Go to full page →

“चिकित्सक आणि नेमस्तपणाचे कार्य” MHMar 88

असे अनेक रुग्ण चिकित्सकांकडे येतात जे तंबाखू आणि मादक पदार्थामुळे स्वत:ला नष्ट करुन घेतलेले असतात. जो चिकित्सक आपल्या कार्यामध्ये विश्वासू असतात त्यांनी रुग्णांच्या त्यांच्या आजाराचे कारण स्पष्ट करायला हवे. परंतु ते जर स्वत:च तंबाखू आणि नशा येणाऱ्या पदार्थांच्या आहारी असतील तर त्यांच्या सांगण्याचा इतरांना किंवा रुग्णांना काय सल्ला देणार आणि त्यांच्यावर विश्वास कोण ठेवील ? म्हणून चिकित्सक या नात्याने प्रथम त्याने स्वत: शुद्ध ठेवणे आवश्यक आहे. MHMar 88.1

म्हणून जे कोणी आरोग्यदायी संदेश देणारे मादक पदार्थ आणि मद्यपानापासून इतरांना दूर राहण्याचा सल्ला देणाऱ्यांनी प्रथम स्वत: त्या गोष्टींपासून अलिप्त राहावे. त्यांनी आपली वर्तणूक शुद्ध ठेवावी. तरच त्यांच्या बोलण्याचा व चारित्र्याचा इतरांवर प्रभाव पडेल. चिकित्सकांनी सुद्धा स्वत:साठी एक नेमस्तपणा ठेवाव. त्यांचे राहणीमान, त्यांची जीवनशैलीमध्ये नेमस्तपणा असावा, आरोग्यदायी असावा. आपल्या व्यवसायाला शोभेल असेच त्यांचे वागणे असावे. इतरांच्या किंवा रुग्णांवर त्यांचा प्रभाव पडावा असे त्यांनी आपले चारित्र्य ठेवावे. जे लोक स्वत:च्या आरोग्याची, देहाची काळजी घेतात त्यांचे आचार विचार योग्य असतात तेच इतरांना आरोग्यदायी जीवनाचे योग्य मार्गदर्शन करु शकतात अशांवर लोक विश्वास ठेवतात. कारण त्यांना आपली जबाबदारी ठाऊक असते. आरोग्य नियमांचे योग्य पालन करणारे असतात. मानवाची व त्याच्या आरोग्याची योग्य देखरेख करण्याची त्यांची पवित्र जबाबदारी असते. MHMar 88.2