Go to full page →

नैसर्गिक उपचार MHMar 82

शुद्ध हवा, सूर्यप्रकार, पाणी, व्यायाम, विश्रांती, संयम व योग्य भोजन हे नैसर्गिक उपाय आहेत. या सर्व गोष्टींचा योग्य वापर करुन ईश्वर शक्तिवर विश्वास ठेवल्यास उत्तम आरोग्य लाभते. या गोष्टींमध्येच खरे नैसर्गिक उपाय आहेत. या उपचारांचे ज्ञान असणेही आवश्यक आहे. या नैसर्गिक साधनांचा योग्य वापर करण्यासाठी त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास करुन उपचार नैसर्गिक औषधोपचारामध्ये निसर्गोपचाराचा वापर MHMar 82.2

नैसर्गिक औषधोचारामध्ये अधिक लक्ष आणि प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. यामध्ये अनेक लोकांची असे उपचार करण्याची इच्छा नसते. कारण या उपचाराला वेळ लागतो. उतावीळ लोकांना हे उपचार अधिक हळूहळू असल्याचे वाटते. शरीरास हानिकारक असणाऱ्या सवयींचा त्याग करणे आवश्यक आहे. आपण निसर्ग नियमाप्रमाणे वागू लागलो तर रोग आजार होणारच नाहीत म्हणजे निसर्गा नियमानुसार चालू लागलो तर निसर्ग आपले कार्य बुद्धीचातुर्याने व्यवस्थितच करील आणि जे धीराने व सहनशीलतेने निसर्गनियम पाळतात ते शारीरिक आणि मानसिकरित्या आरोग्यदायी जीवन जगतील. सर्व साधारणपणे बहुतेक जण आपल्या आरोग्याकडे खूप कमी प्रमाणात लक्ष देतात. आजारी पडल्यावर उपचार करण्याऐवजी आजारी पडूच नये, यासाठी उपाययोजना करणेच उत्तम आहे. स्वत:चे आणि समाजाचे चांगले करण्याचे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. जीवनाच्या नियमांचे पालन करुन व त्याचे ज्ञान प्राप्त करुन त्याचे सक्तीने पालन करावे. प्रत्येकाने स्वत:च्या जीवनाचे म्हणजे शरीर विज्ञान व निसर्गोपचाराचे ज्ञान घ्यावे व त्याप्रमाणेच आपले जीवन व्यतीत करावे. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव एकमेकांवर अवलंबून आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव किती महत्त्वाचा आहे त्याचे कार्य काय आहे याचे ज्ञान मिळविणे अति आवश्यक आहे. मेंदू हा शरीराचा राजा आहे. त्याला किती काम द्यावे व विश्रांती किती द्यावी हे आपण ठरवायचे आहे. त्या विषयी शिकणे आवश्यक आहे. MHMar 82.3