Go to full page →

समर्पण : विश्वास MHMar 411

जेव्हा आम्ही नम्र हताश होतो तेव्हा आपण त्या ठिकाणी असतो जेव्हा परमेश्वर स्वत:ला आमच्यावर प्रगट होऊ शकतो आणि सहाय्यही करतो. आम्हांवर तो प्रसन्न असतो. जेव्हा आम्ही भूतकाळामध्ये दाखविलेली दया आणि आशीर्वादाची आठवण करतो तेव्हा आणखी मोठ्या आशीर्वादाची मागणी करतो. जे लोक त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतात त्यांची मोठ्यातील मोठी अपेक्षा पूर्ण करण्यास तो त्यांच्यासाठी कार्य करतो. प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक आहे की त्यांच्या मुलांना कोणत्या प्रकारची गरज आहे आणि मानवाचला स्वर्गीय आशीर्वाद मिळविण्यासाठी काय करावे लागते आणि किती प्रमाणात सामर्थ्य ते सांभाळू शकतात आणि तो आम्हांला सर्व काही देतो जे आमच्या आत्म्याच्या विकासासाठी योग्य आहे. MHMar 411.2

जे काही आम्ही करु शकतो त्यामध्ये आमचा विश्वास कमी असावा व जे काही प्रभु आमच्यासाठी करतो त्यामध्ये आमचा विश्वास जास्त असला पाहिजे. आपण आपल्या स्वत:च्या कार्यासाठी नाही, परंतु येशू ख्रिस्ताच्या कार्यामध्ये असायला हवे. आपल्या इच्छा आणि आपले मार्ग आपण प्रभुला समर्पित करुन या. आपण एकही गोष्ट लपवू नये, एकाही गोष्टीची तडजोड करु नका. ख्रिस्तामध्ये स्वतंत्र होण्याचा अर्थ काय आहे हे समजून घ्या. MHMar 411.3

प्रत्येक शब्बाथ केवळ उपदेश ऐकणे, पवित्रशास्त्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचणे किंवा त्याच्या एका एका वाक्याची व्याख्या करणे हे आमच्यासाठी आणि ऐकणाऱ्यासाठी तोपर्यंत लाभदायक होत नाही जोपर्यंत पवित्रशास्त्रातील सत्य आम्ही आमच्या रोजच्या जीवनामध्ये अनुभव घेत नाही. आपली समज, इच्छा व स्नेह हे सर्व परमेश्वराच्या अधीन व्हायला हवे. तेव्हाच परमेश्वराचा पवित्र आत्मा त्याच्या कार्याद्वारे वचनाचे उपदेश आमच्या जीवनाचा सिद्धांत बनेल. MHMar 412.1

जसे आपण प्रभुला सहाय्य मागतो तसे आपण विश्वास ठेवायला हवा की ते आपणास मिळाले आहे. आपल्या मुक्दिात्याचा आदर करा. सर्व शक्ति व सर्व बद्धी सर्व काही आपल्यासाठी उपलब्ध आहे. आम्हांला केवळ मागायचे आहे. MHMar 412.2

निरंतर परमेश्वराच्या प्रकाशात चाला. रात्रं-दिवस त्याच्या स्वभावाचे मनन करा व अभ्यास करा. तेव्हाच आपण त्याची सुंदरता पाहू शकू व त्याच्या भल्यामध्ये आनंद करु. परमेश्वराच्या प्रेमाच्या जाणीवतेने आपले हृदय उल्हासेल. आपण असे उंचावले जाऊ की जणू काय अनेक हातांनी आम्हास उचलून धरले आहे. परमेश्वर जो शक्ति आणि बुद्धी देतो. त्या करवी आपण जितके आतापर्यंत समजू शकलो नाही त्यापेक्षाही अधिक आपण समजू व त्याप्रमाणे करु शकू. MHMar 412.3