Go to full page →

अध्याय ३८—खऱ्या ज्ञानाचा शोध घेण्याचे महत्व MHMar 354

“आपला कान उघड आणि आपले मन माझ्या शिक्षणाकडे वळव.” MHMar 354

आम्ही जितके काही समजतो त्यापेक्षाही अधिक स्पष्टपणे समजण्याची आम्हाला गरज आहे. ते म्हणजे ज्या महान संघर्षामध्ये आम्ही लढत आहोत यामध्ये कोणकोणते विषय आहेत. आम्हाला अधिक स्पष्टपणे परमेश्वराच्या वचनाच्या सत्याचे मोल आणि त्या धोक्यांना समजण्याची गरज आहे कारण सैतान नेहमी आम्हाला सत्यापासून दूर करण्याचा सतत प्रयत्न करीत आहे. MHMar 354.1

आमच्या मुक्ततेसाठी ज्या बहूमोल बलिदानाची गरज होती ती आम्हाला ही गोष्ट दाखविते की पाप फारच वाईट आहे. पापामुळे मानवाचे सर्व तंत्र बिघडून गेले आहे. त्यांची बुद्धी भ्रष्ट आणि दूषित झाली आहे, विचार करण्याची शक्ति नष्ट झाली आहे. पापामुळे आत्म्याची कार्यक्षमता नष्ट झाली आहे. बाहेरून येणार मोह त्यांच्या हृदयाच्या तारांना स्पर्श करतात आणि विचार न करता त्यांची पाय वाईटाकडे धावतात. MHMar 354.2

आमच्या वतीने दिले गेलेले बलिदान ज्याप्रकारे सिद्ध झाले होते. पापाची मलिनताही आमच्या सुधारणेने सिद्ध व्हायला हवी. परमेश्वराची योजना वाईटाच्या कोणत्याही कृत्याला अनुमती देत नाही. व कोणीही अधर्माच्या कृत्याने दोषी होण्याकडून वाचू शकत नाही व त्याचे दोषही पुसून जाणार नाही. सुवार्ताप्रसाराचे नीतिवचन स्वर्गीय चारित्र्याची योजनेअंतर्गत कोणतेच दोष स्वीकारले जाणार नाहीत. ख्रिस्ताचे जीवन पूर्ण रुपाने नियमांच्या आदेशांचे पालन करीत असे. तो म्हणाला, “मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळतो.” (योहान १५:१०). MHMar 354.3

आज्ञापालन आणि सेवेसंबंधाने ख्रिस्त आमचा आदर्श आहे. केवळ परमेश्वरच हृदये नवी करतो. “कारण इच्छा करणे व कृति करणे ही तुमच्या ठायी आपल्या सत्यसंकल्पनासाठी साधून देणारा तो देव आहे. “परंतु आम्हाला सांगितले आहे भीत भीत व कापत आपले तारण साधून घ्या.” (फिलिपैकरासपत्र २:१३,१२). MHMar 354.4