Go to full page →

निराश होऊ नका : MHMar 121

जे आत्मे आमच्या प्रयत्नाला लगेच सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत तेव्हा आपण लगेच निराश होतो. एखादा आत्मा जोपर्यंत आशेचा किरण दाखवित नाही तोपर्यंत आपण धैर्य सोडू नये. कारण आपल्या उद्धारकर्त्याने आपणा सर्वांसाठी फारच मोठी किंमत दिली आहे. म्हणून आम्हांला या दुःखी व भरकटलेल्या आत्म्यांना सहजासहजी सैतानाच्या हाती सोडू नये. MHMar 121.1

जे या अवस्थेतून जात आहेत त्यांच्या जागी आपण स्वत:ला ठेऊ या. आपल्याला खानदानी गुणांची शक्ति, परंपरा, वाईट संगतीचे परिणाम, चुकीच्या सवयीची ताकद आणि वातावरणाचा प्रभाव या सर्व गोष्टी लक्षात आणाव्यात. आपणाला नवल वाटणार नाही का की अशा वातावरणामध्ये राहणारे लोक त्या प्रभावामुळे अनेक लोक पतनाकडे जातील ? मग अशांना वर काढण्यासाठी आम्ही जे प्रयत्न करतो त्याला त्यांचा प्रतिसाद सहज मिळेनासा होतो यात नवल ते काय ? MHMar 121.2

सहसा सुवार्ता प्रसाराने जिंकलेले सुरुवातीला असभ्य आणि निराशजनक वाटतात. नंतर मात्र ते सुवार्तेचे शक्तिशाली वाहक बनतात. त्याचे समर्थक बनतात. ते पूर्णपणे भ्रष्ट नसतात. वरुन वाईट दिसणाऱ्या लोकांच्या भावना आतून चांगल्या असतात. यावर लक्ष देणे आवश्यक आहे. मदतीशिवाय अनेक लोक स्वत:च्या प्रयत्नांनी स्वत:ला सांभाळू शकत नाहीत. परंतु धीराने सतत प्रयत्न केल्यास त्यांना वर आणता येऊ शकते. अशा लोकांना मृदू शब्द किंवा दयापूर्ण शब्द वापरुन आणि चिकाटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यांना दयापूर्ण सल्ल्याची आवश्यकता आहे. असे केले तर त्यांच्या हृदयामध्ये एक आशेची ज्योत पेटेल. ती ज्योत विझू न देण्याची खबरदारी घ्या. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या कार्यकर्त्यांनी ही खबरदारी घ्यावी. MHMar 121.3

काही लोक असेही भेटतील जे दीर्घकाळापर्यंत वाईटामध्ये राहिलेले होते. यामुळे त्यांच्या जीवनात कधी सन्मान मिळाला नाही. मग परिस्थिति त्यांच्या बाजूने कितीही अनुकूल असू दे. परंतु धार्मिकतेच्या सूर्याची तेज किरणे त्या आत्म्यामध्ये प्रकाश उत्पन्न करु शकतात. त्यांचे असे भाग्य असेल की त्यांचे जीवन बदलून परमेश्वराशी अनुकूल होईल. म्हणून त्यांच्या मनामध्ये चांगली व पवित्र वचने भरावित. त्यांच्यासमोर तुमच्या जीवनातील चांगल्या गोष्टी दिसू देत म्हणजे त्यांच्या मनातील वाईट गोष्टी जाऊन चांगल्या व योग्य गोष्टींची निर्मिती होईल. वाईट व अंधारातील विचार निघून जातील तसे तुम्ही प्रयत्न करायला हवेत. तुमच्या उदाहरणावरुन ते हे वाचू शकतील की ख्रिस्ती होणे ही किती चांगली गोष्ट आहे. सर्वांत महापातकी लोकांना ख्रिस्ती लोक असे वर काढतील की ते त्या अवस्थेमध्ये पोहोचू शकतील की त्यांना परमेश्वराचे संतान म्हटले जाईल. MHMar 121.4

स्वर्गीय कृपेच्या चमत्काराने अनेक लोकांचे जीवन बदलू शकते व त्यांना जीवनात येण्याची संधी मिळते. घृणा आणि तिरस्कारामुळे ते वाईट रितीने निराश होतात व उदास बनतात, परंतु पवित्र आत्म्याच्या प्रभावाने त्यांची मुर्खता ज्यामुळे त्यांना जीवनात येण्यास अडचण होऊ शकते ती समाप्त होते व ते देवाच्या जीवनात येतात. पापातील दास स्वतंत्र होईल. वाईटपणा नाहीसा होईल व अज्ञानपणावर ज्ञानाचा विजय होईल. विश्वास जो प्रीतिकरवी कार्य करील. हृदय पवित्र होईल आणि बुद्धी प्रकाशीत होईल. MHMar 122.1

“मी तर त्यांनी जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावे म्हणून आलो आहे.” (योहान १०:१०). “तेव्हा तो तिला म्हणाला, मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा.” भिऊ नको विश्वास मात्र धर, तू बरी होशील.” (लूक ८:४८,५०). MHMar 122.2

“विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. लागलाच मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला माझा विश्वास आहे माझा अविश्वास घालवून टाका.” (मार्क ९:२३,२४). MHMar 122.3

*****