Go to full page →

आजाराचे कारण पाप MHMar 68

जेव्हा ख्रिस्ताने रोग्यांना बरे केले तेव्हा त्यांना इशारे दिले की, “पाहा तू बरा झाला आहेस आतापासून पाप करु नकोस, करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.” (योहान ५:१४). अशाप्रकारे त्याने असे शिकविले की परमेश्वराच्या रचनाचे उल्लंघन करणारे स्वत:वर रोग आजार आणतात आणि आरोग्य केवळ त्याच्या आज्ञापालनानेच सुरक्षित ठेवले जाते. MHMar 68.2

डॉक्टर रुग्णाला सांगतो की परत आरोग्य प्राप्त करण्यासाठी त्याला परमेश्वराशी सहकार्य करणे आवश्यक आहे. हे सत्य डॉक्टरांना नित्य स्वत:च्या डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे की पापामुळेच रोग आजार येत असतात. त्याला समजले पाहिजे की परमेश्वराचे नियम हे दहा आज्ञाप्रमाणेच आहेत ते पवित्र आहेत व त्यांचे पालन करण्या करविच आरोग्यचेही रक्षण केले जाते. जे हानिकारक सवयीचे गुलाम असतात त्यांना अधिक दुःख व त्रास होतात. परंतु वाईट सवयी सोडून ते परमेश्वराच्या नियमांचे पालन करुन शरीराचे संरक्षण करतात ते योग्य कार्य करुन आपल्या शरीराचे रक्षण करतात. व रोग आजारापासून दूर होतात. त्यांना शिकविणे आवश्यक आहे की शारीरिक, आत्मिक आणि मानसिक शक्तिंना नुकसान पोहोचविणारी सर्व संवया हे पाप आहे. आणि परमेश्वराने मानवासाठी जे नियम लावून दिले आहेत त्यांचे मानवाने पालन करणे आवश्यक आहे. मानवाच्या हितासाठीच परमेश्वराने या नियमांची स्थापना केली आहे. जेव्हा डॉक्टर एखाद्या रुग्णाला पाहतो आणि त्याचे चुकीचे राहणीमान व अयोग्य खाणपान व वाईट सवयीमुळे तो रोगी झाला आहे ते ओळखतो व उपचार करतो, परंतु असे कशामुळे झाले ते सहसा सांगत नाही. मद्यपान धूम्रपान आणि व्यभिचार व अशाच वाईट सवयीमुळे मनुष्य रोगी होतो. याबद्दल रुग्णाला स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे. मनुष्य जी पापे करतो त्यामुळेच तो रोगाने पछाडला जातो. जे लोक जीवनाचा सिद्धांत समजतात त्यांनी खूप प्रयत्न करुन रोग आजारांपासून स्वत:चा बचाव करायचा आहे. सतत वेदनांशी संघर्ष करताना त्यातून सुटका कशी करावी याचे प्रयत्न करतात आणि एक डॉक्टर गप्प कसा राहू शकतो ? तो जर रुग्णाला आजारापासून मुक्त करण्यासाठी निरोगी जीवन जगण्याचे सल्ले देऊ शकत नाही तर तो रुग्णाला सहानुभूतीने वागू शकतो. MHMar 68.3

ही गोष्ट स्पष्टपणे समजली पाहिजे की परमेश्वराच्या आज्ञापालनाचा मार्गच जीवनाचा मार्ग आहे. परमेश्वराने निसर्ग नियमांची स्थापना केली. परंतु त्याची व्यवस्था आमच्यावर लादली गेली नाही. केवळ “हे करु नको’ असेच सांगितले आहे. मग ते शारीरिक किंवा नैतिक असो. याचे तात्पर्य म्हणजे एक प्रतिज्ञा आहे. जर आपण त्याचे पालन केले तर आशीर्वाद मिळेल. परमेश्वर आपल्यावर कधी दबाव घालून अमूक गोष्ट केलीच पाहिजे असे सांगत नाही. परंतु आम्ही वाईटापासून वेगळे होऊन सत्य मार्गाने चालावे अशी त्याची इच्छा आहे. इस्राएलांना जे नियम शिकविले गेले त्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. जीवनाच्या सवयींच्या संबंधाने परमेश्वराने त्यांना स्पष्ट निवेदन केले होते. त्याने त्यांना शारीरिक आणि आत्मिकतेच्या भल्यासाठी नियम दिले होते आणि त्यांच्या पालन करण्याने आश्वासन दिले होते “आणि परमेश्वर तुझ्यापासून सर्व प्रकारचे रोग दूर करील.” (अनुवाद ७:१५). MHMar 69.1

ज्या गोष्टी मी आज तुम्हांला साक्षीदाखल सांगत आहे त्या सर्व लक्षात ठेवा. “कारण ज्यास ती लाभतात त्यांस ती जीवन देतात आणि त्यांच्या संबंध देहाला आरोग्य देतात.” (अनुवाद ३२:४६, नीतिसूत्र ४:२२). MHMar 69.2

परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही ती सिद्धता प्राप्त करुन घ्यावी जी ख्रिस्ताने देऊ केलेल्या दानाकरवी आमच्यासाठी सोपी करुन ठेवली आहे. त्याची निवड योग्यप्रकारे करणे आणि पवित्र साधनांशी जोडणे आरोग्यदायी नियमांचे पालन करुन स्वर्गीय प्रतिमा आपल्यामध्ये स्थापन करणे. परमेश्वराने लिहिलेले आणि निसर्गाच्या नियमांचे पुस्तक हे जीवनाचा सिद्धांत प्रगट करतात. आमचे हे कर्तव्य आहे की हे ज्ञान मिळवून आपला देह आणि आत्मा आरोग्याला समपर्ति करणे म्हणजे यासाठी परमेश्वर आपणास सहाय्य करील. MHMar 70.1