ञानेंद्रिय सर्व काही कार्य करू लागली. आणि देवाने ती सर्व आपल्या नियंत्रणाखाली ठेवली. अशाप्रकारे मनुष्य जीवधारी प्राणी झाला. या सर्व गोष्टी ख्रिस्ताद्वारे एक व्यक्तिगत म्हणून निर्माण केल्या. त्याने मनुष्याची निर्मिती केली. व त्याला बुद्धी व जेव्हा आमचीही उदरामध्ये निर्मिती होत असतानाही त्याच्यापासून काहीच लपवून राहात नाही कारण तो सर्व काही जाणतो. आम्ही अपूर्ण असतानाही त्याचे डोळे सर्व काही पाहतात. आमचे सर्व अवयव, इंद्रिय त्याच्या पुस्तकात अगोदरच लिहीले असतात. आमच्या निर्मिती अगोदर तो ते सर्व लिहून ठेवतो. प्राण्यांच्या खालपासून ते वरपर्यंत व सर्व सृष्टी निर्माण केली ती मानवाची विचार करुनच. म्हणजे मानव परमेश्वराचा महिमाकरील. परंतु मनुष्याला त्याने त्याने स्वतःसारखे बनविले नाही. अहो, पृथ्वीवरील सर्व लोकहो परमेश्वराचा जयजयकार करा, हर्षाने त्याची सेवा करा गीत गात त्याच्यापुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा, त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा त्याचे उपकार स्मरण करा त्याच्या नावाचा धन्यवाद करा. (स्तोत्र १००:१-४). “परमेश्वर आपला देव ह्याची थोरवी गा. आणि त्याच्या पवित्र डोंगरापाशी नमन करा; कारण परमेश्वर आपला देव पवित्र आहे.” (स्तोत्र ९९:९). MHMar 321.2