Go to full page →

“मी तुम्हांला सामर्थ्य देतो” MHMar 54

बारा प्रेषितांप्रमाणे सत्तर शिष्यांना ज्यांना नंतर ख्रिस्ताने सेवा कार्यासाठी पाठविले होते. त्यांच्या सेवा कार्यावर ईश्वरी शक्तिची मोहोर लावली होती. जेव्हा त्यांचे कार्य समाप्त झाले तेव्हा ते सर्व आनंदाने हे सांगत आले की, “प्रभुजी आपल्या नावाने भुते देखील आम्हांला वश होतात तेव्हा त्याने त्यांना म्हटले, सैतान आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिले.” (लूक १०१७१८). आतापासून ख्रिस्ताच्या अनुयायांना सैतानाला एक पराजित शत्रुच्या रुपामध्ये पाहायचे आहे. वधस्तंभावर येशून आपल्या अनुयायांसाठी सैतानावर विजय मिळविला आहे. आणि त्याची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी या विजयाला आपल्या विजयाच्या रुपामध्ये पाहायचे आहे. वधस्तंभावर येशून आपल्या अनुयायांसाठी सैतानावर विजय मिळविला आहे आणि त्याची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी या विजयाला आपल्या विजयाच्या रुपामध्ये स्विकार करावा. तो म्हणतो की, “पाहा मी तुम्हाला साप आणि विंचू ह्यांना तुडविण्याचा व शत्रुच्या सर्व शक्तिवरचा अधिकार दिला आहे. तुम्हांला काही एक बाधणार नाही.” (लूक १०:१९). MHMar 54.2

पवित्र आत्म्याची सर्व शक्तिमान शक्ति प्रत्येक पश्चात्तापी आत्म्याची सुरक्षा आहे. प्रत्येक व्यक्ति जी पश्चात्ताप आणि विश्वासाबरोबर ख्रिस्ताची शक्ति प्राप्त करुन घेतो. ख्रिस्त कोणालाही शत्रुच्या अधीन होऊ देणार नाही हे सत्य आहे की सैतान एक शक्तिशाली प्राणी आहे, परंतु परमेश्वराचे धन्यवाद मानुया की आमच्याजवळ सर्व शक्तिमान प्राणी आहे, परंतु परमेश्वराचे धन्यवाद मानुया की आमच्याजवळ सर्व शक्तिमान उद्धारक आहे. ज्याने त्या दुष्टाला स्वर्गातून हाकलून लावले होते. जेव्हा आम्ही सैतानाच्या शक्तिविषयी वाढवून चढवून बोलतो तेव्हा सैतान खुष होतो. तेव्हा ख्रिस्ताच्या बाबतीत या गोष्टी का बोलू नये ? ख्रिस्ताचे प्रेम व त्याच्या शक्तिचे गुणगान का नाही करायचे ? MHMar 54.3

परमेश्वराच्या आसनाच्या चहबाजूंनी असणारा मध्ये धनुष्य सनातन काळाची साक्ष आहे. ते हे की “देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकूलता एक पुत्र दिला यासाठी जो कोणी त्याजवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६). जगासमोर हे फार मोठे प्रमाण आहे की परमेश्वराने आपल्या मुलांना त्या दृष्टाच्या संघर्षामध्ये त्यांना एकटे सोडले नाही. त्याने आमच्यासाठी त्याचे आसन जोपर्यंत स्थापन आहे तो पर्यंत आपल्या सुरक्षितेसाठी त्याचे सामर्थ्य आहे. MHMar 55.1

*****