Go to full page →

औद्योगिक शिक्षण : MHMar 138

इस्राएलमध्ये औद्योगिक प्रशिक्षण एक कर्तव्य मानले जात असे. प्रत्येक पित्याचे हे कर्तव्य होते की आपल्या पुत्राला कोणती तर उपयोगी करता किंवा व्यवसाय शिकवावा. इस्राएलामध्ये मोठे औद्योगिक कार्यासाठी शिक्षण दिले जात असे. प्रत्येक महिलासाठी घराचा प्रबंध करण्याचे ज्ञान प्राप्त करुन दिले जात असे आणि ते आवश्यक होते. व या कामामध्ये दक्षता घेणाऱ्या महिलांचा सन्मान दृष्टीने पाहिले जात होते. MHMar 138.1

भविष्य वक्त्यांच्या विद्यालयामध्ये विभिन्न प्रकारचे उद्योग व्यवसाय शिकविले जात असत आणि अनेक विद्यार्थी शारीरिक मेहनत करुन आपला खर्च चालवित असे. MHMar 138.2

गरीबांविषयी विचार : MHMar 138.3

तरीही या योजनेमुळे गरीबीपूर्णपणे दूर होऊ शकली नाही. परमेश्वराची योजना नव्हती की गरीबी पूर्णपणे दूर व्हावी. चरित्र विकासाचा परमेश्वराचा हा एक मार्ग आहे. “देशात नेहमीच गरीब लोक असणार म्हणून मी तुला आज्ञा देतो की तुझ्या देशातल्या गरजवंत आणि गरीब बांधवांना सढळ हाताने मदत कर.” (अनुवाद १५:११). MHMar 138.4

“तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे त्यातल्या कोणत्याही गावात एखादा दरिद्री) बांधन तुमच्यामध्ये राहात असला तर त्या दरिद्रीबांधवाबाबत आपले हृदयकठोर करु नको किंवा आपला हात आखडू नको तर तू आपला हात त्याच्यासाठी सैल सोड आणि त्याची गरज भागेल इतके त्याला आवश्य उसने दे.” (अनुवाद १५:७-८). MHMar 138.5

“तुझा एखादा भाऊ कंगाल झाला आणि त्याच्याने काम होत नाही असे तुला दिसले तर तू त्याला आधार द्यावा. परक्याप्रमाणे अथवा उपऱ्याप्रमाणे त्याने तुझ्याजवळ राहावे.” (लेवीय २५:३५). MHMar 138.6

“तुम्ही आपल्या भूमीतील पिकाची कापणी कराल. तेव्हा तू आपल्या शेताऱ्याकोना कोपऱ्यातील पीक झाडून सारे कापू नको आणि पीक काढून घेतल्यावर त्याील सखा वेचूनकडे’ (लेवीय १९:९). MHMar 138.7

“तू आपल्या शेतातील पीक कापशील तेव्हा जर शेतात एखादी पेंढी चुकून राहिली तर ती आणायला परत जाऊ नको, उपरी, अनाथ व विधवा ह्यांच्यासाठी ती राहू दे म्हणजे तुझा देव परमेश्वर तुझ्या हातच्या सर्व कामात तुला आशीर्वाद देईल. तू आपला जैतुन वृक्ष झोडशील तेव्हा एकदा झोडलेली फांदी पुन्हा झोडू नको ती उपरी अनाथ व विधवा ह्यांच्यासाठी असू दे.” (अनुवाद २४:१९-२१). MHMar 138.8

कोणालाही या गोष्टीची भीति बाळगण्याचे कारण नाही की त्याच्या उदारपणामुळे कोणत्या गोष्टीची कमतरता आली आहे. परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करण्याचे परिणाम नक्कीच समृद्धिमध्ये होईल.” तू त्याला आवश्य देव त्याला देतांना तुझ्या मनाला वाईट वाटू देऊ नको, असे केल्याने तू हात घालशील त्या प्रत्येक कामात तुझा देव परमेश्वर तुला बर करा देईल.” (अनुवाद १५:१०). MHMar 139.1

कारण तुझा देव परमेश्वर तुला दिलेल्या वचनानुसार तुझे कल्याण करील तू अनेक राष्ट्रांना कर्ज देशील पण तू स्वत: कर्ज काढणार नाहीस तू अनेक राष्ट्रांवर सता गाडाविशील पण तुझ्यावर त्यांची सत्ता चालणार नाही.” (अनुवाद १५:६). MHMar 139.2