Go to full page →

अध्याय ८—प्रत्येक चिकित्सकाला शिक्षक झाले पाहिजे MHMar 80

खरा चिकित्सक एक शिक्षक असतो. केवळ ज्यांच्यावर तो उपचार करतो त्यांच्यासाठीच नाही तर ज्या समाजामध्ये तो राहतो त्यांच्यासाठी सुद्धा. त्यांच्या विषयीचीही जबाबदारी त्यांना समजते. कारण प्रत्येक चिकित्सक (डॉक्टर) शारीरिक, नैतिक आरोग्याचा रक्षक आहे. त्याचे प्रयत्न रुग्णावर योग्य मार्गदर्शन द्यायचे आहे. जीवनातील आरोग्यदायी सवयी कशी लावून घ्यायची याचे मार्गदर्शन करायचे व त्यांना तसे प्रोत्साहन देण्याची जबाबदारी चिकित्सकांची आहे आणि योग्य शिक्षणाचे ज्ञान प्रसारण करणे आवश्यक आहे. MHMar 80.1