Go to full page →

तो आपली सर्व मेंढरे आपल्या बाहमध्ये गोळा करील
आणि आपल्या उराशी धरील. व फिरेल MHMar 14

जेव्हा येशू शहर आणि गल्ल्यांमधून सेवा करीत फिरत होता. माता आपल्या आजारी व मरणाच्या दारात असलेल्या मुलांना आपल्या बाहूमध्ये घेऊन गर्दीमध्ये घुसून त्याच्याजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करीत होत्या. म्हणजे त्याचे आपल्याकडे लक्ष येईल. MHMar 14.5

या मातांना पाहा. हताश, निर्बल त्रासिक आणि जवळजवळ निराश झालेल्या परंतु तरीही निश्चयपूर्वक आणि नेटाने पुढे सरकत होत्या. आपले सर्व दुःख विसरुन मुक्तिदात्याला शोधीत होत्या आणि उसळत्या गर्दीमुळे मागे ढकळल्या जात होत्या. यावेळी ख्रिस्त एक एक पाऊल टाकीत त्यांच्या जवळ पोहोचलाच होता. तेव्हा त्यांच्या हृदयात एक आशेची लाट तरंगते. आपल्याकडे त्याचे लक्ष गेल्याचे पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रु तरळले कारण त्याच्या डोळ्यात त्यांना दया आणि प्रीतिची धारा वाहताना त्यांनी पाहिली. MHMar 15.1

एक समूहाची एक महिला गर्दीच्या कडेला उभी होती. ख्रिस्ताने तिच्या धाडसाला आमंत्रित करीत विचारले की, “मी तुझ्यासाठी काय करु शकतो?” ती आपले हुंदके आवरत तिची मोठी गरज त्याला सांगते. “हे स्वामी तू माझ्या बाळाला बरे कर.” येशूने तिचे बालक आपल्या बाहूत घेतले आणि त्याच्या स्पर्शानेच तेच बाळ ताबोडतोब बरे झाले. त्याच्या शरीरावरी मृत्युचे पिवळेपणा नाहीसा झाला. त्यांच्या नसानसातून जीवनधारा वाहू लागल्या आणि त्याच्या स्नायूमध्ये नवचैतन्य आले. मातेच्या तोंडून समाधान व धन्यवादाचे शब्द बाहेर पडले. मग दुसरा रुग्ण, तिसरा रुग्ण असे अनेक समस्या घेऊन आले. त्या सर्वांची त्याने मुक्तता केली. त्याने आपल्या जीवनदायी शांतीचा वापर सर्वांवर केला सर्वांना त्याची प्रशंसा केली त्याची स्तुति केली व महिमा गाईला कारण त्याने आश्चर्यकारक कर्मे केली होती. MHMar 15.2

आम्ही बहुत करुन ख्रिस्ताच्या महान जीवनावर विश्वासून आहोत. त्याच्या अद्भूत व चमत्काराविषयी बोलतो जे त्याने केले होते, परंतु छोट्या छोट्या समस्येवर त्याने मोठे लक्ष दिसले यावरुन त्याची महानता दिसून येते. ती त्याची खरी महानता आहे. MHMar 15.3

यहूदी लोकांमध्ये प्रथा होती की मुलांना गुरुवर्यांकडे आणावे म्हणजे ते त्यांच्या डोक्यावर हात ठेऊन त्यांना आशीर्वाद देतील, परंतु शिष्यांना वाटले की मुले जर येशूकडे आली तर येशूच्या महत्त्वपूर्ण कार्यामध्ये अडथळा होईल. जेव्हा माता आपल्या मुलांना आशीर्वादासाठी येशूकडे आणीत होत्या तेव्हा शिष्यांना ते आवडले नाही. त्यांना वाटले की मुले खूप लहान आहेत आणि त्यांना येशूकडे आणल्यास त्यांना काहीच फायदा होणार नाही आणि त्यांच्या उपस्थितीत येशूला बरे वाटणार नाही. परंतु येशूने मुले आणि त्यांच्या मातांची समस्या ओळखली म्हणून तो म्हणाला, “बालकास मजकडे येऊ द्या, त्यास मना करु नका.’ हे ऐकून मातांना आनंद झाला आपल्या मुलांनी त्याने केलेली प्रार्थना ऐकावी व त्यांना आशीर्वाद मिळावा ही त्यांची इच्छा होती. MHMar 15.4

एक आई आपल्या मुलांना घेऊन येशूचा शोध करण्यास बाहेर पडली. रस्त्यात तिने आपल्या शेजारीणीला आपला उद्देश सांगितला व तीही तिच्याबरोबर जाण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आल्या. काही मुले तान्ह्यापासून बालकापर्यंत व काही बालकांपासून खोडकरपणाच्या वयापर्यंत पोहोचली होती. जेव्हा मातांनी येशूकडे आपली इच्छा प्रदर्शित केली तेव्हा येशूने त्यांच्याकडे सहानुभूतिपूर्वक पाहून त्यांचे भय व अश्रु घालविले, परंतु तो हे पाहाण्यासाठी थांबला की त्याचे शिष्य या मातांशी कसे वागतील आणि जेव्हा त्याने पाहिले की शिष्य या स्त्रियांना रागावून परत पाठवित होते कारण त्यांनी विचार केला की कदाचित येशूला हे आवडणार नाही, परंतु येशूने त्यांचे वागणे चुकी असल्याचे दाखविले. म्हणून तो म्हणाला, “बालकास मजकडे येऊ द्या. त्यांस मना करु नका कारण स्वर्गाचे राज्य असल्याचेच आहे.” (मार्क १०:१४). त्याने मुलांना आपल्या जवळ घेतले. त्याने त्यांच्या डोक्यावर हात ठेऊन आशीर्वाद दिला. ज्यासाठी ते आले होते. MHMar 16.1

मुलांच्या मातांना खूप समाधान वाटले. ख्रिस्ताच्या वचनाने शक्ति मिळून आशीर्वादित होऊन त्या आनंदाने घरी गेल्या. आपली प्रिय ओझी प्रसन्नतेने उचलून आनंदाने व नव्या उमेदीने त्या घरी गेल्या. MHMar 16.2

जर या छोट्या मुलांच्या जीवनामध्ये नंतर काय घडले हे आमच्या डोळ्यासमोर उघडल झाले असते तर त्यांच्या मातांना त्या दिवसाची आठवण करुन दिली असती आणि ख्रिस्ताचे वचन पुन्हा त्यांना ऐकविले असते. आपण हे सुद्धा पाहिले असते की या मुलांनी येणाऱ्या दिवसांमध्ये येशूचे वचन लक्षात ठेऊन ते मार्ग भटकले नाहीत. अशा लोकांना प्रभू राखून ठेवतो. MHMar 16.3

ख्रिस्त आजसुद्धा दयाळू, कनवाळू आणि तारणारा आहे. जो मानवामध्ये चालत फिरत होता, रोग आजार बरे करीत होता. तो आजही आपल्या मुलांसाठी चिंता करणाऱ्या मातांचा सहाय्यक आहे जो जगात असतांना बालकांना जवळ घेऊन त्यांना आशीर्वाद देत होता. आपल्या घरातील आजची मुले त्याच्या रक्ताने विकत घेतली आहेत जी त्याकाळी येशूच्या सुरक्षितेखाली होती. MHMar 16.4

येशू प्रत्येक मातेच्या हृदयाचे ओझे जाणून आहे. ज्या मातांनी गरीबीमध्ये आपल्या मुलांना वाढविण्यासाठी संघर्ष केला त्यांच्या प्रत्येक परिश्रमाची नोंद तो ठेवतो. त्यांना तो सहानुभूति दाखवितो. एका कनानी स्त्रीची काळजी वाटून तिला शांती देण्यासाठी त्याने दूरचा प्रवास केला तो आजसुद्धा या जगातील मातांसाठी तसेच करतो. कनानी विधवेचा एकुलता एक मुलगा मेलेल्यातून त्याला जिवंत करुन तिच्या हाती सोपविला. क्रुसावर शारीरिक आणि मानसिक वेदनेतून जात असता तो आपल्या आईला विसरला नाही तोच आजही मातांच्या पीडांमुळे त्याला वेदना होतात. त्यांच्या प्रत्येक गरजा तो अजूनही जाणून आहे. MHMar 17.1

त्यावेळी ज्या मातांना आपल्या बालकांना आशीर्वाद मिळण्याच्या हेतूने आणले होते व त्यांनी आपले प्रेमळ ओझे त्याच्या चरणावर ठेवण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा येशू म्हणाला होता, “बालकास मजकडे येऊ द्या. त्यांस मना करु नका” (मार्क १०:१४). आणि त्यांच्यासाठी मार्ग मोकळा झाला आणि आजही तोच येशू मातांना आपल्या मुलांना घेऊन येण्यासाठी निमंत्रित करीत आहे. म्हणजे तो त्यांना आशीर्वाद देईल. MHMar 17.2

जी मुले येशूच्या सान्निध्यात आली त्यांच्यामध्ये येशूने असे स्त्री-पुरुष पाहिले की ते त्याच्या स्वर्गीय राज्याचे हक्कदार होणार होते आणि त्यांच्यातील काही त्याच्यामुळे बळी जातील. त्याला ठाऊक होते की त्याला ठाऊक होते की मुले मोठ्यांच्या तुलनेने लवकर स्वीकारतील व विश्वास ठेवतात. कारण त्यांच्यामधील बहुतेकजण जगिक रूपाने बुद्धिमान आणि कठोर हृदयाचे बनतात. म्हणून येशू त्यांना शिकवित असता त्यांच्या पातळीपर्यंत खाली आला तो जो स्वर्गराज्याचा राजकुमार आहे त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे दिली आणि आपले महत्त्वाचे धडे त्यांना बालबोध पद्धतिने शिकविले. त्याने त्यांच्या अंत:करणात सत्याचे बीज पेरले. जे येणाऱ्या वर्षामध्ये अंकुरीत होऊन दुप्पट, तिप्पट व दसपट पीक देईल. MHMar 17.3

जेव्हा येशू आपल्या शिष्यांना मुलांना त्याच्याकडे येण्यास मनाई करु नका तर त्यांना येऊ द्या. हाच संदेश त्यावेळी तो सर्व अनुयायांना, मंडळीला, अधिकाऱ्यांना, सेवकांना व पाळकांना सांगत होता. सर्व ख्रिस्ती लोकांना सांगत होता. येशू मुलांना आपल्या जवळ बोलावितो व आम्हाला सांगतो की “बालकास मजकडे येऊ द्या. त्यास मना करु नका” जर तुम्ही त्यांना मना केले तर मुले स्वतः माझ्याकडे येतील. MHMar 17.4

आपले जीवन असे थंड होऊ नये की ज्यामुळे येशूला चुकीचे सादर कराल. तेव्हा मुलांना येशूची ओळख करुन द्यायला विसरु नका. मुलांना असे वाटू देऊ नका की स्वर्गामध्ये त्यांच्यासाठी योग्य स्थान नाही. त्यांच्या समोर येशूविषयी अशा गोष्टी करु नका की त्या मुलांना समजणार नाहीत आणि ते स्थान त्यांना सुखमय असणार नाही. त्यांच्यासमोर असा खोटा आभास करु नका की येशूचा धर्म गंभीर आणि उदास आहे तेथे खेळण्यास बागडण्यास मनाई आहे किंवा आनंदी जीवन नाही. किंवा येशू जवळ आल्यास सर्व आनंदी गोष्टी टाळायच्या आहेत. MHMar 18.1

जेव्हा पवित्र आत्मा मुलांमध्ये कार्य करतो तेव्हा त्यांना सहकार्य करा. त्यांना शिकवा की तारणारा त्यांना बोलवित आहे आणि जेव्हा ते आपले बालपण आणि युवा अवस्था त्याच्याबरोबर राहतील तर त्यांना वाटेल की तोच त्यांचा खास मित्र आहे. त्याच्याशिवाय उत्तम मित्र कोणीच नाही. MHMar 18.2