Go to full page →

अध्याय ९—उपचार करणारे आणि त्यांचे कार्य MHMar 92

शिक्षण आणि बरे करणे MHMar 92

जेव्हा येशूने बारा शिष्यांना प्रथमच शुभवर्तमान प्रसाराला पाठविताना त्यांना सांगितले की, “जात असताना अशी घोषणा करीत जा की, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. रोग्यांस बरे करा. मेलेल्यांस उठवा, कुष्ठरोग्यांस शुद्ध करा, भूते काढा, तुम्हांला फुकट मिळाले आहे फुकट द्या. (मतय १०:७८). नंतर जेव्हा त्याने सत्तर शिष्यांना पाठविले व सांगितले की, “कोणत्याही नगरात तुम्ही गेला आणि त्यांनी तुमचे स्वागत केले तर ते जे तुम्हांस वाढतील ते खा. त्यात जे दुखणाईत असतील त्यांना बरे करा व त्यांना सांगा की देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे. ख्रिस्ताची उपस्थिति आणि शक्ति त्यांच्याबरोबर होती.’ नंतर ते बहात्तर जण आनंदाने परत येऊन म्हणाले. प्रभुजी आपल्या नावाने भुतेदेखील आम्हांला वश होतात.” (लूक १०:१७). MHMar 92.1

येशूच्या स्वर्गरोहणानंतर त्याचे कार्य पुढे चालू राहिले आणि सेवा कार्याची पुनरावृत्ति सर्वत्र दिसू लागली. त्याचे सर्व शिष्य सुवार्ता प्रचाराच्या कार्याला लागले. “आणखी यरुशलेमाच्या आसपासच्या नगरातून गावातून लोक समुदाय दुखणेकऱ्यांना व अशुद्ध आत्म्यांनी पीडलेल्यांना घेऊन तेथे येत असत आणि ते सर्व बरे होत असत.” (प्रेषित ५:१६). MHMar 92.2

आणि येशूचे शिष्य “त्यांनी तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करीत होता व घडणाऱ्या चिन्हांच्याद्वारे वचनाचे समर्थन करीत होता.” (मार्क १६:२०).” आणि फिलिपाने शोमराने शहरी जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. तेव्हा फिलिफाचे भाषण ऐकून वतो करीत असलेली चिन्हे पाहून लोक समुदायांनी त्याने सांगितलेल्या गोष्टींकडे एकचित्ताने लक्ष दिले. कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळांतून ते मोठ्याने ओरडून निघून गेले. पुष्कळ पक्षघाती व पांगळी माणसे बरी झाली आणि त्या नगरात आनंदी आनंद झाला.” (प्रेषित ८:५-८, मार्क १६:२०) MHMar 92.3