Go to full page →

नास्तिक लेखक MHMar 343

अनेक लोक विचार करतात की शिक्षण प्राप्त करायचे असेल तर ते नास्तिक लोकांना लिहीले त्या पुस्तकांचा अभ्यास करावा. कारण त्यांच्या विचारामध्ये चमकदार मोती असतात. परंतु विचारांचे हे मोती निर्माण करणारा कोण आहे? तो केवळ परमेश्वर आणि परमेश्वरच आहे. परमेश्वरच प्रकाशाचे मूळ आहे. आम्ही या छोट्या विचारांसाठी नास्तिक लोकांनी लिहिलेल्या लेखांना महत्व देतो? त्यामध्ये डुंबत राहतो? परंतु संपूर्ण सत्य तर आमच्याजवळ आहे. MHMar 343.1

जो मनुष्य परमेश्वराच्या विधानाविरुद्ध आहे ते ती बुद्धी कशी प्राप्त करू शकतात. कधी कधी ते प्रगट करतात ? स्वतः सैतानाने स्वर्गीय न्यायालयामध्ये शिक्षा भोगली आहे. आणि त्याला बऱ्या वाईटाचे ज्ञान आहे. तो मोलवान गोष्टींना वाईटामध्ये मिसळतो. त्यामुळे त्याला धोका देण्याची संधी मिळते. सैतानाने स्वर्गीय चमकदार पोशाख मिळविला आहे तेव्हा आम्ही त्याला स्वर्गीय प्रकाश दूत म्हणून त्याचा स्वीकार करायचा काय ? तो एक स्वर्गीय दूत होता. त्याचे अनुयायी सुद्धा स्वर्गीय दूत होते म्हणून त्यांच्याकडे असणाऱ्या तेजस्वी पोशाखाचा वापर करून त्यामध्ये वाईटपणा मिसळून लोकांचा दिशाभूल करतात. सैतान व त्याच्या हस्तकांजवळ विविध प्रकारचे शिक्षण आहे. त्यांच्याजवळ आत्म्यांना प्रेरणा देणे आणि काम करण्याची योग्यता प्राप्त करणारे प्रतिनिधी आहेत. अशांशी आम्ही सहयोग करावा काय जे परमेश्वराविरुद्ध आहेत? आम्ही या सैतानाच्या प्रतिनिधींच्या रचना आम्ही आमच्या शिक्षणामध्ये स्वीकारून त्यांचा वापर करावा काय? आम्ही आमचा वेळ आणि पैसा या नास्तिकांच्या ज्ञानामध्ये खर्च करावा काय ? जर आम्ही परमेश्वराच्या वचनांतून अनमोल गोष्टींचे अध्ययन करण्यासाठी वेळ खर्च केला तर आज जे हजारो लोक अंधकारामध्ये आहेत ते जीवनाच्या प्रकाशाचा आनंद उपभोगतील. MHMar 343.2