Go to full page →

भविष्याची योजना MHMar 378

अनेक लोक भविष्यासाठी निश्चित योजना बनविण्यासाठी असमर्थ आहेत. त्यांचे जीवन अस्थिर आहे. बोललेल्या गोष्टींच्या परिणामाची त्यांना जाणीव नसते. ज्यामुळे ते उत्तेजन आणि बेचैनीने भरतात. आम्ही लक्षात ठेवावे की या पृथ्वीवर आपण प्रवासी जीवन जगत आहोत. आमच्याकडे तेवढी बुद्धी नाही की आपण आपल्या जीवनासाठी योजना बनवावी. आमचे भविष्य निश्चित करणे आपल्या हाती नाही. “आब्राहामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतना दाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला आणि आपण कोठे जात आहोत हे ठाऊक नसताही तो निघून गेला.” (इब्रीलोकास पत्र ११:८). MHMar 378.1

ख्रिस्ताने आपल्या जगीक जीवनामध्ये स्वत:साठी कोणतीच योजना बनविली नाही. त्याने आपल्या परमेश्वराच्या योजनेचा स्वीकार केला होता. आणि दिवसे न दिवस परमेश्वर आपल्या पुत्राला रोजच्या योजना सांगत होता. अशाप्रमाणे आम्हीसुद्धा रोजच्या जीवनामध्ये परमेश्वरावर अवलंबून राहावे. म्हणजे आमचे जीवन परमेश्वराच्या योजनेवर राहिल. म्हणजे आमच्याकरवी परमेश्वराच्या इच्छा सहज पूर्ण होतील. तेव्हा आम्ही आमच्या दैनंदिन दिवसाचे कार्यक्रम त्याच्या हाती सोपविली, तर तो आम्हांला मार्गदर्शन करील. MHMar 378.2

अनेक लोक आपल्या भविष्याची योजना करण्यासाठी वाईट रीतीने अयशस्वी होतात. तेव्हा आपल्यासाठी परमेश्वराला योजना बनवू द्या. लहान मुलाप्रमाणे आपण परमेश्वरावर विश्वास ठेऊ या. “तो आपल्या भक्तांची पावले सांभाळील. पण दुष्ट अंधारात स्तब्ध पडून राहतील.” (१ शमुवेल २:९). परमश्वर आपल्या लोकांना तोपर्यंत मार्गदर्शन करीत नाही जोपर्यंत ते परमेश्वराचे सहकार्य करुन त्याच्या गौरवी हेतुपूर्ण करण्याची तयारी करीत नाहीत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते त्याच्या मार्गदर्शनाची आशा करतात. MHMar 378.3